कोहलीचा साथीदार, आरसीबीच्या धाकड खेळाडूचे पुनरागमन, टी-20 विश्वचषकातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतणार
36 वर्षीय या खेळाडूने जगातील बऱ्याच टी20 लीग्स गाजवल्या आहेत. आयपीएलमध्येही आरसीबी संघाकडून तुफान फलंदाजी करणाऱ्या या खेळाडूने कॅरेबियन प्रीमियर लीग, पाकिस्तान सुपर लीगमध्ये धमाकेदार फलंदाजी केली आहे.
मुंबई : दक्षिण आफ्रिका संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू डेविड वीसे (David Wiese) हा टी-20 विश्व चषकात (T20 World Cup) खेळताना दिसणार आहे. फक्त तो दक्षिण आफ्रिका संघामध्ये नाही तर, नामीबिया देशाकडून खेळणार आहे. डेविड वीसे सध्या इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळत असून काही वर्षांपूर्वीच त्याने दक्षिण आफ्रिका संघाकडून खेळणे सोडून दिले होते. दरम्यान त्याचा वडिलांचा जन्म हा नामिबिया देशातील असल्याने त्याला त्यांच्याकडून खेळण्याचा अधिकार आहे. नामीबिया क्रिकेट बोर्डाचे सीईओ योहान मुलर यांनी ईएसपीएन क्रिकइंफोला दिलेल्या माहितीत सांगितले की, ”डेविड नामबिया संघाकडून खेळण्यासाठी उपलब्ध असणार असून अद्याप टी 20 संघाची घोषणा झालेली नाही. आयसीसीने 10 सप्टेंबरपर्यंत वेळ दिलेला आहे.”
डेविडचा दुसरा टी-20 विश्वचषक असणार आहे. याआधी 2016 मध्ये तो दक्षिण आफ्रिका संघाकडून विश्वचषक खेळला होता. नामीबिया संघासाठी डेविड अद्यापर्यंत एकही सामना खेळला नसून टी-20 विश्वचषकाती त्याचा सामना हा नामीबिया देशासाठी सलामीचा सामना असेल. मार्च, 2016 मध्ये अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यानंतर डेविड 2017 मध्ये इंग्लंडच्या काउंटी क्रिकेटमधील संघ टीम ससेक्समधून खेळू लागला. सध्या तो द हंड्रेड स्पर्धेत लंडन स्पिरिट संघातही खेळतो आहे.
आयपीएलमध्येही खेळला आहे डेविड
डेविड वीसे या 36 वर्षीय या खेळाडूने जगातील बऱ्याच टी20 लीग्स गाजवल्या आहेत. आयपीएलमध्येही आरसीबी संघाकडून तुफान फलंदाजी करणाऱ्या या खेळाडूने कॅरेबियन प्रीमियर लीग, पाकिस्तान सुपर लीगमध्ये धमाकेदार फलंदाजी केली आहे. विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुमधून डेविडने 15 सामन्यात 16 विकेट्स घेतल्या आहेत. 33 धावा देत चार विकेट हे त्याचे सर्वोत्कृष्ट प्रदर्शन आहे. तसेच फलंदाजीमध्येही त्याने उत्तम योगदान दिले आहे. डेविडने ऑगस्ट 2013 ते मार्च 2016 पर्यंत दक्षिण आफ्रिका संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहे. यावेळी त्याने एकदिवीसीय आणि टी-20 सामन्यांमध्ये चांगले प्रदर्शन केले आहे.
हे ही वाचा
ICC T20 World Cup मध्ये भारत आणि पाकिस्तान आमने-सामने, कोणाचं पारडं जड?
(South african cricketer david wiese will play in icc t20 world cup for namibia)