IND VS WI: चुकीला माफी नाही, शुभमन गिलने कशी विकेट फेकली, ते या VIDEO मध्ये पहा
वेस्ट इंडिज विरुद्ध (IND vs WI) वनडे सीरीज (ODI Series) मध्ये टीम इंडियाच शानदार प्रदर्शन सुरु आहे. रविवारी भारताने दुसरा वनडे सामना 2 विकेटने जिंकून मालिका विजय मिळवला.
मुंबई: वेस्ट इंडिज विरुद्ध (IND vs WI) वनडे सीरीज (ODI Series) मध्ये टीम इंडियाच शानदार प्रदर्शन सुरु आहे. रविवारी भारताने दुसरा वनडे सामना 2 विकेटने जिंकून मालिका विजय मिळवला. तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाकडे आता 2-0 अशी विजयी आघाडी आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 312 धावांचं लक्ष्य टीम इंडियाने 2 चेंडू बाकी राखून पार केलं. या मॅच मध्ये अक्षर पटेलने नाबाद अर्धशतक झळकवून संघाला विजय मिळवून दिला. या सामन्यात सलामीवीर शुभमन गिलने (Shubhaman Gill) अशी एक चूक केली, की तो स्वत:लाही माफ करणार नाही.
शुभमन गिलने विकेट फेकली
शुभमन गिलने सलग दुसऱ्या सामन्यात चांगली सुरुवात केली. गिलने 49 चेंडूत 43 धावा फटकावल्या. यात 5 चौकार लगावले. गिलने चांगली फलंदाजी केली. पण त्याने ज्या पद्धतीने आपला विकेट गमावला, ते खरोखरच न पटण्यासारख आहे. गिलने 16 व्या षटकात कायली मेयर्सच्या गोलंदाजीवर स्कूपचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बॅटच्या टो ला लागून गोलंदाजाच्या हातात गेला. मेयर्सने अगदी सहज सोपा झेल घेतला. शुभमन गिल चांगले क्रिकेटिंग शॉट्स खेळून सहजतेने धावा बनवत होता. पण फटका खेळताना प्रयोग करण्याच्या नादात त्याने आपली विकेट गमावली. क्रिकेट मध्ये अनेकदा म्हटलं जातं की, सेट झाल्यानंतर तुम्ही आऊट झालात, तर तो एक गुन्हा आहे. शुभमनने हेच केलं.
.@ShubmanGill tried to hit behind the keeper and completely missed it.
Watch the India tour of West Indies LIVE, only on #FanCode? https://t.co/RCdQk1l7GU@BCCI @windiescricket pic.twitter.com/nq8vfpz5LL
— FanCode (@FanCode) July 24, 2022
अजून सेट झाल्यानंतर कोण आऊट झालं?
अय्यर आऊट झाल्यानंतर सूर्यकुमार यादव अवघ्या 9 रन्स बनवून बाद झाला. दीपक हुड्डा देखील सेट झाल्यानंतर 33 धावांवर आऊट झाला. श्रेयस अय्यरच्या 63 आणि अक्षर पटेलने 35 चेंडूत नाबाद 64 धावा फटकावल्या. त्यामुळे टीम इंडियाने 2 चेंडू बाकी राखून विजय मिळवला. संजू सॅमसननेही अर्धशतक फटकावलं. त्याने 54 धावा केल्या.