IND vs SA: द. आफ्रिकेचे फिरकीपटू अश्विन-चहलपेक्षा लय भारी!, ऋषभ पंतने सांगितली भारताच्या पराभवाची खरी कारणं
सुमार गोलंदाजी आणि अपेक्षेपेक्षा कमी झालेल्या धावा यामुळे दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने (IND vs SA) भारताचा सात विकेट राखून पराभव केला. भारताने कसोटी पाठोपाठ एकदिवसीय मालिकाही (ODI Series) गमावली आहे.
पार्ल : सुमार गोलंदाजी आणि अपेक्षेपेक्षा कमी झालेल्या धावा यामुळे दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने (IND vs SA) भारताचा सात विकेट राखून पराभव केला. भारताने कसोटी पाठोपाठ एकदिवसीय मालिकाही (ODI Series) गमावली आहे. दक्षिण आफ्रिकेने मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. आता शेवटची वनडे रविवारी होणार आहे. भारताने विजयासाठी दिलेले 288 धावांचे लक्ष्य दक्षिण आफ्रिकेने अगदी आरामात पार केले. दरम्यान, दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 85 धावांची आक्रमक खेळी करणाऱ्या ऋषभ पंतने (Rishabh Pant) भारताच्या पराभवाची कारणं सांगितली आहेत. पंतच्या मते, दक्षिण आफ्रिकेच्या मधल्या फळीतील फलंदाजीमुळे दोन्ही संघांमध्ये मोठा फरक पडला.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना देखील पार्लमध्येच खेळण्यात आला होता. ज्यामध्ये यजमानांनी पाहुण्या भारतीय संघाचा 31 धावांनी पराभव केला. यानंतर दुसऱ्या वनडेत भारताकडून पुनरागमन अपेक्षित होते. मात्र स्कोअर बोर्डवर 287 धावा लावूनही भारताला विजय मिळवता आला नाही. ऋषभ पंतने सामन्यानंतर कबूल केले की पार्लच्या संथ विकेटवर 287 धावा पुरेशा होत्या, तरीही आम्ही हरलो.
दक्षिण आफ्रिकेने मधल्या षटकांत वेगळा खेळ केला
पंत म्हणाला, “पहिल्या वनडेत आम्ही पाठलाग केला. दुसऱ्या वनडेत आम्ही प्रथम फलंदाजी केली. पहिल्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी केली तेव्हा फलंदाजीसाठी विकेट (खेळपट्टी) योग्य होती. पण, दुसऱ्या डावात खेळपट्टीचा वेग कमी झाला. दुसऱ्या वनडेतही तेच पाहायला मिळाले. पण दक्षिण आफ्रिकेने मधल्या षटकांमध्ये चांगली फलंदाजी केल्यामुळे त्यांना एकूण 287 धावांचे आव्हान पूर्ण करण्यात यश आले. तसेच, मधल्या षटकांमध्ये विकेट घेण्यात आम्हाला अपयश आले.
अश्विन आणि चहलपेक्षा दक्षिण आफ्रिकेचे फिरकी गोलंदाज सरस
पंतने भारतीय गोलंदाजीतील त्रुटी मोजतानाच अश्विन आणि चहल यांच्यापेक्षा दक्षिण आफ्रिकेच्या फिरकी गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केल्याचे मान्य केले. तो म्हणाला की, “केशव महाराज, एडन मार्कराम आणि तबरेझ शम्सी यांनी चांगल्या लाईन लेंथवर गोलंदाजी केली, ज्याचा त्यांना फायदा झाला. तसेच अशा प्रकारच्या स्थितीत खेळण्याची त्यांना सवय आहे.
पराभवामागचे सर्वात मोठे कारण
भारतीय संघ खूप मोठ्या कालावधीनंतर एकदिवसीय क्रिकेट खेळतोय. त्याचा भारतीय खेळाडूंच्या कामगिरीवर, मैदानातील खेळावर खूप फरक पडला. पंत म्हणाला, “आम्ही खूप दिवसांनी वनडे खेळत आहोत. अशा परिस्थितीत संघाबद्दल बरेच काही सांगता येईल. आम्हाला फक्त आमल्या चुका सुधारायच्या आहेत. आशा आहे की येत्या सामन्यांमध्ये आम्ही आमच्या चुका सुधारून सावरू.”
इतर बातम्या
IND vs SA, 2nd ODI: भारताने कसोटी पाठोपाठ वनडे मालिकाही गमावली
IPL 2022 आयोजनासंबंधी BCCI ची शनिवारी मोठी बैठक, होणार महत्त्वाचे निर्णय
IND vs SA, Virat Kohli: शुन्यावर आऊट झाल्यानंतरही विराट कोहलीचा ड्रेसिंग रुममध्ये डान्स पाहा VIDEO
(South Africa spinners were more consistent in their lines and lengths, says Rishabh Pant)