kiran navgire: सोलापुरच्या मुलीची कमाल, धोनीकडे पाहून शिकली, आता मारते 90-90 मीटर लांब SIX, पहा VIDEO
kiran navgire: "मी षटकार खेचते. नेटमध्ये सराव करते, तेव्हा मला बर वाटतं. मी धोनीचा खेळ पाहून षटकार खेचण्याचा प्रयत्न करते. मला त्याच्यासारखीच मॅच फिनिश करायला आवडते"
मुंबई: भारताला दुसऱ्या वर्ल्डकपचं विजेतेपद मिळवून देणारा महेंद्रसिंह धोनीचा (MS Dhoni) षटकार आजही समस्त भारतीय क्रिकेट रसिकांच्या स्मरणात आहे. या षटकाराने अनेकांच आयुष्य बदलून टाकलं. यात सोलापुरची एथलीट किरण नवगिरे (kiran navgire) सुद्धा आहे. सोलापुरच्या किरण नवगिरेने काल महिला 20 चॅलेंज स्पर्धेत कमाल केली. किरणने वेलोसिटी संघाकडून (Velocity Team) वेगवान अर्धशतक फटकावलं. तिने 34 चेंडूत 69 धावा फटकावल्या. तिची ही इनिंग दीर्घकाळ लक्षात राहील. तिने पाच षटकार ठोकले. 90 मीटर लांबपर्यंत तिने हे षटकार खेचले. किरण नवगिरे ही महाराष्ट्राची राज्य स्तरावरील एथलीट आहे. धोनीला ती आपला आदर्श मानते. धोनीमुळेच तिने क्रिकेटकडे वळण्याचा निर्णय घेतला. धोनीप्रमाणे लांबलचक षटकार खेचू शकले नाही, तर काय उपयोग? तिच्या याच विचारामुळे एथलॅटिक्स नुकसान झालं. पण क्रिकेटचा फायदा झाला. किरण नवगिरे महाराष्ट्राची असली, तरी ती नागालँडकडून खेळायची. मोठे फटके खेळण्याच्या क्षमतेने तिने सर्वांना प्रभावित केलं.
सोलापूरच्या किरणने टॉपच्या आंतरराष्ट्रीय बॉलर्सना कसं धुतलं, ते इथे क्लिक करुन पहा
खो-खो, कबड्डी या खेळांमध्ये जास्त रमायची
“मी षटकार खेचते. नेटमध्ये सराव करते, तेव्हा मला बर वाटतं. मी धोनीचा खेळ पाहून षटकार खेचण्याचा प्रयत्न करते. मला त्याच्यासारखीच मॅच फिनिश करायला आवडते” असं किरण संघातील सहकारी यस्तिका भाटिया सोबत BCCI TV वर बोलताना म्हणाली. वर्ल्ड कप फायनलमध्ये श्रीलंकेविरुद्ध धोनीच्या 91 धावांच्या खेळीने किरणचं आयुष्य बदलून टाकलं. किरण त्याआधी खो-खो, कबड्डी या खेळांमध्ये जास्त रमायची. किरण मूळची सोलापुरची असून ती शेती कामामध्ये वडिलांना मदत करायची.
धोनी प्रेरणास्थान
“मी 2011 वर्ल्ड कपची फायनल बघितली. धोनीच्या विजयी षटकाराने मला प्रेरणा दिली. प्रत्येक मॅचमध्ये मी अशा प्रकारचा षटकार मारु शकते, असं मला वाटतं” असं किरण म्हणाली.
View this post on Instagram
किरणने आंतरराष्ट्रीय गोलंदाजांना चोपलं
गुरुवारी वेलोसिटीची कॅप्टन दीप्ती शर्माने तिला तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची संधी दिली. किरणने आपल्या कॅप्टनचा विश्वास सार्थ ठरवला. तिने पूनम यादव, सलमा खातून आणि राजेश्वरी गायकवाड सारख्या आंतरराष्ट्रीय गोलंदाजांच्या बॉलिंगवर मोठे फटके खेळले. सुरुवातीला मी थोडी नर्वस होते. पण कोच देविका पळशिकरच्या सल्ल्याची खूप मदत झाली, असं तिने सांगितलं.