IND vs SA | ‘काहीवेळा चांगली माणस सुद्धा वाईट…’, दक्षिण आफ्रिकेचे कोच संतापले, कोणाला बोलले?
IND vs SA | टीम इंडियाकडून दुसऱ्या कसोटी सामन्यात पराभव झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या कोचने परखडपणे आपल मत मांडलं. आपल्या मनातील भावना स्पष्टपणे व्यक्त केल्या. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेमधील दुसरा कसोटी सामना अवघ्या 2 दिवसात निकाली निघाला.
IND vs SA | टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेमधील दुसरा कसोटी सामना अवघ्या 2 दिवसात संपला. केपटाऊनची विकेट रडारवर आहे. टेस्ट मॅच दोन दिवसात संपत असेल, तर केपटाऊनच्या पीचवर प्रश्नचिन्ह निर्माण होणं स्वाभाविक आहे. अनेक एक्सपर्ट्सनी या पीचवर टीका केली आहे. फक्त भारतीयच या विकेटवर टीका करतायत असं नाहीय, दक्षिण आफ्रिकेचे कोच शुक्री कॉनराड यांनी सुद्धा ताशेरे ओढले आहेत. दोन्ही टीम्समधील हा सर्वात छोटा कसोटी सामना ठरला. फक्त 107 ओव्हरमध्ये ही टेस्ट मॅच संपली. वनडेपेक्षा फक्त 7 ओव्हर जास्त.
“मी काय बोलाव? अशी लोकांची इच्छा आहे, हे मला समजत नाहीय. तुम्ही स्कोरकडे बघा. दीड दिवसाचा कसोटी सामना. तुम्हाला पहावा लागेल, त्यांनी 80 धावांचा पाठलाग कसा केला. कौशल्यापेक्षा तुम्हाला भाग्याची जास्त आवश्यकता लागते, ही स्थिती खूप दु:खद आहे. टेस्ट क्रिकेटमधील सर्व नैतिकता आणि मुल्य संपत चालली आहेत” अशा शब्दात दक्षिण आफ्रिकेचे कोच शुक्री कॉनराड यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या.
‘म्हणून ते मूर्ख ग्राऊंडसमन ठरत नाही’
सेंच्युरियनची खेळपट्टी फार चांगली होती असं नाहीय. पण दक्षिण आफ्रिकेला 400 धावांचा टप्पा ओलांडण जमलं. पण केपटाऊनमध्ये बॉलचा गुड लेंग्थवर पडल्यानंतर फलंदाजांची वाट लागत होती. केपटाऊनचा पीच चांगला नव्हता हे शुक्री कॉनराड यांनी मान्य केलं. त्यांनी न्यूलँड्सचे हेड क्यूरेटर ब्राम मोंग यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली. “मी ब्राम मोंग यांना ओळखतो. तो चांगला माणूस आहे. पण काहीवेळा चांगली माणस वाईट गोष्टी करतात किंवा चूका करतात. म्हणून ते मूर्ख ग्राऊंडसमन ठरत नाही. त्यांना यातून बरच काही शिकता येईल. त्याला सुद्धा चांगली विकेट तयार करायची होती. पण त्याने गरजेपेक्षा जास्त विकेट तयार केली” असं शुक्री कॉनराड म्हणाले.
टीम इंडियाच स्वप्न अपूर्णच
केपटाऊन टेस्ट जिंकल्यामुळे टीम इंडियाला सीरीजमध्ये बरोबरी साधता आली. सेंच्युरीयनमध्ये पहिल्या कसोटीत टीम इंडियाचा पराभव झाला होता. टीम इंडियाने ही मालिका 1-1 अशी बरोबरीत सोडवली. पण दक्षिण आफ्रिकेत टेस्ट सीरीज जिंकण्याच टीम इंडियाच स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही.