KKR vs SRH : सलामीच्या सामन्यातच उम्रान मलिकची कमाल, नावे केला गोलंदाजीचा जबरदस्त रेकॉर्ड, पाहा VIDEO

सनरायजर्स हैद्राबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यात केकेआरने सहा गडी राखून हैद्राबाद संघाला मात दिली. पण या सामन्यात हैद्राबादच्या एका खेळाडूने मात्र सर्वांचच लक्ष वेधून घेतलं.

KKR vs SRH : सलामीच्या सामन्यातच उम्रान मलिकची कमाल, नावे केला गोलंदाजीचा जबरदस्त रेकॉर्ड, पाहा VIDEO
उम्रान मलिक
Follow us
| Updated on: Oct 04, 2021 | 12:03 AM

IPL 2021: इंडियन प्रिमीयर लीगच्या 14 व्या पर्वातील 49 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनराजर्स हैद्राबाद (SRH vs KKR) या संघामध्ये खेळवला गेला. सामन्यात हैद्राबाद संघाला 6 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला खरा पण या सामन्यात एक भारी गोष्ट हैद्राबाद संघासह भारतीय क्रिकेटच्या दृष्टीने घडली आहे. हैद्राबाद संघातून टी नटराजनच्या जागी संघातून खेळणाऱ्या युवा गोलंदाज उम्रान मलिकने (Umran Malik) एक दमादर रेकॉर्ड स्वत:च्या नावावर केला आहे.

उम्रान याने त्याच्या पहिल्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर तब्बल 150 kmph वेगाने चेंडू फेकला. आय़पीएलच्या इतिहासात कोणत्याही भारतीय गोलंदाजाला इतका वेगवान चेंडू फेकता आला नाही. पण सलामीच्या सामन्यात पहिल्याच षटकात ही कमागिरी करत मलिकने त्याच्या एन्ट्रीचं बिगुलचं जणू वाजवलं आहे. त्याच षटकात मलिकने पहिला चेंडू 145 kmph, दुसरा चेंडू 142 kmph, तिसरा चेंडू 150 kmph, चौथा चेंडू 147 kmph, पाचवा चेंडू 143 kmph आणि सहावा तेंडू 142 kmph या वेगाने फेकत ओव्हरची समाप्ती केली. दरम्यान त्याच्या या कामगिरीनंतर सर्वत्र त्याच्याच नावाची चर्चा असून आयपीएलने त्यांच्या संकेतस्थळावर खास मलिकचा व्हिडीओही पोस्ट केला आहे.

आयपीएलमधील सर्वात वेगवान गोलंदाज (भारतीय)

उम्रान मलिक (सनरायजर्स हैद्राबाद) – 150.06kmph

मोहम्मद सिराज (आरसीबी) – 147.68kmph

मोहम्मद सिराज (आरसीबी) – 147.67kmph

खलिल अहमद (सनरायजर्स हैद्राबाद)- 147.38kmph

उम्रान मलिक (सनरायजर्स हैद्राबाद) – 146.84kmph

कोण आहे उम्रान मलिक?

सनरायजर्स हैद्राबाद संघाचा (SRH) खेळाडू आणि भारताचा गोलंदाजा टी नटराजन (T Natrajan Corona Positive) याला कोरोनाची बाधा झाली. त्यामुळे उम्रान मलिक याला टी नटराजनच्या जागी संघात घेण्यात आलं. उम्रान हा जम्मू आणि काश्मीर संघातील खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत एक टी20 आणि लिस्ट A सामने खेळले असून त्यामध्ये 4 विकेट्स घेतले आहेत. तो सध्या सनरायजर्स हैद्राबाद संघाचा नेट बोलर म्हणून खेळत असताना आता त्याला संघातही स्थान मिळालं आहे.

हे ही वाचा

IPL 2021: यशस्वी जैस्वालची तुफानी खेळी, चेन्नईवर विजयानंतर धोनीकडून खास गिफ्ट

IPL 2021 : विराटसेना विजयी, पंजाबवर 6 धावांनी विजय, प्लेऑफमध्येही मिळवली एन्ट्री

RCB vs PBKS: पंचाचा चूकीचा निर्णय, राहुल भडकला, दिग्गज क्रिकेटपटू म्हणतो पंचाला तात्काळ बडतर्फ करा, वाचा नेमकं प्रकरण काय?

(SRH Pacer Umran Malik bowls fastes ball by an indian in IPL with 150kmph)

'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.