ODI World Cup 2023 | काय सांगता? प्रसिद्ध बॉलरने वर्ल्ड कपच्या टॉप 5 बॉलर्समध्ये बुमराहला नाही दिलं स्थान
ODI World Cup 2023 | 'या' गोलंदाजापासून संभाळून राहण्याचा रोहित शर्माला दिला सल्ला. या दिग्गज गोलंदाजाने रोहित शर्माचा गोलंदाजी करण सोप नव्हतं, हे सुद्धा मान्य केलं. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये कुठले पाच बॉलर घातक ठरतील? त्याने कोणाची निवड केलीय? जाणून घ्या.
मुंबई : सध्या सर्वत्र वर्ल्ड कपची चर्चा आहे. येत्या 5 ऑक्टोबरपासून वनडे वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. यंदा भारत वर्ल्ड कपच यजमानपद भूषवत आहे. वेगवेगळ्या देशांच्या टीम्स वर्ल्ड कप टुर्नामेंटसाठी भारतात दाखल होत आहेत. या दरम्यान सर्वसामान्यांपासून माजी दिग्गज क्रिकेटपटू यंदाच्या वनडे वर्ल्ड कपमध्ये कोण सरस ठरणार? कुठली टीम वर्ल्ड कप जिंकणार? कुठले फलंदाज लक्षवेधी ठरतील? कुठले गोलंदाज दहशत निर्माण करतील? या बद्दल विविध अंदाज वर्तवतायत. भविष्यवाणी सुरु आहे. वनडे वर्ल्ड कप भारतात होत असल्याने टीम इंडियाकडून चाहत्यांना भरपूर अपेक्षा आहेत. घरच्या वातावरणात खेळण्याचा टीम इंडियाला नक्कीच फायदा मिळेल. कारण टीम इंडियाच्या खेळाडूंना भारतीय खेळपट्ट्यांचा चांगला सराव आहे. टीम इंडियाने पुन्हा एकदा वनडे वर्ल्ड कप जिंकावा अशी तमाम क्रिकेट चाहत्यांची इच्छा आहे. याआधी एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली 2011 साली टीम इंडियाने शेवटचा वनडे वर्ल्ड कप जिंकला होता.
वनडे वर्ल्ड कपला सुरुवात होण्याआधी एक दिग्गज माजी वेगवान गोलंदाजाने आपली काही मत व्यक्त केली आहेत. नकुत्याच एका मुलाखतीत टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने एक गोष्ट प्रामाणिकपणे मान्य केली. करीयरमध्ये डेल स्टेनची गोलंदाजी खेळणं सोप नव्हतं. माझ्यासाठी तो सर्वात अवघड गोलंदाज ठरला, असं रोहितने म्हटलं. त्यावर डेल स्टेनने सुद्धा रोहित शर्माला गोलंदाजी करणं सोप नव्हतं. फार कमीवेळा त्याच्याविरुद्ध यश मिळालं, हे प्रामाणिपणे मान्य केलं. .यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मा कुणाची गोलंदाजी जास्त संभाळून खेळावी, त्याबद्दल सुद्धा डेल स्टेनने रोहित शर्माला सल्ला दिलाय. या वर्ल्ड कपमध्ये कुठले पाच गोलंदाज घातक ठरतील, त्याबद्दल डेल स्टेनने भाष्य केलय. पाकिस्तानच्या शाहीन शाह आफ्रिदीचा सामना करताना जास्त काळजी घे, असा सल्ला स्टेनने रोहितला दिलाय. रोहित आणि शाहीन शाह आफ्रिदीचा आतापर्यंत तीन वनडेमध्ये आमना-सामना झाला. 2018 आशिया कप आणि 2023 मध्ये दोनदा आमने-सामने आले. रोहितने शाहीन शाह आफ्रिदीविरुद्ध 42 चेंडूत 33 धावा केल्या. त्यात तो एकदा बाद झाला. बुमराह ऐवजी टीम इंडियाच्या दुसऱ्या गोलंदाजाच घेतलं नाव
डेल स्टेनने वर्ल्ड कपमध्ये कुठले पाच गोलंदाज घातक ठरतील, त्या बद्दल मत व्यक्त केलं. त्यात त्याने टीम इंडियाचा अव्वल गोलंदाज जसप्रीत बुमराहचा समावेश केलेला नाही. बुमराहच्या जागी त्याने टीम इंडियाचा दुसरा फास्ट बॉलर मोहम्मद सिराजची निवड केली. सिराज चेंडू स्विंग करतो, त्यामुळे तो जास्त घातक आहे असं स्टेनने म्हटलय. अन्य तीन गोलंदाजांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा कागिसो रबाडा, न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट आणि इंग्लंडच्या मार्क वूडचा समावेश केलाय. पण त्याने जसप्रीत बुमराहच नाव घेतलं नाही.