सौरव गांगुली क्रिकेटप्रेमींना खूश करणार, राहुल द्रविडप्रमाणे सचिन तेंडुलकरच्या खांद्यावर मोठी जबाबदारी?
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) संपूर्ण क्रिकेट विश्वावर वर्चस्व आहे. बीसीसीआय हे सर्वात श्रीमंत मंडळांपैकी एक आहे. अनेक माजी दिग्गज क्रिकेटपटू बीसीसीआयमध्ये आपली सेवा देत आहेत.
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) संपूर्ण क्रिकेट विश्वावर वर्चस्व आहे. बीसीसीआय हे सर्वात श्रीमंत मंडळांपैकी एक आहे. अनेक माजी दिग्गज क्रिकेटपटू बीसीसीआयमध्ये आपली सेवा देत आहेत. माजी कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज सौरव गांगुली बीसीसीआयचा अध्यक्ष आहे. एकेकाळी टीम इंडियाची भिंत अशी ओळख असणारा राहुल द्रविड सध्या टीम इंडियाचा प्रशिक्षक आहे. त्याच वेळी, व्हीव्हीएस लक्ष्मण राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा (NCA) अध्यक्ष आहे. दरम्यान, आता सौरव गांगुलीने महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर पुन्हा भारतीय क्रिकेट संघाशी जोडला जाणार असल्याचे संकेत दिले आहेत. (Sourav Ganguly hints at Sachin Tendulkar taking up new role in Indian cricket)
सौरवचं मोठं वक्तव्य
बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला की, सचिन हा वेगळ्या प्रकारचा माणूस आहे, त्याला प्रत्येक गोष्टीत पडायचे नाही. सचिन तेंडुलकर भारतीय क्रिकेटशी कोणत्याही प्रकारे जोडला गेला तर यापेक्षा मोठी आणि चांगली बातमी दुसरी असूच शकत नाही. त्याला संघाशी संबंधित बाबींमध्ये कसं समाविष्ट करायचं ते पाहावं लागेल. तुम्ही बरोबर आहात अथवा चूक, तुम्ही काहीही करा, वाद तुमच्याशी जोडला जातो. तुम्हाला नेहमीच योग्य प्रतिभा शोधावी लागेल आणि सचिनला संघात आणण्याचा मार्ग शोधावा लागेल.
सचिन हा सर्वोत्तम फलंदाज आहे
सचिन तेंडुलकरची गणना जगातील महान फलंदाजांमध्ये केली जाते. त्याने दोन दशकांहून अधिक काळ क्रिकेट जगतावर राज्य केले आहे, त्याच्याकडे प्रचंड अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतके झळकावणारा तो एकमेव खेळाडू आहे. त्याची फलंदाजी पाहणं म्हणजे क्रिकेट रसिकांसाठी पर्वणीच असायची. सचिनने कसोटी क्रिकेटमध्ये 200 सामने खेळताना 51 शतके झळकावली आहेत. त्याचबरोबर 463 एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने 49 शतके झळकावली आहेत. चाहते त्याला प्रेमाने मास्टर ब्लास्टर म्हणतात.
टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर
भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. तिथे टीम इंडियाला तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. 26 डिसेंबरपासून कसोटी मालिका सुरू होणार आहे. त्यानंतर टीम इंडिया 19 जानेवारी 2022 पासून एकदिवसीय मालिका खेळणार आहे. बीसीसीआयने कठोर निर्णय घेत विराट कोहलीच्या जागी वनडे संघाचा कर्णधार म्हणून रोहित शर्माकडे जबाबदारी सोपवली आहे. सध्या भारतीय क्रिकेटरसिकांमध्ये विराट कोहली विरुद्ध सौरव गांगुली या वादाची चर्चा सुरु आहे.
इतर बातम्या
Asian Championship: हॉकीच्या मैदानात भारताने पाकिस्तानला लोळवलं, हरमनप्रीत-आकाशदीप ठरले हिरो
Virat Vs BCCI | ‘बास झालं, अजून ताणू नका’ कॅप्टन्सी वादावर प्रश्न विचारताच दादा वैतागला!
कार्तिक, साहा आणि पंत यांच्यात यष्टीपाठी धोनीचं सर्वोत्तम का? अश्विनने सांगितलं कारण…
(Sourav Ganguly hints at Sachin Tendulkar taking up new role in Indian cricket)