Sourav Ganguly in controversy: सौरव गांगुलीवरुन BCCI मध्ये दोन गट? पुन्हा एकदा झाला मोठा आरोप

आता पुन्हा एकदा सौरव गांगुली मोठ्या वादामध्ये सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागच्या काही महिन्यांपासून विराटने टी-20 चे कर्णधारपद सोडल्यापासून भारतीय क्रिकेटमध्ये वादांची मालिका सुरु आहे.

Sourav Ganguly in controversy: सौरव गांगुलीवरुन BCCI मध्ये दोन गट? पुन्हा एकदा झाला मोठा आरोप
Sourav Ganguly
Follow us
| Updated on: Feb 02, 2022 | 1:27 PM

मुंबई: भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याला सुरुवात होण्याआधी तत्कालिन कसोटी कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) एका विधानावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. BCCI मधून कोणीही मला टी-20 चं कर्णधारपद सोडू नकोस, असं म्हटलं नाही, असं विराटने सांगितलं. त्याआधी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) एका मुलाखतीत ‘मी विराटला कर्णधारपद सोडू नकोस, असं सांगितलं होतं’ असं म्हटलं होतं. पत्रकार परिषदेतील विराटच्या विधानामुळे नेमकं खरं कोण बोलतय, सौरव गांगुलीच्या विश्वासहर्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. आता पुन्हा एकदा सौरव गांगुली मोठ्या वादामध्ये सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागच्या काही महिन्यांपासून विराटने टी-20 चे कर्णधारपद सोडल्यापासून भारतीय क्रिकेटमध्ये वादांची मालिका सुरु आहे.

गांगुलीकडून मेसेजला रिप्लाय नाही टी-20 वर्ल्डकपपासून टीम इंडिया सुद्धा खराब फॉर्ममध्ये आहे. आता सौरव गांगुलीवरुन मोठा वाद निर्माण झाला, तर त्याचा भारतीय क्रिकेटवर निश्चित चांगला परिणाम होणार नाही. निवड समितीच्या काही बैठकांना सौरव गांगुली जबरदस्ती उपस्थित राहिल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. इनसाइडस्पोर्टने या आरोपावर सौरव गांगुलीची बाजू जाणून घेण्यासाठी त्याच्याशी व काही बीसीसीआय पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. सौरव गांगुलीने त्याला पाठवलेल्या मेसेजला प्रत्युत्तर दिलं नाही. पण अन्य बीसीसीआय पदाधिकाऱ्यांनी हे दुर्देवी असल्याचं म्हटलं आहे.

दोन पदाधिकाऱ्यांची वेगवेगळी मत बीसीसीआय निवड समितीच्या बैठकीला उपस्थित राहतो, ही चुकीची बातमी असून हा सर्व मूर्खपणा आहे, असं बीसीसीआय पदाधिकाऱ्याने म्हटलं आहे. “सौरव गांगुली जबरदस्तीने काही गोष्टी करुन घेतो. सध्या बीसीसीआयचा कारभार असाच सुरु आहे. निवड समितीच्या बैठकीला उपस्थित राहण्याची गांगुलीला काही गरज नाही. हे खूपच दुर्देवी आहे” असं दुसऱ्या एका BCCI पदाधिकाऱ्याने म्हटलं आहे. इनसाइडस्पोर्टने हे वृत्त दिलं आहे.

कशावरुन सुरु झाला वाद एका वरिष्ठ पत्रकाराच्या टि्वटवरुन हा सर्व वाद निर्माण झाला आहे. मागच्या काही काळापासून बीसीसीआयचे पदाधिकारी संघ निवडीमध्ये हस्तक्षेप करत असल्याचं टि्वट या पत्रकाराने केलं होतं. या बैठकींमध्ये आपलं काही काम नाही, हे माहित असूनही बीसीसीआयचे पदाधिकारी स्वत:च निवड समितीच्या बैठकींना उपस्थित राहतात असं या पत्रकाराचं म्हणणं होतं.

'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....