IND vs PAK: पाकिस्तानच्या खेळाडूला चेंडू दिसत नाही, तो संघात खेळवण्याच्या लायकीचा नाही; न्यूझीलंडच्या दिग्गज खेळाडूची टीका

T20 World Cup 2021 मध्ये, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील (IND vs PAK, T20 World Cup) सामन्याआधी महामुकाबल्याचं वातावरण तयार करण्यात आहे.

IND vs PAK: पाकिस्तानच्या खेळाडूला चेंडू दिसत नाही, तो संघात खेळवण्याच्या लायकीचा नाही; न्यूझीलंडच्या दिग्गज खेळाडूची टीका
IND vs PAK, T20 World Cup
Follow us
| Updated on: Oct 24, 2021 | 5:39 PM

T20 World Cup 2021 मध्ये, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील (IND vs PAK, T20 World Cup) सामन्याआधी महामुकाबल्याचं वातावरण तयार करण्यात आहे. पाकिस्तानमध्ये त्याच्या संघाच्या विजयासाठी प्रार्थना केली जात आहे. त्याचवेळी भारतीय चाहतेही प्रार्थना करत आहेत. विराट आणि कंपनी पुन्हा एकदा पाकिस्तानी संघाची धुलाई करेल आणि टी-20 विश्वचषकात पाकिस्तानकडून पराभूत न होण्याचा भारतीय संघाचा विक्रम अबाधित राखेल, असा त्यांना विश्वास आहे. भारतासोबत इतर देशांचे खेळाडू आणि चाहतेही या सामन्याकडे डोळे लावून बसले आहेत. या हाय व्होल्टेज सामन्यापूर्वी पाकिस्तानी संघातील एका खेळाडूवर न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज आणि प्रसिद्ध समालोचक सायमन डूल यांने टीका केली आहे. तसेच त्याच्या संघातील समावेशाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. (Simon Doull says Pakistan should avoid playing Shoaib Malik, Mohammad Hafeez together)

सायमन डूलने शोएब मलिकबाबत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. तो क्रिकबझच्या एका विशेष शोमध्ये बोलत होता. सायमन डूल याला विचारण्यात आले की, पाकिस्तानने कोणत्या प्लेईंग इलेव्हनसह मैदानात उतरायला हवं? यावर डूलने सांगितले की तो मोहम्मद हफीज आणि शोएब मलिक यांच्यापैकी फक्त एका खेळाडूला संघात ठेवेल. डूलने याचे कारणही दिले आहे. त्याने स्पष्ट सांगितले की, त्याला शोएब मलिकला पाकिस्तानच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बघायचे नाही कारण तो नुकत्याच झालेल्या कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये खूप खराब खेळला होता.

शोएब मलिकला चेंडू दिसत नाही

सायमन डूलने शोएब मलिकच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि म्हणाला, ‘अलीकडेच मी शोएब मलिकला सीपीएलमध्ये खेळताना पाहिले होते. तो खूप वाईट खेळला. तो चेंडू नीट पाहू शकला नाही. दुसरीकडे, जर मोहम्मद हाफिजने चांगली गोलंदाजी केली तर मी त्याला संघात स्थान देईन. शोएब मलिकने CPL 2021 मध्ये गयाना अॅमेझॉन वॉरियर्सकडून खेळताना 10 डावांमध्ये 7.44 च्या सरासरीने 67 धावा केल्या. शोएब मलिकला संपूर्ण स्पर्धेत 3 चौकार आणि एक षटकार लगावता आला. शोएब मलिकने टी-20 विश्वचषक 2021 च्या तयारीसाठी आयोजित राष्ट्रीय टी-20 चषकात चांगली कामगिरी केली असली तरी. सिंधविरुद्ध त्याने 85 आणि 40 धावांची खेळी केली होती.

बाबर आझमनेही शोएब मलिकला भारताविरुद्धच्या अंतिम 12 खेळाडूंमध्ये ठेवले आहे कारण तो फिरकी चांगला खेळतो. बाबरच्या मते, शोएब मलिककडे अनुभव आहे आणि तो फिरकीपटूंविरुद्ध चांगली फलंदाजी करतो.

पाकिस्तानचा 12 सदस्यीय संघ : बाबर आझम, मोहम्मद रिझवान, फखर जमान, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, आसिफ अली, इमाद वसीम, शादाब खान, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हरीस रौफ, हैदर अली.

इतर बातम्या

India vs Pakistan T20 world cup 2021 LIVE Score: भारत विरुद्ध पाकिस्तान आमने-सामने, महामुकाबल्याला अवघे काही तास शिल्लक

India vs Pakistan: मला यावेळी पाकिस्तानचं पारडं अधिक जड वाटतंय, ‘या’ नेत्याकडून टीम इंडियाला सावधगिरीचा इशारा

T20 World Cup 2021 Ind vs Pak : वसीम जाफरनं वात पेटवली, पाकिस्तानच्या वर्मावर बोट, भन्नाट मीम्सद्वारे डिवचलं

(Simon Doull says Pakistan should avoid playing Shoaib Malik, Mohammad Hafeez together)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.