मुंबईचा मुलगा, धोनीचा शिष्य, कोण तुषार देशपांडे ज्याने टीम इंडियासाठी केले पदार्पण
टीम इंडियामध्ये आज एका तरुण खेळाडूने पदार्पण केले आहे. तुषार देशपांडे असं त्याचं नाव आहे. तुषार हा मुंबईचा राहणार आहे. पण तो सद्या धोनीचा फेव्हरेट झालाय. आयपीएलमध्ये तो चेन्नईकडून खेळतो. कशी आहे त्याची कामगिरी जाणून घ्या.
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात सुरु असलेल्या टी-20 मालिकेत अनेक युवा खेळाडूंना संधी मिळाली आहे. यादरम्यान अनेक खेळाडूंनी पदार्पण केले आहे. यात मुंबईचा मुलगा तुषार देशपांडे याचा देखील समावेश आहे ज्याने शनिवारी चौथ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघासाठी पदार्पण केले. इंडियन प्रीमियर लीगमध्ये तो चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतो. तुषारने शानदार गोलंदाजी केली आहे. 13 सामन्यात 17 विकेट त्याने घेतल्या आहेत. कोण आहे हा गोलंदाज जाणून घेऊयात.
टीम इंडियासाठी पदार्पण करणारा तुषार देशपांडे कोण?
तुषार देशपांडे हा सेमीफास्टर गोलंदाज आहे. तुषार देशपांडे हा 29 वर्षांचा आहे. त्यांचा जन्म 15 मे 1995 रोजी मुंबईत झालाय. तुषारने 2015-16 कूचबिहार ट्रॉफी दरम्यान केवळ चार सामन्यांत 21 बळी घेत मुंबई क्रिकेट सर्किटमध्ये चमकदार कामगिरी केली होते. या स्फोटक कामगिरीने क्रिकेटच्या विश्वात खळबळ उडवून दिली.
बी संघात सामील
तुषारच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याच वर्षी त्याची मुंबई रणजी संघात निवड झाली. जिथे त्याने १९ सप्टेंबरला तामिळनाडूविरुद्ध पदार्पण केले. विजय हजारे ट्रॉफीमध्ये 19 सप्टेंबर 2018 रोजी त्याने पहिला लिस्ट ए सामना खेळला. जिथे त्याने क्वार्टर फायनल मॅचमध्ये 5 विकेट घेतल्या होत्या. यानंतर त्याला ऑगस्ट 2019 मध्ये दुलीप ट्रॉफीसाठी ‘ब’ संघात स्थान मिळाले. त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीने आयपीएल फ्रँचायझींचे लक्ष वेधून घेतले. चार वर्षांपूर्वी त्याला दिल्ली कॅपिटल्सने त्याच्या 2020 हंगामासाठी त्याच्या मूळ किमतीत विकत घेतले होते. मात्र, त्याने पदार्पणाच्या मोसमात 6 सामने खेळले आणि केवळ 3 विकेट घेतल्या.
2022 मध्ये CSK मध्ये सामील
2022 च्या मेगा लिलावात चेन्नई सुपर किंग्जने त्याला 20 लाख रुपयांच्या बेस प्राईजवर खरेदी केले होते. त्या मोसमात तो एकच सामना खेळू शकला. ज्यामध्ये त्याने 2 विकेट्स घेतल्या होत्या, पण 2023 च्या मोसमात त्याने इतकी शानदार गोलंदाजी केली की सर्वांचे लक्ष वेधळे. तुषारने 16 सामन्यात 21 विकेट घेतल्या आहेत. एमएस धोनी त्याला सतत संधी देत आहे. तो धोनीचा फेव्हरेट मानला जातो.