IND vs SA Test | शमी नसला तरी….दक्षिण आफ्रिकन कॅप्टनच्या उत्तरातून दिसली मनातली भिती
IND vs SA Test | T20 आणि वनडेनंतर टीम इंडिया आता टेस्ट सीरीज खेळणार आहे. उद्यापासून सुरु होणाऱ्या या कसोटी मालिकेत टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज मोहम्मद शमी नसेल. मोहम्मद शमीने नुकत्याच संपलेल्या वनडे वर्ल्ड कपमध्ये आपली ताकत दाखवून दिली. आपला धाक निर्माण केला. ती भीती दक्षिण आफ्रिकन कर्णधाराच्या बोलण्यातून दिसली.
IND vs SA Test | टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये उद्यापासून टेस्ट सीरीजला सुरुवात होत आहे. उद्यापासून बॉक्सिंग डे कसोटी सामन्याला सुरुवात होईल. या टेस्ट सीरीजमध्ये मोहम्मद शमी नाहीय. मोहम्मद शमीने नुकतीच वनडे वर्ल्ड कपमध्ये आपली क्षमता दाखवून दिली. शमीने हा वर्ल्ड कप गाजवला. वनडे वर्ल्ड कप 2023 मधील शमी सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला. त्याने 7 सामन्यात 24 विकेट घेतलेत. सेमीफायनलमध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडला हरवलं. मोहम्मद शमी या विजयाचा नायक ठरला. उद्यापासून सुरु होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याआधी दक्षिण आफ्रिकन कॅप्टन टेम्बा बावुमाने भारतातील युवा प्रतिभावा क्रिकेटपटूंबद्दल आदर व्यक्त केलाय. मोहम्मद शमीच्या जागी उद्या ज्या गोलंदाजाची टीममध्ये निवड होईल, तो सुद्धा दक्षिण आफ्रिकेला दबावाखाली आणू शकतो.
मोहम्मद शमी भारतीय गोलंदाजीचा मुख्य आधारस्तंभ आहे. पण पायाच्या टाचेला दुखापत झाल्याने त्याने माघार घेतली आहे. मोहम्मद शमीच्या जागी प्रसिद्ध कृष्णा किंवा अननुभवी मुकेश कुमार या दोघांपैकी एकाला संधी मिळू शकते. कृष्णा आणि मुकेश कुमार दोघे चेंडू स्विंग करण्यात तरबेज आहेत. पत्रकार परिषदेत टेम्बा बावुमाला मोहम्मद शमीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. “मोहम्मद शमी एक सर्वोत्तम क्रिकेटर आहे. भारत भारत आहे. त्यांच्याकडे खोली आहे. विश्वास ठेवा, जो कुणी त्याच्याजागी येईल तो तुम्हाला दबावाखाली आणू शकतो” असं टेम्बा बावुमा म्हणाला.
दक्षिण आफ्रिकेत भारताला किती वर्षापासून टेस्ट सीरीज जिंकता आलेली नाही ?
मोहम्मद शमीच्या अनुपस्थितीत टेम्बा बावुमाने भारताच्या वेगवान गोलंदाजीच कौतुक केलं. सेंच्युरियनच्या मैदानात सीरीजमधला पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. पहिल्या दिवसाच्या खेळावर पावसाच सावट असेल. भारताविरोधात खेळण्यात असलेली आव्हान बावुमाने मान्य केली. घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिका भारताविरुद्ध मागच्या 31 वर्षांपासून अजिंक्य आहे. हाच रेकॉर्ड कायम ठेवण्याचा प्रयत्न असेल, असं बावुमाने सांगितलं.
सलग दोनवेळा टीम इंडियाचा फायनलमध्ये पराभव
टीम इंडियाकडे एक उत्तम कसोटी संघ आहे. टीम इंडियाने सलग दोनवेळा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल गाठली. दोन्हीवेळा टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. एकदा न्यूझीलंड आणि दुसऱ्या ऑस्ट्रेलियाने अंतिम फेरीत पराभव केला. त्यामुळे टीम इंडियाच WTC चॅम्पिनशिप जिंकण्याच स्वप्न भंगलं.