SA vs BAN: रूसो-नॉर्खियाच्या वादळात बांग्लादेशचा धुव्वा, दक्षिण आफ्रिकेचा मोठा विजय

SA vs BAN: आज दुसऱ्यासामन्यात दक्षिण आफ्रिकेने ती कसर भरुन काढली. या फलंदाजाकडून मैदानात चौकार-षटकारांचा पाऊस.

SA vs BAN: रूसो-नॉर्खियाच्या वादळात बांग्लादेशचा धुव्वा, दक्षिण आफ्रिकेचा मोठा विजय
SA vs BANImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Oct 27, 2022 | 1:10 PM

सिडनी: पहिल्या सामन्यात पाऊस दक्षिण आफ्रिकेच्या टीमसाठी खलनायक ठरला होता. पावसामुळे त्यांना विजयाचा आनंद मिळवता आला नव्हता. अखेर आज दुसऱ्यासामन्यात दक्षिण आफ्रिकेने ती कसर भरुन काढली. सिडनीमध्ये आज सामना झाला. या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेने बांग्लादेशवर 104 धावांनी मोठा विजय मिळवला. दक्षिण आफ्रिकेने अक्षरक्ष: बांग्लादेशचा धुव्वा उडवला.

त्यांचा संघ सतत बॅकफूटवरच होता

दक्षिण आफ्रिकेने प्रथम बॅटिंग केली. त्यांनी 205 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरात बांग्लादेशचा डाव 101 धावात आटोपला. बांग्लादेशचा डाव 16.3 षटकात आटोपला, राइली रुसो आणि नॉर्खियाच्या वादळात बांग्लादेशची टीम टीकू शकली नाही. त्यांचा संघ सतत बॅकफूटवरच होता.

कोणी निश्चित केला दक्षिण आफ्रिकेचा विजय?

राइली रुसोने दक्षिण आफ्रिकेचा विजय सुनिश्चित केला. त्याने 56 चेंडूत 109 धावा फटकावल्या. त्याने 8 षटकार आणि 7 चौकारांचा पाऊस पाडला. रुसोशिवाय क्विंटन डि कॉकने 38 चेंडूत 63 धावा फटकावल्या. त्याने 3 षटाकर आणि 7 चौकार लगावले. या दोघांनंतर नॉर्खियाने 10 धावात 4 विकेट काढल्या. तबरेज शम्सीने 20 धावात 3 विकेट काढल्या.

दक्षिण आफ्रिकेची तुफानी फलंदाजी

दक्षिण आफ्रिकेच्या टीमने टॉस जिंकून पहिली फलंदाजी स्वीकारली. त्यांची सुरुवात खराब झाली. कॅप्टन टेंबा बावुमा अवघ्या 2 रन्सवर आऊट झाला. त्यानंतर डिकॉक आणि रुसोने शतकी भागीदारी केली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 168 धावा जोडल्या. टी 20 वर्ल्ड कपच्या इतिहासातील ही सर्वात मोठी भागीदारी आहे.

बांग्लादेशची फ्लॉप बॅटिंग

बांग्लादेशच्या फलंदाजीत आज सुरुवातीपासूनच सातत्य नव्हतं. नजमुल हुसैन शांतो फक्त 9 रन्सवर नॉर्खियाच्या चेंडूवर बोल्ड झाला. सौम्य सरकारने 6 चेंडूत 15 धावा केल्या. वेगाने धावा बनवण्याच्या प्रयत्नात तो सुद्धा नॉर्खियाच्या चेंडूवर आऊट झाला. लिट्टन दासने 31 चेंडूत 34 धावा केल्या. पण दक्षिण आफ्रिकेचा वेगवान आणि फिरकी गोलंदाज तबरेज शम्सीने बांग्लादेशला कुठलीही संधी दिली नाही.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.