आयपीएलच्या 17 वर्षांच्या इतिहासात असे कधीच घडले नाही, पाहा कोणी केला हा कारनामा

SRH vs DC: दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध, सनरायझर्स हैदराबादने नवा रेकॉर्ड बनवला आहे. गेल्या १७ वर्षात हे पहिल्यांदाच घडले आहे. सलामीवीर ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी हा रेकॉर्ड केला आहे. आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वात जलद खेळी आहे.

आयपीएलच्या 17 वर्षांच्या इतिहासात असे कधीच घडले नाही, पाहा कोणी केला हा कारनामा
Follow us
| Updated on: Apr 20, 2024 | 8:42 PM

IPL 2024 : सनरायझर्स हैदराबादचे सलामीवीर ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध इतिहास रचला आहे. दोन्ही सलामीवीरांनी पहिल्या 6 ओव्हरमधील पॉवरप्लेमध्ये विक्रमी 125 धावा ठोकल्या आहेत. आयपीएलच्या इतिहासातील पॉवरप्लेमधील ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. यापूर्वी हा विक्रम कोलकाता नाईट रायडर्सच्या नावावर होता. IPL 2017 मध्ये, कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध 6 ओव्हरमध्ये 105 धावा केल्या होत्या.

अभिषेक शर्मा याने 12 बॉलमध्ये 46 धावा केल्या तर ट्रॅव्हिस हेडने 32 बॉलमध्ये 89 धावा केल्या. ट्रॅव्हिस हेडने 11 फोर आणि 6 सिक्स मारले. सनरायझर्स हैदराबाद आयपीएलच्या इतिहासात पॉवरप्ले ओव्हर्समध्ये सर्वाधिक धावा करणारा संघ बनला आहे.

पॅट कमिन्सच्या संघाने कोलकाता नाईट रायडर्सला मागे टाकले. चेन्नई सुपर किंग्ज या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. आयपीएल 2014 मध्ये पंजाब किंग्ज विरुद्ध चेन्नई सुपर किंग्जने पहिल्या 6 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावून 100 धावा केल्या होत्या.

आयपीएल 2015 मध्ये चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सविरुद्ध पहिल्या 6 ओव्हरमध्ये 90 धावा केल्या होत्या. आयपीएल 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पहिल्या 6 ओव्हरमध्ये 1 विकेट गमवून 88 धावा केल्या.

पावरप्लेमध्ये सर्वाधिक रन

125/0 – SRH vs DC, 2024* 105/0 – KKR vs RCB, 2017 100/2 – CSK vs PBKS, 2014 90/0 – CSK vs MI, 2015 88/1 – KKR vs DC, 2024*

टी-20 क्रिकेटमधील देखील हा सर्वाधिक स्कोर आहे. हैदराबादने आतापर्यंत 13 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून 184 रन केले आहेत. दिल्लीकडून आतापर्यंत कुलदीप यादवने 3 विकेट तर अक्षर पटेलने 1 विकेट घेतली आहे.

'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.