IPL 2023 मध्ये मुंबई इंडियन्सकडून मोठी चूक? ‘त्याने’ 7 व्या नंबरवर येऊन 7 SIX मारुन फिरवली मॅच
IPL 2023 मध्ये मुंबई इंडियन्सने 'या' प्लेयरला अख्खा सीजन बेंचवर बसवून ठेवलं. महत्वाच म्हणजे 155 धावांव टीमच्या 6 विकेट गेल्या होत्या. तेव्हा तो फलंदाजीसाठी मैदानात उतरला.
नवी दिल्ली : मागच्याच आठवड्यात IPL 2023 चा सीजन संपला. या सीजनमध्ये मुंबई इंडियन्सने दमदार कामगिरी केली. मागच्या मोसमामध्ये मुंबई इंडियन्सची टीम पॉइंट्स टेबलमध्ये तळाला होती. तेच या सीजनमध्ये मुंबई इंडियन्स तिसऱ्या स्थानावर राहिली. क्वालिफायर 2 च्या सामन्यात गुजरात टायटन्सने मुंबई इंडियन्सचा पराभव केला. त्यामुळे मुंबई इंडियन्सच टुर्नामेंटमधील आव्हान संपुष्टात आलं. मुंबई इंडियन्सने या सीजनमध्ये एका प्लेयरल संधी दिली नाही.
मागच्या सीजनमध्ये या खेळाडूने आपल्या बॅटची ताकत दाखवून दिली होती. आयपीएल 2023 च्या सीजनमध्ये मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये ज्यांना संधी मिळाली, त्यांनी दमदार परफॉर्मन्स दिला. त्यामुळे टीमममध्ये फारसे बदल दिसले नाहीत.
काय आहोत? हे पुन्हा एकदा दाखवून दिलं
मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटने ज्या प्लेयरला संधी दिली नाही, त्याने नुकत्याच एका सामन्यात आपली क्षमता दाखवून दिली. त्याला संधी दिली असती, तर कदाचित अजून चांगला निकाल दिसला असता. या प्लेयरच नाव आहे, डेवाल्ड ब्रेविस. दक्षिण आफ्रिकेचा हा उदयोन्मुख क्रिकेटर आहे. त्याला सगळे बेबी एबी म्हणतात. श्रीलंका ‘ए’ टीम विरुद्ध खेळताना या बेबी एबीने आपण काय आहोत? हे पुन्हा एकदा दाखवून दिलं.
असं करण्यासाठी हिम्मत पाहिजे
डेवाल्ड ब्रेविसने 7 व्या नंबरवर येऊन 7 सिक्स मारले. अशी कामगिरी करणं त्याच्यासाठी मोठी बाब नसली, तरी त्याने ज्या कडीशन्समध्ये हे काम केलं, ते खास आहे. असं करण्यासाठी हिम्मत पाहिजे, जी डेवाल्ड ब्रेविसने दाखवली.
संकटमोचक बनून टीमसाठी धावून आला
श्रीलंका अ आणि दक्षिण आफ्रिका अ या दोन्ही टीम्समध्ये अनधिकृत वनडे सामना झाला. श्रीलंका ए ने पहिली बॅटिंग करताना 50 ओव्हर्समध्ये 8 विकेटवर 264 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी 265 धावांच टार्गेट होतं. फक्त 155 रन्सवर दक्षिण आफ्रिका अ टीमच्या 6 विकेट गेल्या होत्या. टीम संकटात होती. त्यावेळी डेवाल्ड ब्रेविस संकटमोचक बनून टीमसाठी धावून आला.
RESULT | SA ‘A’ WON BY 4 WICKETS ?
?? 264/8 (L. Sipamla 3/33) ?? 268/6 (D. Brevis 98* | B. Swanepeol 43* | K. Petersen 42)
? SLC#BePartOfIt pic.twitter.com/oBpFkYgOhv
— Proteas Men (@ProteasMenCSA) June 4, 2023
चौकार कमी आणि सिक्स जास्त
डेवाल्ड ब्रेविस 7 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. तो शेवटपर्यंत मैदानावर टिकला व टीमला विजयाच्या समीप घेऊन गेला. डेवाल्ड ब्रेविसने 71 चेंडूत नाबाद 98 धावा केल्या. त्याच्या खेळीत चौकार कमी आणि सिक्स जास्त होते. त्याने 6 फोर आणि 7 सिक्स मारले. दक्षिण आफ्रिका ए ने जिंकला सामना
डेवाल्ड ब्रेविसच शतक भले 2 धावांनी हुकलं असेल, पण तो आपल्या टीमला विजयाच्या समीप घेऊन गेला. त्याच्याकडे दक्षिण आफ्रिकेचा एबी डिविलियर्स म्हणून पाहिलं जातं. ब्रेविसच्या तुफानी बॅटिंगच्या बळावर दक्षिण आफ्रिका ए ने हा सामना 4 विकेटने जिंकला.