SRH IPL 2022 Retained Players: जम्मू-काश्मीरच्या पोरांवर पैशांचा पाऊस, वॉर्नर, भुवी, राशिद खान आऊट
सनरायझर्स हैदराबादने आयपीएल 2022 च्या मेगा ऑक्शनपूर्वी त्यांच्या संघात कायम ठेवलेल्या (रिटेन केलेल्या) खेळाडूंची घोषणा केली आहे. या फ्रेंचायझीने तीन खेळाडूंना संघात कायम ठेवले आहे.
SRH IPL 2022 Confirmed Retained Players : सनरायझर्स हैदराबादने आयपीएल 2022 च्या मेगा ऑक्शनपूर्वी त्यांच्या संघात कायम ठेवलेल्या (रिटेन केलेल्या) खेळाडूंची घोषणा केली आहे. या फ्रेंचायझीने तीन खेळाडूंना संघात कायम ठेवले आहे. यामध्ये केन विल्यमसन, उम्रान मलिक आणि अब्दुल समद यांचा समावेश आहे. उम्रान आणि अब्दुल हे दोघेही अनकॅप्ड भारतीय खेळाडू आहेत आणि दोघेही जम्मू-काश्मीरचे आहेत. (SRH ipl 2022 retention live updates: Sunrisers Hyderabad Retained Williamson, Umran Malik and Abdul Samad over Rashid Khan and David warner)
डेव्हिड वॉर्नरला संघातून मुक्त केल्यानंतर आता केन विल्यमसन पुढे सनरायझर्सचा कर्णधार असेल. उमरान मलिकला रिटेन केल्याने अनेकांना मोठा धक्का बसला आहे. आयपीएल 2021 मध्ये तो नेट बॉलर होता. त्यानंतर टी. नटराजनला कोरोना झाला. त्यामुळे उम्रानला संघात स्थान मिळालं. गोलंदाजीत त्याने विकेट्स घेऊन लोकांचं लक्ष वेधण्यासह त्याच्या वेगाने जगाचं लक्ष वेधून घेतलं. त्याने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात जलद गोलंदाजी केली. त्याने अनेक चेंडू 150 किमी प्रतितास यापेक्षा अधिक वेगाने फेकले.
- केन विल्यमसन : किवी संघाचा कर्णधार केन विल्यमसन हाच यापुढेही हैदराबाद संघाचा कर्णधार राहील. त्याच्या नेतृत्वाखाली संघाने आयपीएल 2018 मध्ये अंतिम फेरी गाठली होती. त्याला फ्रेंचायझीकडून 14 कोटी रुपये मिळतील.
- उम्रान मलिक : जम्मू-काश्मीरच्या या खेळाडूवर फ्रेंचायझीने विश्वास व्यक्त केला आहे. IPL 2021 मध्ये बदली खेळाडू म्हणून आलेल्या या खेळाडूने त्याच्या पेसच्या (वेगाच्या) जोरावर जगाचं लक्ष वेधून घेतलं होतं. यापूर्वी तो नेट गोलंदाज म्हणून संघासोबत होता. त्याला चार कोटी रुपये मिळतील.
- अब्दुल समद : हा जम्मू काश्मीरचा वेगवान गोलंदाज आहे. मधल्या फळीत तो फलंदाजीदेखील करतो. त्यालादेखील चार कोटी रुपये मिळणार आहेत.
Take a look at the @SunRisers retention list ?#VIVOIPLRetention pic.twitter.com/fXv62OyAkA
— IndianPremierLeague (@IPL) November 30, 2021
इतर बातम्या
IPL 2022 Retention, Live Updates : मुंबईने 4, बँगलोरने 3 आणि पंजाबने 2 खेळाडू रिटेन केले
IPL 2022 Retention : मुंबईने 4 तर बँगलोरने 3 खेळाडूंना रिटेन केलं, रोहितला विराटपेक्षा जास्त पैसे
IPL 2022 Retention : CSK कडून रवींद्र जाडेजाला धोनीपेक्षा जास्त पैसे, ऋतुराज गायकवाडदेखील रिटेन
(SRH ipl 2022 retention live updates: Sunrisers Hyderabad Retained Williamson, Umran Malik and Abdul Samad over Rashid Khan and David warner)