Siddharth Yadav U19 : किराणा दुकान चालवून क्रिकेट शिकवलं, आता 19 वर्षांखालील विश्वचषकात खेळणार मुलगा

वेस्ट इंडिज (west Indies) येथे होणाऱ्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धे(U19 World Cup)साठी भारतीय संघाची निवड करण्यात आलीय. या संघाची कमान दिल्लीचा खेळाडू यश धुल(Yash Dhull)कडे देण्यात आलीय.

Siddharth Yadav U19 : किराणा दुकान चालवून क्रिकेट शिकवलं, आता 19 वर्षांखालील विश्वचषकात खेळणार मुलगा
सिद्धार्थ यादव
Follow us
| Updated on: Dec 21, 2021 | 12:04 PM

मुंबई : वेस्ट इंडिज (west Indies)मध्ये पुढच्या महिन्यात होणाऱ्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धे(U19 World Cup)साठी भारतीय संघाची निवड करण्यात आलीय. या संघाची कमान दिल्लीचा खेळाडू यश धुल(Yash Dhull)कडे देण्यात आलीय. याशिवाय या संघात असे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी मेहनतीच्या जोरावर आपलं स्थान निर्माण केलंय. स्वतः कर्णधार यश धुल हाही त्यापैकीच एक. कर्णधार यश व्यतिरिक्त गाझियाबादचा सिद्धार्थ यादवदेखील मोठ्या संघर्षानंतर अंडर-19 संघात स्थान मिळवू शकलाय.

आपलं स्वप्न मुलगा पूर्ण करण्याची खात्री सिद्धार्थ यादवचे वडील गाझियाबादच्या कोटगावात किराणा दुकान चालवतात. सिद्धार्थचे वडील श्रावण यादव यांनाही क्रिकेटपटू व्हायचं होतं, पण ते संघाच्या नेट बॉलरच्या पलीकडे फारसं काही करू शकले नाहीत. आता वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांचा मुलगा सिद्धार्थ यादव यूएईमध्ये होणाऱ्या आशिया कप आणि वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाकडून खेळणार आहे.

पहिल्यांदा डाव्या हातात घेतली बॅट सिद्धार्थचे वडिलांचे म्हणतात, की सिद्धार्थला क्रिकेटर म्हणून पाहायचं होतं. सिद्धार्थनं पहिल्यांदा बॅट हातात घेतली, तेव्हा त्यानं डाव्या हातानं फलंदाजी केली. तेव्हापासून त्यांना सिद्धार्थ डावखुरा फलंदाज होईल, असं वाटत होतं. वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सिद्धार्थनंही मेहनत घेतली.

सिद्धार्थला करत होते मदत वयाच्या 8व्या वर्षानंतर सिद्धार्थनं क्रिकेटमध्ये अधिक मेहनतीनं खेळायला सुरुवात केली. त्यामुळे त्याला अंडर-19 संघात स्थान मिळालं. सिद्धार्थचे वडील सांगतात, की आपण दिवसातून 3 तास ​​दुकान बंद ठेवून सिद्धार्थला फलंदाजीचा सराव आणि क्रिकेट शिकवत.

प्रत्येक लहान शहरातल्या खेडाडुंचा संघर्ष प्रत्येक लहान शहरातल्या क्रिकेटपटूच्या मागं मोठा संघर्ष असतो. सिद्धार्थ यादवसोबत या संघात असे अनेक खेळाडू आहेत ज्यांना छोट्या शहरांमधून बाहेर पडून नवीन स्थान मिळवायचेय. पुढील महिन्यापासून वेस्ट इंडिजमध्ये अंडर-19 विश्वचषक खेळवला जाणार आहे. या खेळाडूंकडून पुन्हा एकदा विश्वचषक जिंकावा, अशी संपूर्ण देशाची अपेक्षा असेल. 2020मध्ये भारतीय संघ बांगलादेशविरुद्ध फायनलमध्ये पराभूत झाला होता. यापूर्वी 2018मध्ये भारतानं न्यूझीलंडमध्ये चौथ्यांदा अंडर-19 विश्वचषक जिंकला होता.

IND vs SA : दक्षिण आफ्रिकेत सर्वाधिक यशस्वी आणि कसोटी विकेट घेणारे भारतीय गोलंदाज, पाहा संपूर्ण यादी… 

Fab 4 Cricket : सचिन तेंडुलकरच्या ‘तुझे फॅब 4 कोण?’, या प्रश्नावर विनोद कांबळीचं भन्नाट उत्तर!

जेसीबीनं खोदकाम सुरु होतं, अचानक झाला खणखणाट, औरंगाबादेत सापडले ब्रिटिशकालीन घबाड

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.