SA vs WI : दक्षिण आफ्रिकेने करुन दाखवलं त्याला म्हणतात क्रिकेटमधला तुफानी विजय, VIDEO
SA vs WI : वेस्ट इंडिजने दिलेलं टार्गेट सोपं नव्हतं. पण दक्षिण आफ्रिकेच्या टीमने T20 क्रिकेटमध्ये अशक्य काहीच नाहीय, हे सिद्ध केलं. सीरीजमधील दुसऱ्या टी 20 सामन्यात रेकॉर्ड्सचा अक्षरक्ष: पाऊस पडला. तुफानी फटकेबाजी हे या मॅचच वैशिष्ट्य ठरलं.
SA vs WI 2nd T20 : दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजच्या टीममध्ये रविवारी सुपरस्पोर्ट पार्कच्या मैदानात दुसरा टी 20 सामना खेळला गेला. या मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या टीमने तुफानी खेळ कशाला म्हणतात, ते दाखवून दिलं. दक्षिण आफ्रिकेच्या टीमने वेस्ट इंडिजला फक्त 6 विकेटनेच हरवलं नाही, तर रेकॉर्ड विजय मिळवला. वेस्ट इंडिजने या मॅचमध्ये पहिली बॅटिंग केली. त्यांनी चार विकेट गमावून 259 धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून जॉन्सन चार्ल्सने 46 चेंडूत 118 धावा फटकावल्या. पण त्याच्या या खेळीवर क्विंटन डि कॉकच शतक भारी पडलं.
दक्षिण आफ्रिकेने सात चेंडू आधीच विजयी लक्ष्य गाठून इतिहास रचला. टी 20 इंटरनॅशनलमध्ये कुठल्याही टीमने लक्ष्याचा पाठलाग करताना मिळवलेला हा सर्वात मोठा विजय आहे.
याला म्हणतात ओपनिंग पार्ट्नरशिप
क्विंटन डिकॉक आणि त्याचा ओपनिंग जोडीदार रीजा हॅड्रीक्सने दक्षिण आफ्रिकेच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. डिकॉकने 44 चेंडूत 100 धावा फटकावल्या. यात 9 चौकार आणि 8 षटकार होते. रीजाने 28 चेंडूत 11 चौकार आणि दोन सिक्सच्या मदतीने 68 धावा केल्या. अखेरीस कॅप्टन एडन मार्करामने नाबाद 38 धावा फटकावून टीमला विजय मिळवून दिला.
रेकॉर्ड्सचा पाऊस
या मॅचमध्ये दोन्ही टीम्सनी रेकॉर्ड्सचा पाऊस पाडला. टी 20 क्रिकेटच्या इतिहासात हा सर्वाधिक धावांचा यशस्वी पाठलाग आहे. डिकॉकने या मॅचमध्ये अवघ्या 15 चेंडूत अर्धशतक झळकावलं. त्यानंतर डिकॉकने 43 चेंडूत शतक पूर्ण केलं. हे टी 20 मधील त्याचं वेगवान शतक आहे. दक्षिण आफ्रिकेकडून टी 20 मधील हे दुसरं वेगवान शतक आहे.
याआधी डेविड मिलरने 35 चेंडूत शतक झळकावलं होतं. बांग्लादेश विरुद्ध त्याने ही शतकी खेळी केली होती. टी 20 इंटरनॅशनलमधील हे वेगवान शतक आहे. याच मॅचमध्ये चार्ल्सने 39 चेंडूत शतक झळकावलं. वेस्ट इंडिजकडून टी 20 मधील हे वेगवान शतक आहे. चार्ल्स चांगला खेळला पण टीम जिंकू शकली नाही.
That was special ?#SAvWI #BePartOfIt pic.twitter.com/rruu4aYa0h
— Proteas Men (@ProteasMenCSA) March 26, 2023
पावरप्लेमध्ये 102 रन्स
वेस्ट इंडिजने दिलेल्या टार्गेटचा पाठलाग करताना दमदार सुरुवातीची गरज होती. डिकॉक आणि हेड्रिक्सने मिळून तशी सुरुवात दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 152 धावा जोडल्या. त्यांनी पावरप्लेमध्ये 102 धावा ठोकल्या. टी 20 इंटरनॅशनमलध्ये पावरप्लेमध्ये कुठल्याही टीमने केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत. वेस्ट इंडिजकडून सिक्सचा रेकॉर्ड
वेस्ट इंडिजने या मॅचमध्ये एकूण 22 सिक्स मारले. टी 20 इंटरनॅशनलच्या एका मॅचमध्ये सर्वाधिक सिक्स मारण्याच्या रेकॉर्डची त्यांनी बरोबरी केली. चार्ल्स शिवाय वेस्ट इंडिजच्या काइल मायेर्सने 27 चेंडूत 5 चौकार आणि चार सिक्ससह 51 धावा फटाकवल्या. वेस्ट इंडिजच्या टीमने 22 सिक्स मारले. दक्षिण आफ्रिकेच्या टीमने 15 सिक्स मारले. सात सिक्स कमी मारुनही दक्षिण आफ्रिकेने 7 चेंडूआधीच विजयी लक्ष्य गाठलं.