SA vs AUS | आज दुसऱ्या सेमीफायनलला पावसाचा धोका, मॅच रद्द झाली तर कोणाला मिळेल फायनलच तिकीट?
SA vs AUS ICC ODI World cup 2023 second Semifinal Match | वर्ल्ड कप 2023 च्या दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात पावसाचा अडथळा येऊ शकतो. आकाशात ढगांची दाटी असेल, पावसामुळे सामना रद्द झाला, तर फायनलच तिकीट कोणाला? हा प्रश्न आहे.
कोलकाता : वर्ल्ड कप 2023 मध्ये पहिला सेमीफायनल सामना रोमांचक ठरला. पण दुसऱ्या सेमीफायनलवर पावसाच सावट आहे. दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात पावसाचा अडथळा येऊ शकतो. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये दुसरा सेमीफायनल सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर होणार आहे. पण या सामन्याला पावसापासून धोका आहे. दुसरा सेमीफायनल सामना होणार की नाही हा मुख्य प्रश्न आहे. मॅच झाली तर ठीक. पण पावसाने पाणी फिरवलं तर काय?. दक्षिण आफ्रिका-ऑस्ट्रेलियामध्ये फायनलच तिकीट कोणाला मिळेल?. वर्ल्ड कप सेमीफायनल सामना असल्याने विषय गंभीर आहे.
सेमीफायनल मॅचमध्ये कुठल्याही टीमला पराभव परवडणारा नाहीय. कारण एका पराभवामुळे आव्हान संपुष्टात येऊ शकते. रिझल्ट आधी पाऊस पडला आणि मॅच रद्द झाली, तर फायनलिस्ट कोण? याचा निर्णय होईल पण क्रिकेट चाहत्यांच्या मनात एक प्रश्न नक्कीच असेल. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियात आज 16 नोव्हेंबरला सेमीफायनल मॅच होणार आहे. हवामानाची माहिती देणाऱ्या वेबसाइटनुसार, कोलकात्यात पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. सध्या 25 टक्के पावसाचा अंदाज आहे. आकाशात ढगांची दाटी असेल.
….तर, मग फायनलच तिकीट कोणाला?
ICC ने सर्व नॉकआऊट सामन्यासाठी एक रिजर्व डे ठेवला आहे. म्हणजे आज पावसामुळे सामना झाला नाही, तर एक रिझर्व्ह डे असेल. दुसऱ्यादिवशी सुद्धा पाऊस झाला, तर काहीही करुन 20-20 ओव्हरची मॅच खेळवण्याचा प्रयत्न होईल. पण रिजर्व डे च्या दिवशी सुद्धा 20-20 ओव्हर्सची मॅच झाली नाही तर काय? अशा स्थितीत ICC लीग राऊंडमधील पॉइंट्स टेबलच्या रँकिंगच्या आधारावर फायनलिस्ट ठरवेल. त्या आधारावर दक्षिण आफ्रिकेला फायनलच तिकीट मिळू शकतं. पॉइंट्स टेबलमध्ये ते दुसऱ्या स्थानावर आहेत.