IND vs SA: सेंच्युरियन कसोटी जिंकूनही भारतासाठी एक वाईट बातमी
परदेशातील खेळपट्ट्यांवर जिंकणं इतकं सोपं नाहीय. भारताने ही कामगिरी करुन दाखवली ही चांगली बाब आहे. पण विजयानंतरही भारतीय संघाला दंड ठोठावण्यात आला आहे.
सेंच्युरियन: मागच्यावर्षी सेंच्युरियनच्या (Centurion Test) सुपरस्पोर्ट् पार्क स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेला नमवून टीम इंडियाने वर्षाचा शेवट गोड केला. या विजयासह भारताने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. परदेशातील खेळपट्ट्यांवर जिंकणं इतकं सोपं नाहीय. भारताने ही कामगिरी करुन दाखवली ही चांगली बाब आहे. पण विजयानंतरही भारतीय संघाला दंड ठोठावण्यात आला आहे. सेंच्युरियनच्य् सुपरस्पोर्ट् पार्क स्टेडियमवकर षटकांची गती धीमी राखल्याबद्दल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप गुणतालिकेत भारताला एक पॉईंट गमवावा लागला आहे. (South Africa vs India Virat Kohlis Team loses a point in wtc & fined for slow over-rate in Centurion Test win)
मॅच फी मधून 20 टक्के कापणार
स्लो ओव्हररेटबद्दल सामन्याच्या मानधनातील म्हणजेच मॅच फी मधून 20 टक्के रक्कम कापण्यात येणार आहे. सेंच्युरियनवरच्या ऐतिहासिक विजयाबद्दल भारताला 12 पाँईटस मिळाले आहेत. पण निर्धारीत वेळेत टार्गेटपेक्षा एक षटक कमी टाकल्याबद्दल WTC मधुन एक पॉईंट गमावला आहे.
भारत WTC मध्ये चौथ्या स्थानावर
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची नवीन पद्धत सुरु झाल्यापासून षटकांची गती धीमी राखण्याचा भारताला हा पहिला गुन्हा आहे. भारत WTC मध्ये 53 गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया तिसऱ्या नंबरवर आहे. श्रीलंका आणि पाकिस्तानने एक कसोटी सामना गमावला असून दोन ड्रॉ केलेत आणि चार कसोटी सामने जिंकले आहेत.
आयसीसीच्या एलिट पॅलनचे मॅच रेफ्री अँड्रयू पायक्रॉफ्ट यांनी ही शिक्षा दिलीय. कर्णधार विराट कोहलीने चूक मान्य केली आहे. त्यामुळे सुनावणीची आवश्यकता नाहीय. 29 वर्षानंतर दक्षिण आफ्रिकेत मालिका विजयाचे स्वप्न घेऊन आलेला भारतीय संघ पुढच्या कसोटीत मालिकेत 2-0 विजयी आघाडी घेण्याचा प्रयत्न करेल. दुसरी कसोटी 3 जानेवारीपासून सुरु होणार आहे.
संबंधित बातम्या:
IND vs SA ODI Series: रोहित शर्माच्या जागी केएल राहुल कॅप्टन, बुमराह उपकर्णधार, असा आहे भारतीय संघ 5 वनडेत 4 शतकं, ऋतुराज गायकवाड टीम इंडियासाठी आश्चर्यकारक कामगिरी करेल; निवड समितीला विश्वास