IPL 2022: दोन अनकॅप्ड भारतीय गोलंदाजांवर Sourav Ganguly प्रभावित, टीम इंडियात त्यांची जागा पक्की?

PL 2022 मध्ये काही चांगले युवा प्रतिभावान खेळाडू दिसले आहेत. टीम इंडियात त्यांना लवकरात लवकर स्थान मिळावं, यासाठी माजी क्रिकेटपटुंनी त्यांचं समर्थनही केलं आहे.

IPL 2022: दोन अनकॅप्ड भारतीय गोलंदाजांवर Sourav Ganguly प्रभावित, टीम इंडियात त्यांची जागा पक्की?
BCCI President Sourav Ganguly Image Credit source: instagram
Follow us
| Updated on: May 17, 2022 | 3:40 PM

मुंबई: टॅलेंटला संधी म्हणजे इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा. आयपीएलने अनेक युवा, अनकॅप्ड खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंसमोर स्वत:ची प्रतिभा सिद्ध करण्याचा मंच मिळवून दिला आहे. IPL 2022 मध्ये काही चांगले युवा प्रतिभावान खेळाडू दिसले आहेत. टीम इंडियात त्यांना लवकरात लवकर स्थान मिळावं, यासाठी माजी क्रिकेटपटुंनी त्यांचं समर्थनही केलं आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांना सुद्धा दोन अनकॅप्ड भारतीय खेळाडूंनी (Uncapped Indian Players) प्रभावित केलय. मिड डे दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत सौरव गांगुलीने सनरायजर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिकच कौतुक केलं. उमरान मलिकच्या वेगाची फक्त भारतातच नव्हे, तर शेजारच्या पाकिस्तानातही चर्चा होतेय. उमरानने 12 सामन्यात 18 विकेट घेतल्यात. यात एकाच सामन्यात त्याने पाच विकेटही चटकावल्या आहेत. उमरान अनकॅप्ड प्लेयर्समध्ये सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज आहे.

शेवटी सिलेक्टर्सना काय तो निर्णय घ्यायचाय

सौरव गांगुलीने राजस्थान रॉयल्सचा गोलंदाज कुलदीप सेनचही नाव घेतलं. कुलदीपने सात सामन्यात आठ विकेट घेतल्यात. डेथ ओव्हर्समधील गोलंदाजीमुळे त्याने सर्वात जास्त प्रभावित केलय. “150 KMPH किमी प्रतितास वेगाने किती जण गोलंदाजी करतात? राष्ट्रीय संघात त्यांची निवड झाल्यास, मला आश्चर्य वाटणार नाही. त्यांना खूप काळजीपूर्वक हाताळण्याची गरज आहे. उमरान वेगात गोलंदाजी करतो. मला कुलदीप सेनची गोलंदाजीही आवडली. टी.नटराजननेही कमबॅक केलं आहे. आपल्याकडे जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी सुद्धा आहेत. शेवटी सिलेक्टर्सना काय तो निर्णय घ्यायचा आहे” असं सौरव म्हणाला.

IPL मधल्या गोलंदाजांबद्दल सौरव म्हणाला…

या सीजनमध्ये गोलंदाजांनीही वर्चस्व गाजवलं, त्यावरही सौरवने भाष्य केलं. “बॉलर्सचा वर्चस्व पाहून मला आनंद झाला. मुंबई आणि पुण्यातील खेळपट्टी खूप चांगली होती. त्यावर चेंडूला चांगली उसळी मिळत होती. वेगवान गोलंदाजांच्या बरोबरीने फिरकी गोलंदाजांनीही चांगली बॉलिंग केली” असं सौरव म्हणाला.

हे सुद्धा वाचा

आयपीएलचा सीजन संपल्यानंतर भारताची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच टी 20 सामन्याची मालिका होणार आहे. त्यानंतर इंग्लंडचा दौरा आहे.

'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.