KL Rahul | ’99 धावांवर असताना माझ्या मनात…’ राहुलने उघड केला भावनिक गुंता

राहुलच्या शतकाच्या बळावर पहिल्यादिवसअखेर भारताच्या तीन बाद 272 धावा झाल्या व पहिल्या दिवसाच्या खेळावर टीम इंडियाला वर्चस्व राखता आले.

KL Rahul | '99 धावांवर असताना माझ्या मनात...' राहुलने उघड केला भावनिक गुंता
Follow us
| Updated on: Dec 27, 2021 | 3:38 PM

सेंच्युरियन: कुठलाही फलंदाज शतकाच्या जवळ पोहोचल्यानंतर मोठे फटके खेळण्याचे टाळतो. एकेरी-दुहेरी धावा पळून शतक झळकावण्याचा त्याचा प्रयत्न असतो. पण के.एल. राहुलचं (Kl Rahul) नेमकं या उलट आहे. काल दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (Ind vs SA) सेंच्युरियनवर सुरु झालेल्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी राहुलने शानदार शतकी खेळी साकारली. 99 धावांवर पोहोचल्यानंतर राहुलच्या मनात मोठा फटका खेळण्याचा विचार सुरु होता.

फिरकी गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याची त्याची इच्छा होती. पण राहुलने त्याच्या भावनांवर नियंत्रण ठेवले व कसोटी क्रिकेटमध्ये सातवे शतक झळकावले. केशव महाराजच्या गोलंदाजीवर षटकार खेचून राहुल नव्वदीत पोहोचला. याच केशव महाराजला चौकार ठोकून राहुलने वर्षातील दुसरे आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिले शतक झळकावले. राहुलच्या शतकाच्या बळावर पहिल्यादिवसअखेर भारताच्या तीन बाद 272 धावा झाल्या व पहिल्या दिवसाच्या खेळावर टीम इंडियाला वर्चस्व राखता आले.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध राहुलची सर्वाधिक धावसंख्या 16 आणि चार डावातील सरासरी 7.50 होती. “हे शतक खास आहे. प्रत्येक शतकामधून एक वेगळा आनंद मिळतो. शतक झळकावताना त्यात अनेक भावना दडलेल्या असतात. मी नाबाद असल्याचा मला आनंद आहे. अशीच कामगिरी माझ्याकडून अपेक्षित होती” असे राहुलने सांगितले.

“मी आणि मयांकने चांगली सुरुवात दिल्यानंतर मी फक्त माझ्या फलंदाजीचा आनंद लुटला. आधीच आम्ही जास्त विचार केला नव्हता” असे राहुलने बीसीसीआय टीव्हीला सांगितले. राहुल सध्या टीम इंडियाचा उपकर्णधार आहे. रोहित शर्माला दुखापत झाल्यामुळे त्याच्याजागी राहुलची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या: 

पंजाबमध्ये केजरीवालांचा भाजप-काँग्रेसला झटका, भाजपचा मेयरपदाचा उमेदवार चारीमुंड्याचीत, विधानसभेतही हेच घडणार?

विधानसभा अध्यक्ष बदलाची प्रक्रिया घटनाबाह्य, राज्यपालांची हरकत; आता आघाडी सरकार काय निर्णय घेणार?

VIDEO: पोलीस काय त्यांच्या बापाचे आहेत काय? पडळकरांवरील हल्ल्याच्या प्रयत्नावर फडणवीस आक्रमक, अजित पवार म्हणाले, त्यांनी तार्तम्य बाळगावं

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.