Sanju Samson Fifty ipl 2022: संजू, संजू, संजू आज रात्री वॉशिंग्टन सुंदरच्या स्वप्नात सॅमसन येणार नाही ना?

Sanju Samson Fifty ipl 2022: संजू सॅमसन (Sanju Samson) एक टॅलेंटेड क्रिकेटर आहे. संजू सॅमसन पीच वर असताना धावा वेगाने होतात. गोलंदाजांचा दिशा, टप्पा भरकटतो. धावांचा पाऊस पडतो.

Sanju Samson Fifty ipl 2022: संजू, संजू, संजू आज रात्री वॉशिंग्टन सुंदरच्या स्वप्नात सॅमसन येणार नाही ना?
आयपीएल 2022 मध्ये संजू सॅमसनची तुफान फलंदाजी Image Credit source: IPL
Follow us
| Updated on: Mar 29, 2022 | 9:58 PM

पुणे: संजू सॅमसन (Sanju Samson) एक टॅलेंटेड क्रिकेटर आहे. संजू सॅमसन पीच वर असताना धावा वेगाने होतात. गोलंदाजांचा दिशा, टप्पा भरकटतो. धावांचा पाऊस पडतो. आज पुन्हा एकदा त्याची प्रचिती आली. संजू सॅमसनने अक्षरक्ष: सनरायजर्स हैदराबादची (RR vs SRH) गोलंदाजी फोडून काढली. संजू सॅमसन फलंदाजी करत असताना SRH गोलंदाज हतबल झाले. संजूला रोखायचं कसं? हाच सनरायजर्स हैदराबादच्या गोलंदाजांपुढे प्रश्न होता. मागच्या सीजनमध्ये संजू सॅमसन कॅप्टन असताना, राजस्थानच्या टीमने विशेष कामगिरी केली नव्हती. तरीही फ्रेंचायजीने सॅमसनला कॅप्टनशिपवर कायम ठेवलं. तो त्यांचा निर्णय किती योग्य आहे, त्याची प्रचिती आजची त्याची फलंदाजी पाहून आली. मैदानावर संजूने अक्षरक्ष: चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. त्याच्या बॅटमधून निघणाऱ्या प्रत्येक फटक्याने क्रिकेट रसिकांचं भरपूर मनोरंजन केलं. ज्यांनी आज संजूची बॅटिंग पाहिली त्यांच्या तोंडून लाजबाव असेच शब्द निघतील. कारण राजस्थानच्या या गुणवान क्रिकेटपटूने आपल्या बॅटचा तसा हिसकाच हैदराबादच्या संघाला दाखवला.

उलट तो अधिक आक्रमक झाला

राजस्थानने आज चांगली सुरुवात केली. जोस बटलर आणि यशस्वी जैस्वालने 58 धावांची सलामी दिली. आधी जैस्वाल बाद झाला. त्यानंतर बटलर 75 धावांवर आऊट झाला. त्यानंतर संजू सॅमसनने धावगती मंदावणार नाही, याची काळजी घेतली. उलट तो अधिक आक्रमक झाला. हैदराबादच्या गोलंदाजांचा त्याने दिशा आणि टप्पा बिघडवून टाकला.

देवदत्त-संजूची जोडी जमली

बटलर आऊट झाल्यानंतर देवदत्त पडिक्कल क्रीझवर आला. त्यानंतर संजू आणि देवदत्तची जोडी जमली. दोघे हैदराबादच्या गोलंदाजीवर तुटून पडले. संजूने उमरान मलिक असो किंवा वॉशिंग्टन सुंदर दोघांच्या गोलंदाजीवर हल्लाबोल केला. 16 व्या षटकात दोन षटकार ठोकून अर्धशतक पूर्ण केलं. आयपीएलमध्ये संजू सॅमसनची बॅट जास्त चालते. आज पुन्हा एकदा ते दिसलं. काही वर्षांपूर्वी सचिन तेंडुलकरने शेन वॉर्नची धुलाई केली होती. त्यावेळी सचिन वॉर्नच्या स्वप्नात आला होता. वॉशिंग्टन सुंदरने तीन षटकात 47 धावा दिल्या. एकही विकेट मिळाली नाही.

संजू सुंदरच्या स्वप्नात नाही ना येणार ?

आज संजूने जी बॅटिंग केलीय ते पाहून सुंदरच्या स्वप्नात तर तो येणार नाही ना? असा प्रश्न पडलाय. कारण संजू सॅमसनने वॉशिंग्टन सुंदरची गोलंदाजीच तशी झोडून काढली. नुसता चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. देवदत्त पडिक्कलने 41 धावा केल्या. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 41 चेंडूत 73 धावांची भागीदारी केली. अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर आक्रमक खेळण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. त्याने 27 चेंडूत 55 धावा केल्या. त्याने तीन चौकार आणि पाच षटकार खेचले. भुवनेश्वर कुमारने संजूला अब्दुल समदकरवी झेलबाद केले.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.