मृत्यूशी सामना, भारतात मिचेल जॉन्सन बरोबर हॉटेल रुममध्ये असं काय घडलं?

नेमकं काय घडलं? मिचेल जॉन्सनला असा कुठला अनुभव आला?

मृत्यूशी सामना, भारतात मिचेल जॉन्सन बरोबर हॉटेल रुममध्ये असं काय घडलं?
Mitchell-JhonsonImage Credit source: instagram
Follow us
| Updated on: Sep 19, 2022 | 7:28 PM

मुंबई: ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सन सध्या भारतामध्ये आहे. लीजेंडस लीग क्रिकेटमध्ये तो खेळतोय. जॉन्सन लखनौच्या हॉटेलमध्ये उतरला आहे. तिथे एक धक्कादायक घटना घडली. सगळेच जण या प्रकाराने हैराण झाले आहेत. जॉन्सनला जो अनुभव आला, त्याचा फोटो त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलाय. हा फोटो पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.

चाहत्यांना विचारला प्रश्न

जॉन्सन लखनौच्या ज्या हॉटेलमध्ये उतरला होता, तिथे त्याचा सामना सापाबरोबर झाला. त्याच्या खोलीतून साप निघाला. सापाला पाहून जॉन्सन हैराण झाला. पण त्याचवेळी त्याच्या मनातही कुतूहल निर्माण झालं. जॉन्सन फोटो पोस्ट करताना चाहत्यांना प्रश्न विचारला आहे.

कुठल्या प्रजातीचा आहे?

जॉन्सनला रुममध्ये साप आढळला. त्यानंतर त्याने त्या सापाचा फोटो काढला. हा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट करुन त्याने प्रश्न विचारला. हा कुठल्या प्रजातीचा साप आहे, ते त्याला कळत नव्हतं.

दोघांची कमेंट

“कोणी सांगू शकतं का? हा कुठल्या प्रजातीचा साप आहे. माझ्या खोलीच्या दरवाजावर हा साप होता” जॉन्सनच्या या पोस्टवर ब्रेट ली आणि दक्षिण आफ्रिकेच्या वार्नोन फिलेंडरने कमेंट केली आहे.

पुन्हा दुसऱ्यांदा पोस्ट केला फोटो

पहिली पोस्ट केल्यानंतर जॉन्सनने सापाचा आणखी एक फोटो पोस्ट केला. यात सापाचा फोटो जवळून घेण्यात आला होता. “हा सापाचा आणखी एक फोटो. अजूनही या सापाची प्रजाती समजत नाहीय. लखनौमध्ये थांबण्याचा अनुभव मजेशीर होता” असं कॅप्शन जॉन्सनने दिलय.

जॉन्सनने कोणाची विकेट काढली?

लीजेंडस क्रिकेट लीगमध्ये निवृत्ती घेणारे खेळाडू खेळत आहेत. जॉन्सन या लीगमध्ये इंडिया कॅपिटल्ससाठी खेळतोय. त्याने या लीगमध्ये वीरेंद्र सेहवागला आऊट केलय. सेहवान गुजरात जायंट्स टीमचा कॅप्टन आहे. या मॅचमध्ये जाएंट्सने कॅपिटल्सवर तीन विकेटने विजय मिळवला.

किती ओव्हरमध्ये मिळवला विजय?

जॉन्सनने या मॅचमध्ये तीन ओव्हर गोलंदाजी केली. 22 रन्स देऊन त्याने एक विकेट घेतला. इंडिया कॅपिटल्सने पहिली फलंदाजी केली. त्यांनी सात विकेट गमावून 179 धावा केल्या. गुजरातने केविन ओ ब्रायनच्या 106 धावांच्या बळावर 18.4 ओव्हरमध्ये हे लक्ष्य गाठलं.

'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.