IND vs SA, 2nd ODI: संघात स्थान मिळवण्यासाठी दोन मुंबईकरांमध्ये स्पर्धा, असा असू शकतो भारतीय संघ
पार्ल: तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधायची असेल, तर भारताला उद्या आपली कामगिरी उंचावावी लागेल. बोलँड पार्कवर उद्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये (IND vs SA) दुसरा वनडे सामना होणार आहे. केएल राहुलच्या (KL Rahul) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाचा पहिल्या वनडेमध्ये 31 धावांनी पराभव झाला. मागच्या सामन्यात वेंकटेश अय्यरचा (Venktesh Iyer) सहावा गोलंदाज म्हणून संघात समावेश […]
पार्ल: तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधायची असेल, तर भारताला उद्या आपली कामगिरी उंचावावी लागेल. बोलँड पार्कवर उद्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये (IND vs SA) दुसरा वनडे सामना होणार आहे. केएल राहुलच्या (KL Rahul) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाचा पहिल्या वनडेमध्ये 31 धावांनी पराभव झाला. मागच्या सामन्यात वेंकटेश अय्यरचा (Venktesh Iyer) सहावा गोलंदाज म्हणून संघात समावेश करण्यात आला होता. त्याच्याकडून पाच ते सहा षटकं गोलंदाजी करुन घेणं अपेक्षित होतं.
दबावाखाली चांगली फलंदाजी करु शकतो
वेंकटेशला सहाव्या क्रमांकावर स्पेशलिस्ट फलंदाज म्हणून खेळवत असाल, तर मग सूर्यकुमार यादवला का खेळवत नाही? असा प्रश्न उपस्थित होतोय. सूर्यकुमारकडे चांगला अनुभव आहे. दबावाखाली चांगली फलंदाजी करतो. पहिल्या सामन्यात धवन आणि विराट बाद झाल्यानंतर भारताचा डाव गडगडला. दोघांनी 92 धावांची भागीदारी केली होती. दोघे मैदानावर असेपर्यंत फलंदाजी खूप सोपी वाटत होती. पण ते बाद होताच खेळ बदलून गेला.
वर्ल्डकप 2019 पासून भारताला चौथ्या स्थानाचा प्रश्न सोडवता आलेला नाहीय. मागच्या सामन्यात श्रेयस अय्यरच्या जागी ऋषभ पंतला चौथ्या स्थानावर बढती देण्यात आली होती. पण संघाला गरज असताना, एकही फलंदाज खेळपट्टीवर टीकला नाही. मंद खेळपट्टीवर एकेरी-दुहेरी धावा पळून काढणं आवश्यक असतं. त्यावेळी ऋषभ आणि अय्यरला चांगली संधी होती.
दुसऱ्यावनडेमध्ये असा असू शकतो भारतीय संघ: रुतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, शार्दुल ठाकूर, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, यजुवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह,
South Africa vs India, 2nd ODI Predicted Playing XI Toss up between Shreyas Iyer and Suryakumar in middle order