PAK vs SL: मेंडीसच काय, जगातल्या टॉप बॅट्समनचही नसीम शाहच्या ‘या’ चेंडूसमोर काही चाललं नसतं, पहा VIDEO
PAK vs SL: यंदाच्या आशिया कप स्पर्धेत पाकिस्तानच्या एका गोलंदाजाने सर्वांच लक्ष वेधून घेतलं. त्याचं नाव आहे नसीम शाह. काल रविवारी फायनल मॅचमध्ये नसीम शाहने चांगली सुरुवात केली होती.
मुंबई: यंदाच्या आशिया कप स्पर्धेत पाकिस्तानच्या एका गोलंदाजाने सर्वांच लक्ष वेधून घेतलं. त्याचं नाव आहे नसीम शाह. काल रविवारी फायनल मॅचमध्ये नसीम शाहने चांगली सुरुवात केली होती. पहिल्याच ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर त्याने श्रीलंकन सलामीवीर कुसल मेंडीसला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.
मेंडीस नसीम शाहचा तिसरा गोल्डन डक
नसीम शाहने कुसल मेंडीसला टाकलेला चेंडू अप्रतिम होता. मेंडीस आल्यापावली माघारी परतला. तो गोल्डन डक म्हणजे पहिल्या चेंडूवर बोल्ड झाला. आशिया कपमध्ये नसीमच्या गोलंदाजीवर मेंडीस तिसरा गोल्डन डक आहे. याआधी नसीम शाहने टीम इंडियाचा केएल राहुल आणि मोहम्मद नबीला पहिल्या चेंडूवर बाद केलय.
नव्या चेंडूने नसीम शाह जास्त घातक
नसीमने कुसल मेंडीसला टाकलेली डिलिव्हरी इतकी अप्रतिम होती की, त्याला काहीच करता आलं नाही. कुसल मेंडीसच्या जागी जगातला दुसरा टॉप बॅट्समन असता, तर तो सुद्धा फार काही करु शकला नसता. नसीमच्या इनस्विंगरने थेट मेंडीसला क्लीन बोल्ड केलं. तो काहीच करु शकला नाही. केएल राहुल आणि मोहम्मद नबीला सुद्धा अशाच चेंडूवर नसीम शाहने बोल्ड केलं होतं. नसीम शाहकडे चेंडू स्विंग करण्याची उत्तम क्षमता आहे. ते त्याच्या गोलंदाजीतील बलस्थान आहे. नव्याने चेंडूने गोलंदाजी करताना नसीम शाह जास्त घातक आहे.
A blockbuster Powerplay to start proceedings in the DP World #AsiaCup2022 Final! ?
Watch #SLvPAK, LIVE on Star Sports/Star Gold/Disney+Hotstar NOW! pic.twitter.com/8XOI4ZxArC
— Star Sports (@StarSportsIndia) September 11, 2022
पाच मॅचमध्ये सात विकेट
पाकिस्ताच्या प्रमुख गोलंदाजांना दुखापत झाली. त्यामुळे नसीम शाहने टी 20 च्या फॉर्मेटमध्ये डेब्यु झाला. या 19 वर्षाच्या युवा गोलंदाजाने जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन निवड सार्थ ठरवली. पाच मॅचमध्ये त्याने सात विकेट घेतल्या.