Smriti Mandhana चा चाहत्यांना संदेश देताना, एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न
IND vs IRE T20 WC : आयर्लंड विरुद्ध स्मृती मांधनाने 56 चेंडूंचा सामना करताना 87 धावा केल्या. यात 9 फोर आणि 3 सिक्स मारले. ही इनिंग खेळून स्मृती मांधनाने आपला 4 वर्षापूर्वीचा रेकॉर्ड मोडला.
IND vs IRE T20 WC : T20 वर्ल्ड कपमध्ये आयर्लंड विरुद्धच्या सामन्यात स्मृती मांधनाने जबरदस्त खेळ दाखवला. तिच्या बळावर टीम इंडियाने आयर्लंडला हरवून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. स्मृती मांधना ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्काराची मानकरी ठरली. या यशानंतर स्मृती मांधनाने महत्त्वाचा ,संदेश दिलाय. सेमीफायनल आधी सर्वकाही ठिकठाक असल्याचे हे संकेत आहेत. आयर्लंड विरुद्ध स्मृती मांधनाने 56 चेंडूंचा सामना करताना 87 धावा केल्या. यात 9 फोर आणि 3 सिक्स मारले. ही इनिंग खेळून स्मृती मांधनाने आपला 4 वर्षापूर्वीचा रेकॉर्ड मोडला. आयर्लंड विरुद्धच्या धावा ही स्मृती मांधनाची T20I मधील मोठी इनिंग आहे. याआधी 62 चेंडूत 86 धावा ही स्मृती मांधनची सर्वोच्च खेळी होती. न्यूझीलंड विरुद्ध 2019 साली तिने या धावा केल्या होत्या.
स्मृती मांधनाचा संदेश
महिला T20 वर्ल्ड कपमध्ये एक चांगली इनिंग खेळल्यानंतर स्मृती मांधनाने फॅन्ससाठी एक संदेश दिलाय. या संदेशातून स्मृतीने एकप्रकारे तिच्या दुखापतीबद्दल अपडेट दिलीय. बोटाला झालेल्या दुखापतीमुळे स्मृती पाकिस्तान विरुद्ध पहिला सामना खेळू शकली नव्हती. दुसऱ्या सामन्यापासून ती टीममध्ये परतली. टीम इंडियाला सेमीफायलनच तिकीट मिळाल्यानंतर बोटाच्या दुखापतीमधून पूर्णपणे सावरल्याच तिने सांगितलं.
एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न
“मी आता व्यवस्थित असून बोटाला झालेल्या दुखापतीमधून सावरली आहे” असं मांधनाने आयर्लंड विरुद्धच्या सामन्यानंतर सांगितलं. माधनाच्या चाहत्यांसाठी हा संदेश आहेच, त्याचवेळी सेमीफायनलमध्ये टीम इंडियाला भिडणाऱ्या टीमसाठी सावध रहाण्याचा हा इशारा आहे. तिने एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न केलाय. बाकी खेळाडू स्मृतीकडून प्रेरणा घेतात
स्मृती मांधनाच्या खेळाने कॅप्टन हरमनप्रीत कौर खूश झाली. “स्मृती सध्या ज्या पद्धतीच क्रिकेट खेळतेय, ते कमालीच आहे. तिच्याकडून शिकायला मिळतय. तिच्या खेळातून बाकी टीमला प्रेरणा मिळतेय” असं हरमनप्रीत म्हणाली. कॅप्टनच्या या वक्तव्यावरुन स्मृतीच टीममधील स्थान, महत्त्व लक्षात येतं.