VIDEO : मॅच संपायला 10 मिनिट उरलेली, कॅप्टनने बॅट्समनभोवती अशी फिल्डिंग लावली की सगळेच हैराण
इंग्लंडमध्ये काऊंटी चॅम्पियनशिपच्या मॅचमध्ये एक जबरदस्त दृश्य पहायला मिळालं. कॅप्टन लुईस ग्रेगरीने स्ट्राइकवर असलेल्या डॅनियल वॉरलसाठी एक वेगळाच फिल्ड सेटअप केला. हे सगळं शेवटच्या 10 मिनिटात घडलं.
इंग्लंडमध्ये काऊंटी चॅम्पियनशिप सुरु आहे. समरसेट आणि सरेमध्ये एक जबरदस्त सामना पहायला मिळाला. संपूर्ण मॅचमध्ये इंटरेस्टिंग घटना घडल्या. या मॅचच्या शेवटच्या दिवशी एक वेगळं दृश्य पहायला मिळालं. सामना संपायला फक्त 10 मिनिट उरली होती. समरसेटला विजयासाठी 1 विकेटची आवश्यकता होती. या 10 मिनिटात निकाल लागणार होता. सरेचा फलंदाज 10 मिनिट खेळून गेला असता, तर हरलेली मॅच ड्रॉ मध्ये बदलली असती. मॅचच्या शेवटच्या क्षणी एक विकेट काढण्यासाठी समरसेटने पूर्ण ताकद झोकून दिली. कॅप्टन लुईस ग्रेगरीने स्ट्राइकवर असलेल्या डॅनियल वॉरलसाठी एक वेगळाच फिल्ड सेटअप केला. डॅनियल वॉरल फलंदाजी करताना त्याला 10 फिल्डर्सनी घेरलं होतं. त्यामुळे दबावाखाली येऊन वॉरल आऊट झाला. समरसेटने हा सामना 112 धावांनी जिंकला.
समरसेटचा कॅप्टन लुईस ग्रेगरी आणि डावखुरा फिरकी गोलंदाज जॅक लीचने सामना ड्रॉ होऊ दिला नाही. ग्रेगरीने आक्रमक फिल्ड सजवलेली. ग्रेगरीने स्ट्राइकवर असलेल्या डॅनियल वॉरलला आऊट करण्यासाठी 3 स्लिप, 1 लेग स्लिप, 2 शॉर्ट लेग, 1 सिली पॉइंट, 1 शॉर्ट मिड ऑन आणि 1 फील्डर शॉर्ट कवरला ठेवला. अशा प्रकारने 10 फील्डर्सनी मिळून डॅनियल वॉरलला घेरलं. वॉरल यामुळे दबावाखाली आला. लीचच्या चेंडूवर डिफेन्स करण्याच्या नादात LBW आऊट झाला.
❤️ Cricket ❤️#SOMvSUR#WeAreSomerset pic.twitter.com/S7IrAEMezz
— Somerset Cricket (@SomersetCCC) September 12, 2024
दोघांची कमाल
समरसेटच्या या रोमांचक विजयात टीमचे स्पिनर्स जॅक लीच आणि आर्ची वॉन यांनी महत्त्वाच योगदान दिलं. इंग्लंडचा दिग्गज खेळाडू मायकल वॉनचा मुलगा आर्चीने या मॅचमध्ये एकूण 11 विकेट काढले. लीचने 9 विकेट आपल्या नावावर केले. दोघांनी मिळून 20 विकेट काढले. पहिल्या इनिंगमध्ये लीचने 4 आणि आर्चीने 5 विकेट काढले होते. दुसऱ्या इनिंगमध्ये दोघांनी 5-5 विकेट काढले. त्याच्या जबरदस्त गोलंदाजीच्या बळावर समरसेटने 112 धावांनी विजय मिळवला.