SL vs IND 2nd T20I Live Streaming: इंडिया-श्रीलंका दुसरा सामना रविवारी किती वाजता?
Sri Lanka vs India 2nd T20i Live Straming: टीम इंडिया 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे श्रीलंकेसाठी दुसरा सामना अतिशय महत्त्वाचा आहे.
टीम इंडियाने श्रीलंकेवर पहिल्या टी 20 सामन्यात 43 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाने श्रीलंकेला विजयासाठी 214 धावांचं आव्हान दिलं होतं. त्याचा पाठलाग करणाऱ्या श्रीलंकेला टीम इंडियाने 19.2 ओव्हरमध्ये 170 धावांवर ऑलआऊट केलं. टीम इंडियाने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. टीम इंडियाला आता दुसरा सामना जिंकून मालिका विजयाची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला श्रीलंकेला मालिकेत कायम राहण्यासाठी विजय आवश्यक आहे. उभय संघातील दुसरा सामना कधी आणि कुठे पाहता येणार? हे जाणून घेऊयात.
श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया दुसरा सामना केव्हा?
श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया दुसरा सामना रविवारी 28 जुलै रोजी खेळवण्यात येणार आहे.
श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया दुसरा सामना कुठे?
श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया दुसरा सामना पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे.
श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया दुसरा सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?
श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया दुसरा सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होईल. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.
श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया दुसरा सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळणार?
श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया दुसरा सामना टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया दुसरा सामना मोबाईलवर कुठे पाहता येईल?
श्रीलंका विरुद्ध टीम इंडिया दुसरा सामना मोबाईलवर सोनी लिव्ह एपवर पाहायला मिळेल.
टी 20 सीरिजसाठी श्रीलंका टीम: चरिथ असलांका (कॅप्टन), पथुम निसांका, कुसल परेरा ,अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, दिनेश चांदीमल, कामिंदु मेंडिस, दासुन शनाका, वानिंदु हसरंगा, दुनिथ वेल्लालागे ,महेश तीक्षाना,चामिंडु विक्रमसिंघे, मथीशा पथिराना, बिनुरा फर्नांडो, दिलशान मधुशंका आणि असिथा फर्नांडो
टी20i मालिकेसाठी टीम इंडिया: सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयसवाल, रिंकू सिंह, रियान पराग, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंह, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज.