श्रीलंकेत नाही, तर कुठे खेळला जाणार आशिया कप? सौरव गांगुलीने दिली महत्त्वाची माहिती
यावर्षी ऑगस्ट मध्ये आशिया कप (Asia Cup) स्पर्धा होणार आहे. पण मागच्या काही दिवसांपासून या स्पर्धेबद्दल संशयाचं धुकं निर्माण झालं आहे.
मुंबई: यावर्षी ऑगस्ट मध्ये आशिया कप (Asia Cup) स्पर्धा होणार आहे. पण मागच्या काही दिवसांपासून या स्पर्धेबद्दल संशयाचं धुकं निर्माण झालं आहे. याचं कारण आहे, श्रीलंकेतील (Srilanka) राजकीय स्थिती. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे अध्यक्ष सौरव गांगुली (sourav ganguly) यांनी आता या स्पर्धेबद्दल महत्त्वाची माहिती दिलीय. आशिया कप स्पर्धा आता संयुक्त अरब अमिराती मध्ये खेळली जाणार आहे. याआधी स्पर्धेच आयोजन श्रीलंकेमध्ये होणार होतं. गांगुलीने बोर्डाच्या शीर्ष परिषदेच्या बैठकीत ही माहिती दिली. आशिया कप स्पर्धा आता संयुक्त अरब अमिराती मध्ये होईल. कारण तिथे पाऊस होत नाहीय. गांगुलीने पत्रकारांनी ही माहिती दिली.
SLC ने दिली होती माहिती
श्रीलंकन क्रिकेटने बुधवारी आशियाई क्रिकेट परिषदेला सूचित केलं. देशातील आर्थिक आणि राजकीय संकटामुळे आशिया कप टी 20 स्पर्धा आयोजित करता येणार नाही. श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने विद्यमान संकटामुळे लंका प्रीमियर लीगचा तिसरा टप्पाही स्थगित केला होता. आशिया कप स्पर्धेच आयोजन 27 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर दरम्यान होणार आहे.
श्रीलंकेत सध्या आर्थिक संकट
देशातील आर्थिक आणि राजकीय संकटामुळे श्रीलंका आशिया कप टी 20 स्पर्धेच आयोजन करु शकत नाही. त्यांनी आशियाई क्रिकेट परिषदेला तसं कळवलं आहे, असं पीटीआयने बुधवारी वृत्त दिलं होतं. श्रीलंका सध्या आर्थिक संकटाला तोंड देत आहे. त्यामुळे श्रीलंका क्रिकेटनं आशिया कप 2022 T20 क्रिकेटचे आयोजन करण्यास नकार दिला आहे. श्रीलंका क्रिकेटनं बुधवारी आशिया क्रिकेट परिषदेला ही माहिती दिली. तो म्हणाला की, आर्थिक आणि राजकीय कारणांमुळे तो T20 आशिया चषक आयोजित करण्याच्या स्थितीत नाही. आर्थिक संकटामुळे श्रीलंका प्रीमियर लीगचा तिसरा टप्पाही पुढे ढकलण्यात आली आहे.