टीम इंडियाला क्रिकेट विश्वचषक मिळवून दिला, आता 28 व्या वर्षीच भारताला बाय बाय, देशही सोडला

बीसीसीआयच्या नियमांना कंटाळून एका 28 वर्षीय क्रिकेटपटूने भारतीय क्रिकेटला अलविदा केली आहे.

टीम इंडियाला क्रिकेट विश्वचषक मिळवून दिला, आता 28 व्या वर्षीच भारताला बाय बाय, देशही सोडला
स्मित पटेल
Follow us
| Updated on: Jun 02, 2021 | 3:31 PM

नवी दिल्ली : भारताला 2012 सालीचा अंडर-19 वर्ल्ड कप (Under 19 World Cup 2012) जिंकवून देण्यात महत्त्वाची कामगिरी करणाऱ्या स्मित पटेलने (Smit Patel) भारतीय क्रिकेट (Indian Cricket) सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने देश देखील सोडला असून तो सध्या अमेरिकते आहे. बीसीसीआय (BCCI) भारतीय क्रिकेटपटूंना इतर देशातील क्रिकेट स्पर्धा खेळू देत नसल्याचे मुख्य कारण स्मितने दिले असून त्यामुळेच भारतीय संघासाठी क्रिकेट खेळणार नसल्याचं त्याने म्हटलंय. स्मितला कॅरेबियन प्रिमीयर लीगमध्ये बारबाडोस ट्रायडेंट्स संघाने विकत घेतल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. (Smit Patel leaves India due to BCCI terms and Wish to play For American cricket team)

स्मितने ईएसपीएनक्रिकइन्फोशी बोलताना माहिती दिली की, ”अंडर 19 वर्ल्ड कप सारख्या एका मोठ्या स्पर्धेत मी भारतीय संघासाठी खेळलो याचा मला आनंद आहे. या सर्व आठवणींसोबत मी पुढे जाईन. तसंच बीसीसीआयला मी माझ निवृत्तीपत्र पाठवलं असून माझा सर्व कागदोपत्री व्यवहारही झाला आहे. भारतीय क्रिकेटचा चॅप्टर माझ्य़ासाठी संपला आहे.” स्मित आतापर्यंत गुजरात, त्रिपुरा, गोवा आणि वडोदरा या डॉमेस्टीक संघासाठी खेळला आहे. स्मित भारतात 2020-21 मध्ये विजय हजारे ट्रॉफीमध्ये वडोदरा संघाकडून शेवटची मॅच खेळला आहे.

स्मितची ‘ती’ महत्त्वाची खेळी

2012 साली उन्मुक्त चंदच्या नेतृत्त्वाखाली भारताने अंडर-19 वर्ल्ड कप जिंकला होता. त्यावेळी अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया विरोधात स्मितने 84 बॉलमध्ये नाबाद 62 धावा ठोकल्या होत्या. सामन्यात भारत ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 226 धावांचा पाठलाग करत असताना 97 वर 4 बाद अशा बिकट परिस्थितीत होता. त्यावेळी स्मितने कर्णधार उन्मुक्त चंदसोबत अप्रतिम भागिदारी करत भारताला विजय मिळवून दिला. स्मितने 62 आणि उन्मुक्तने 111 धावा केल्या. त्यावेळी स्मितने विजयी शॉट खेचत भारताला विश्वचषक मिळवून दिला.

Smit-Patel

स्मित पटेल

‘अमेरिकेच्या संघासाठी खेळायचंय’

सध्या स्मित अमेरिकेत असून लवकरच अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघासाठी ही खेळू शकतो. याबाबत बोलताना तो म्हणाला, ”येथील सर्व खेळाडू, प्रशिक्षक माझ्या अमेरिकेसाठी खेळण्याच्या निर्णयाने खूष आहेत. त्यांनी माझ्या निर्णयाचे स्वागत केले आहे. माझा खेळ आणखी सुधारुन मी अमेरिकेसाठी खेळू इच्छितो. ज्यासाठी मी संपूर्ण मेहनत करणार आहे.”

हे ही वाचा :

ICC Meeting : क्रिकेट इतिहासातील ‘ती’ मोठी स्पर्धा पुन्हा खेळवली जाणार, भारताला पाकिस्तानकडून बदला घेण्याची सुवर्णसंधी

दुबईत ठरलं…. 8 वर्षांत होणार 16 वर्ल्ड कप फायनल, प्रत्येक वर्षी भारत पाकिस्तान थरार!

वसीम अक्रम, ग्लेन मॅकग्रा, ब्रेट ली, स्टेन… कुणाला खेळायला घाबरायचा?, सचिन तेंडुलकरने सांगितलं तिसरंच नाव!

(Smit Patel leaves India due to BCCI terms and Wish to play For American cricket team)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.