WTC Final : खराब प्रकाशमानाने न्यूझीलंडला वाचवलं, नाहीतर भारताने घेतली असती आघाडी, भारतीय फलंदाजाने केला दावा

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सध्या खेळत असलेल्या एका भारतीय फलंदाने तिसऱ्या दिवशीच्या खेळाबद्दल बोलताना एक महत्त्वाचा दावा केला आहे. खराब प्रकाशमानामुळे भारताच्या हातातून संधी निसटल्याचं त्याचं म्हणण आहे.

WTC Final : खराब प्रकाशमानाने न्यूझीलंडला वाचवलं, नाहीतर भारताने घेतली असती आघाडी, भारतीय फलंदाजाने केला दावा
Shubman-Gill
Follow us
| Updated on: Jun 21, 2021 | 4:48 PM

साऊदम्पटन : भारतीय संघाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पहिल्या डावात केवळ 217 धावांपर्यंत मजल मारली. दरम्यान न्यूझीलंडकडून मात्र चांगल्या फलंदाजीचे दर्शन झाले असून सलामीवीर डेवन कॉन्वेच्या अर्धशतकाच्या जोरावर न्यूझीलंड 49 ओव्हर नंतर 101 वर 2 बाद अशा मजबूत स्थितीत आहे. दरम्यान तिसऱ्या दिवशीचा खेळ खराब प्रकाशमानामुळे थांबवण्यात आल्याने खराब प्रकाशमानामुळे न्यूझीलंड वाचले नाहीतर भारतीय गोलंदाजानी आणखी विकेट्स पटकावले असते असा दावा भारताचा सलामीवीर शुभमन गिलने केला आहे.(Shubman Gill Says In ICC World test Final due to Bad Light We did not got some wickets if Weather Was good We Will be in benifit)

तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडने सामन्यावर चांगली पकड मिळवली. भारताचा पहिला डाव 217 धावांत गुंडाळून न्यूझीलंडने दमदार फलंदाजीला सुरुवात केली. दरम्यान 35 व्या ओव्हरमध्ये शमीनेलॅथमचा विकेट घेतल्यावर देखील न्यूझीलंडचा सेट बॅट्समन कॉन्वे कर्णधार केनसोबत चांगली फलंदाजी करत होता. तेव्हाच इशांत शर्माने 49 व्या ओव्हरमध्ये कॉन्वेला बाद केले आणि भारताला ब्रेक थ्रू मिळाला. दोन्ही सेट फलंदाज तंबूत परतल्याने भारताला सामन्यात पुन्हा आघाडी घेण्याची संधी आली होती मात्र तेव्हाच खराब प्रकाशमानामुळे दिवसाचा खेळ वेळेपेक्षा लवकर थांबवण्यात आला.  याच गोष्टीमुळे न्यूझीलंडला फायदा आणि भारताला तोटा झाल्याचं भारतीय सलामीवीर शुभमन गिलने सामन्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं.

काय म्हणाला गिल

सामन्यानंतर शुभमन गिल पत्रकार परिषदेत म्हणाला की, “आम्ही दिवसाच्या शेवटी घेतलेला कॉन्वेचा विकेट अत्यंत महत्त्वाचा होता, जर आम्हाला काही आणखी ओव्हर गोलंदाजीसाठी भेटले असते तर आणकी विकेट्स घेण्यात आम्ही यशस्वी झालो असतो. ”

संबंधित बातम्या

WTC Final Weather Update : चौथ्या दिवशी खेळ होणार की नाही? साऊदम्पटनमधील हवामानाचे ताजे फोटो समोर

WTC Final 2021 : भारतीय संघावर 6 फूट 8 इंच उंचीच्या बोलरचा हल्ला, एकाच डावांत 5 खेळाडूंना धाडलं तंबूत

WTC Final : अजिंक्यला बाद करण्यासाठी न्यूझीलंडने केली ‘ही’ युक्ती, रहाणे फसला जाळ्यात

(Shubman Gill Says In ICC World test Final due to Bad Light We did not got some wickets if Weather Was good We Will be in benifit)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.