IPL Auction 2024 | सोलापुरच्या मुलाची कमाल, IPL मध्ये ‘या’ टीमकडून खेळणार
IPL Auction 2024 | आयपीएलच्या पुढच्या सीजनसाठी काल लिलाव झाला. या लिलावात एका सोलापूरच्या मुलाची टीममध्ये निवड झालीय. लवकरच हा सोलापूरकर चेहरा तुम्हाला भारतीय संघातून खेळतानाही दिसू शकतो. LSG ने विकत घेतलेल्या या खेळाडूचा परफॉर्मन्स कसा आहे.
सागर सुरवसे
IPL Auction 2024 : IPL 2024 च्या सीजनसाठी काल दुबईत मिनी ऑक्शन पार पडलं. यावेळी अनेक नामवंत खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला. मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स या दोन दिग्गज ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर विक्रमी बोली लागली. मिचेल स्टार्क हा आयपीएलच्या इतिहासातील महागडा खेळाडू ठरला. त्याआधी ऑस्ट्रेलियन कॅप्टन पॅट कमिन्स. मिचेल स्टार्कला 24 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम मोजून कोलकाता नाइट रायडर्सने विकत घेतलं. त्याचवेळी पॅट कमिन्ससाठी 20 कोटीपेक्षा जास्त रक्कम मोजून सनरायजर्स हैदराबादने त्याला आपल्या ताफ्यात घेतलं. फक्त हे दोन ऑस्ट्रेलियन खेळाडूच नव्हे, अनेक उदयोन्मुख टॅलेंटेड क्रिकेटपटूंवर मुक्तहस्ताने पैशांचा पाऊस पडला. यामध्ये काही देशांतर्गत क्रिकेटपटू सुद्धा आहेत. आयपीएलच्या निमित्ताने या क्रिकेटपटूंना एक मोठ व्य़ासपीठ मिळालय. यात महाराष्ट्रातील सोलापूरचा एक उदयोन्मुख क्रिकेटपटू आहे. काल आयपीएलच्या लिलावात एका फ्रेंचायजीने त्याला विकत घेतलं. त्यामुळे आयपीएलमध्ये आता सोलापूरच नाव होणार आहे.
सोलापुरातील अष्टपैलू क्रिकेटपटू अर्शीन कुलकर्णीला आयपीएलमधील लखनऊ सुपर जायन्ट्स टीमने विकत घेतलं. लिलावात अर्शीनला लखनऊ संघाने 20 लाख रुपयांत विकत घेतलं. अर्शीन आता अवघ्या 18 वर्षांचा आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याआधी त्याने आपली प्रतिभा दाखवून दिलीय. त्यामुळेच LSG ने अर्शीनला विकत घेतलं. अर्शीन ऑलराऊंडर आहे. टॉप ऑर्डरमध्ये बॅटिंग आणि मीडियमे पेस गोलंदाजी तो करतो. ऑलराऊंडर क्रिकेटपटूंना नेहमीच मागणी असते. त्यामुळे अर्शीन लवकरच भारतीय संघाकडून खेळताना दिसल्यास आर्श्चय वाटून घेऊ नका.
कशी आहे या सोलापुरकराची कामगिरी?
दुबईमध्ये झालेल्या 19 वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघाकडून त्याने चमकदार कामगिरी केली होती. त्यामुळे अर्शीन प्रकाशझोतात आला होता. आयपीएल पूर्वी अंडर 19 क्रिकेट वर्ल्डकपसाठी देखील अर्शीनची निवड झाली होती. अर्शीनच्या क्रिकेटमधील या चमकदार कामगिरीमुळे सोलापुरात आनंदाचे वातावरण आहे. सोलापूरकर नागरिक अर्शीनची भेट घेत त्याचे अभिनंदन कौतुक करतायत. महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये अर्शीन 50 चेंडूत 117 धावा फटकावून चर्चेत आला होता. त्याशिवाय याच स्पर्धेत त्याने लास्ट ओव्हरमध्ये 5 धावा डिफेंड करुन 4 विकेट घेतल्या होत्या.