गौतम गंभीरशी झालेल्या वादानंतर श्रीसंतच्या पत्नीने दिली वाईट रिॲक्शन, पतीच्या पाठिशी उभी राहात म्हणाली की…

गौतम गंभीर आणि एस श्रीसंत हे दोन्ही खेळाडू आक्रमक शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. आता दोन्ही खेळाडूंचं आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्द संपली आहे. पण या दोन्ही खेळाडूंचा आक्रमक पवित्रा काही केल्या संपत नाही. लेजेंट्स क्रिकेट लीगमध्ये याची प्रचिती आली. पण हा वाद मैदानाबाहेरही सुरुच आहे. या दोघांच्या भांडणात आता एस श्रीसंतच्या पत्नीने उडी घेतली आहे.

गौतम गंभीरशी झालेल्या वादानंतर श्रीसंतच्या पत्नीने दिली वाईट रिॲक्शन, पतीच्या पाठिशी उभी राहात म्हणाली की...
गौतम गंभीरसोबत झालेल्या वादात आता श्रीसंतच्या पत्नीची उडी, पतीची बाजू घेत बरंच काही सुनावलं
Follow us
| Updated on: Dec 07, 2023 | 5:05 PM

मुंबई : क्रिकेट विश्वात अनेक घडामोडी घडत असतात. काही चांगल्या तर काही वाईट घडामोडी असतात. काही घडामोडी ऐकल्या की वाईट वाटतं. असाच एक प्रकार लेजेंड्स क्रिकेट लीगमध्ये घडला आहे. गौतम गंभीर आणि एस श्रीसंत यांच्यात भर मैदात तू तू मै मै झाली. हा वाद इतक्यावरच शमला नाही. मैदानाबाहेर सोशल मीडियावरही दोन्ही खेळाडू जुंपल्याचं दिसत आहे. मैदानातील वादावर एस श्रीसंत याने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात त्याने गौतम गंभीरवर धक्कादायक आरोप केले आहेत. “मी त्याला एकही वाईट शब्द वापरला नाही. तो मला वारंवार फिक्सर म्हणत राहिला.”, अशी प्रतिक्रिया एस श्रीसंत याने इन्स्टाग्राम व्हिडीओत केली आहे. “तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांचा आदर करत नसाल तर लोकांचं प्रतिनिधित्व करू नका. लाईव्ह सामन्यातही जेव्हा विराटबद्दल विचारलं जातं तेव्हा त्याच्याबद्दल काहीच बोलत नाही. कायम दुसरंच काही बोलत असतो. मला अधिक खोलात जायचं नाही. मला याबाबत खूप दु:ख झालं आहे. यामुळे मी आणि कुटुंबिय खूप दुखावलो आहोत” असंही त्याने पुढे म्हंटलं आहे.

दुसरीकडे, गौतम गंभीर यानेही सोशल मीडियावर एक हसरा फोटो टाकत उपरोधिक कॅप्शन लिहिली आहे. “जेव्हा संपूर्ण जग लक्ष वेधण्यासाठी धावत आहे, तेव्हा आपण फक्त हसायचं असतं.”, असं त्याने लिहिलं आहे. आता हा वाद चिघळत असताना एस श्रीसंतच्या पत्नीने त्यात उडी घेतली आहे. “श्रीकडून असं सर्व ऐकल्यानंतर धक्का बसला आहे. एक खेळाडू ज्याने भारतासाठी अनेक वर्षे प्रतिनिधित्व केलं तो इतक्या खालच्या स्तरावर जाऊ शकतो, याची कल्पना करवत नाही. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर इतक्या वर्षानंतरही तो असं करू शकतो. शेवटी कौटुंबिक संस्कार खूप महत्त्वाचे ठरतात. हे सर्व मैदानात तुम्ही कसे वागता यावरून सिद्ध होतं. हे खरंच खूप धक्कादायक आहे..खरंच”, असं श्रीसंतच्या पत्नीने म्हंटलं आहे.

Sreesant_Wife

लेजेंट्स लीग क्रिकेटमध्ये गौतम गंभीर इंडिया कॅपिटल्स, तर श्रीसंत गुजरात जायंट्सकडून खेळत आहे. बुधवारी या दोन्ही संघांमध्ये सामना रंगला. इंडिया कॅपिटल्सने 20 षटकात 7 गडी गमवून 223 धावा केल्या आणि विजयासाठी 224 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गाठणं गुजरात जायंट्सला कठीण झालं. 20 षटकात 211 धावा करू शकला आणि 12 धावांनी पराभवाचं तोंड पाहावं लागलं.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.