IND vs SA: भारत दौऱ्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर, Mumbai Indians मधून खेळणाऱ्या एकाला संधी, दुसऱ्याला स्थान नाही

भारताने या मालिकेसाठी अजून संघ जाहीर केलेला नाही. पण दक्षिण आफ्रिकेने भारत दौऱ्यासाठी टीम जाहीर केली आहे. टेंबा बावुमा दक्षिण आफ्रिकेच्या टी-20 संघाचा कॅप्टन असेल.

IND vs SA: भारत दौऱ्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ जाहीर, Mumbai Indians मधून खेळणाऱ्या एकाला संधी, दुसऱ्याला स्थान नाही
Follow us
| Updated on: May 17, 2022 | 7:42 PM

मुंबई: इंडियन प्रिमीयर लीगचा (IPL) सीजन संपल्यानंतर भारताची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच टी-20 सामन्यांची मालिका (IND vs SA T 20 Series) होणार आहे. भारताने या मालिकेसाठी अजून संघ जाहीर केलेला नाही. पण दक्षिण आफ्रिकेने भारत दौऱ्यासाठी टीम जाहीर केली आहे. टेंबा बावुमा दक्षिण आफ्रिकेच्या टी-20 संघाचा कॅप्टन असेल. एनरिच नॉर्खिया, वेन पार्नेल यांनी टीममध्ये कमबॅक केलं आहे. पण डेवाल्ड ब्रेव्हीसला (Dewald Bravis) दक्षिण आफ्रिकेच्या संघात स्थान मिळालेलं नाही. डेवाल्ड ब्रेव्हीसला बेबी एबी म्हणतात. कारण त्याची फलंदाजीची शैली एबी डिविलियर्स सारखी आहे. सध्या डेवाल्ड मुंबई इंडियन्सकडून खेळतोय. तो एक आक्रमक फलंदाज आहे. वेगाने धावा बनवण्याची त्याची क्षमता आहे. यावर्षीच ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. त्या दृष्टीने हा दौरा दोन्ही देशांसाठी महत्त्वाचा आहे. दक्षिण आफ्रिकेची 2021 आयसीसी टी-20 वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये प्रवेशाची संधी थोडक्यात हुकली होती.

कधी सुरु होणार दौरा

9 ते 19 जून दरम्यान भारतात पाच वेगवेगळ्या ठिकाणी ही पाच सामन्यांची मालिका होणार आहे. मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या ट्रिस्टन स्टब्बसचा दक्षिण आफ्रिकेच्या संघात समावेश करण्यात आला आहे.

मुंबई इंडियन्सकडून खेळणारा तो खेळाडू कोण?

“ट्रिस्टनने दक्षिण आफ्रिकेतील स्थानिक टी 20 स्पर्धेत आपल्या खेळाने लक्ष वेधून घेतलं होतं. त्याने सात डावात 48.83 च्या सरासरीने 293 धावा केल्या होत्या. 183.12 त्याचा स्ट्राइक रेट होता. यात 23 सिक्स होते. झिम्बाब्वे दौऱ्यावर गेलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या अ संघाचाही तो भाग होता. सध्या तो मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतोय. मुंबई इंडियन्ससाठी त्याचा हा पहिलाच सीजन आहे” अशी माहिती क्रिकेट दक्षिण आफ्रिकेकडून देण्यात आली आहे.

एनरिच नॉर्खियाच पुनरागमन

एनरिच नॉर्खियाने सुद्धा बऱ्याच महिन्यानंतर राष्ट्रीय संघात पुनरागमन केलं आहे. डिसेंबर 2021 पासून दुखापतीमुळे तो संघाबाहेर होता. सध्या तो आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळतोय. 2017 सालच्या इंग्लंड दौऱ्यानंतर वेन पार्नेल दक्षिण आफ्रिकेच्या टी 20 संघात पुनरागमन करतोय.

भारत दौऱ्यावर येणारा दक्षिण आफ्रिकेचा संघ

टेंबा बावुमा (कॅप्टन), क्विंटन डि कॉक, रीझा हेंड्रीक्स, हीनरीच क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेविड मिलर, लुंगी निगिडी, एनरिच नॉर्खिया, वेन पार्नेल, डे्वयन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, तबरेज शमसी, ट्रिस्ट स्टब्बस, रासी वॅन डर डुसें, मार्को जॅनसेन,

मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.