IND vs SA: हेड कोच राहुल द्रविड यांना ‘घंटा’ वाजवण्याचा मान

गोलंदाजांच्या दमदार कामगिरीमुळे सेंच्युरियन कसोटीत भारतीय संघ चांगल्या स्थितीत आहे. आज सकाळच्या सत्रात भारताने दोन विकेच लवकर गमावले असले, तरी सध्या भारताकडे 200 पेक्षा जास्त धावांची आघाडी आहे.

IND vs SA: हेड कोच राहुल द्रविड यांना 'घंटा' वाजवण्याचा मान
Follow us
| Updated on: Dec 29, 2021 | 3:47 PM

जोहान्सबर्ग: सेंच्युरियनच्या सुपर स्पोर्ट पार्क स्टेडियमवर आज चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात होण्याआधी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना घंटा वाजवण्याचा मान देण्यात आला. सुपर स्पोर्ट पार्क स्टेडियमवरची ही परंपरा आहे. सामना सुरु होण्याआधी घंटा वाजवली जाते. आज हा मान राहुल द्रविड यांना देण्यात आला. इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानावरुन या परंपरेला सुरुवात झाली आहे. (South Africa vs India 1st Test: Rahul Dravid rings bell at SuperSport Park to indicate start of play on Day 4)

भारताचे इडन गार्डन्स स्टेडियममधील याच पंरपरेशी जोडलेले आहे. सुपरस्पोर्ट पार्कच्या परंपरेनुसार, हेड कोच राहुल द्रविड यांनी चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात होण्याआधी घंटा वाजवली, असे बीसीसीआयने टि्वट केले आहे. गोलंदाजांच्या दमदार कामगिरीमुळे सेंच्युरियन कसोटीत भारतीय संघ चांगल्या स्थितीत आहे. आज सकाळच्या सत्रात भारताने दोन विकेच लवकर गमावले असले, तरी सध्या भारताकडे 200 पेक्षा जास्त धावांची आघाडी आहे.

काल भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करुन दक्षिण आफ्रिकेच्या संघाला 197 धावात गुंडाळले होते. भारताने पहिल्या डावात 327 धावा केल्या होत्या. लोकेश राहुलने दमदार शतक झळकावले होते. पण दुसऱ्या डावात राहुल 23 धावांवर बाद झाला.

सर्वात जलद 200 बळी मोहम्मद शमीच्या आधी कपिल देव, इशांत शर्मा, झहीर खान आणि जवागल श्रीनाथ यांनी हा पराक्रम केला आहे. मोहम्मद शमी हा भारतासाठी सर्वात कमी चेंडूत 200 बळी घेणारा गोलंदाज आहे. शमीने 9896 चेंडूत 200 कसोटी बळी घेतले आहेत. त्याने 10,248 चेंडूत विकेट्सचे द्विशतक झळकावणाऱ्या अश्विनचा विक्रम मोडित काढला. याबाबतीत भारताचे इतर सर्व गोलंदाज शमी आणि अश्विनच्या मागे आहेत.

दक्षिण आफ्रिकेचा दुसऱ्यां ‘पंच’नामा मोहम्मद शमीने दक्षिण आफ्रिकेत दुसऱ्यांदा एका डावात पाच विकेट घेतल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेत जवागल श्रीनाथने 3 वेळा एका डावात 5 बळी घेतले आहेत. शमीने दक्षिण आफ्रिकेत आतापर्यंत 7 डावात 20 विकेट घेतल्या आहेत.

संबंधित बातम्या:

Corona Update: मुंबईत पार्ट्यांवर बंदी, तर इमारतीही सील, आदित्य ठाकरेंनी सांगितलं काय करायचं, काय नको! Video| नारायण राणेंना कणकवली पोलिसांची नोटीस; 3 वाजता हजर राहण्याचे आदेश प्रवीण पोटेंच्या महाविद्यालयात विजेचा शॉक लागून चौघांचा मृत्यू; अमरावतीत खळबळ

(South Africa vs India 1st Test: Rahul Dravid rings bell at SuperSport Park to indicate start of play on Day 4)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.