SRH विरुद्ध RR Live Score, IPL 2022: राजस्थानचा सनरायजर्स हैदराबादवर ‘रॉयल’ विजय

| Updated on: Mar 29, 2022 | 11:29 PM

sunrisers hyderabad vs rajasthan royals live score in marathi: IPL 2022 च्या आजच्या पाचव्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबाद हे दोन संघ आमने-सामने आहेत.

SRH विरुद्ध RR Live Score, IPL 2022: राजस्थानचा सनरायजर्स हैदराबादवर 'रॉयल' विजय
SRH VS RR IPL 2022

बहुचर्चित इंडियन प्रीमियर लीग (IPL 2022) स्पर्धेत आज राजस्थान रॉयल्सने दमदार खेळाचं प्रदर्शन केलं. त्यांनी यंदाच्या सीजनमधील 210 ही सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. याआधी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचे 206 धावांचे लक्ष्य पंजाब किंग्सने पार केलं होतं. आज सनरायजर्स हैदराबादला तशी कामगिरी करुन दाखवणं (RR vs SRH) जमलं नाही. राजस्थान रॉयल्सने त्यांचा 61 धावांनी पराभव केला व आयपीएलमध्ये विजयी शुभांरभ केला. राजस्थानने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायजर्स निर्धारीत 20 षटकात सात बाद 149 धावा केल्या. राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) आज फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात सरस खेळ दाखवला.

RR ची प्लेइंग 11 संजू सॅमसन (कॅप्टन), जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, नाथन कूल्टर नाइल, ट्रेंट बोल्ट, युजवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा,

SRH ची प्लेइंग 11 केन विलियमसन (कॅप्टन), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, निकोलस पूरन, एडन मार्कराम, अब्दुल समद, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, रोमारियो शेफर्ड, टी नटराजन, उमरान मलिक,

Key Events

SRH वि RR कोणी जास्त सामने जिंकले?

दोन्ही टीम्समध्ये आतापर्यंत 15 सामने झालेत. राजस्थानने सात तर हैदराबादने आठ सामने जिंकलेत.

SRH विरुद्ध संजू सॅमसनचा रेकॉर्ड

सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध संजू सॅमसनने नेहमीच दमदार कामगिरी केली आहे. सॅमसनने हैदराबाद विरुद्ध एक शतक आणि एक अर्धशतक झळकावलं आहे.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
  • 29 Mar 2022 11:13 PM (IST)

    राजस्थानचा रॉयल विजय

    राजस्थान रॉयल्सने SRH चा 61 धावांनी पराभव केला व आयपीएलमध्ये विजयी शुभांरभ केला. राजस्थानने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायजर्स निर्धारीत 20 षटकात सात बाद 149 धावा केल्या.

  • 29 Mar 2022 10:55 PM (IST)

    वॉशिंग्टन सुंदरचा हल्लाबोल

    हैदराबादच्या वॉशिंग्टन सुंदरने खेळपट्टीवर येताच फटकेबाजी सुरु केली आहे. नाथन कूल्टर नाइलच्या एक ओव्हरमध्ये त्याने 24 धावा वसूल केल्या.

  • 29 Mar 2022 10:46 PM (IST)

    चहलने SRH ला दिला आणखी एक झटका

    युजवेंद्र चहलने रोमारियो शेपहर्डला (24) क्लीन बोल्ड केलं आहे. 6 बाद 78 अशी हैदराबादची स्थिती आहे.

  • 29 Mar 2022 10:43 PM (IST)

    सामना पूर्णपणे राजस्थानच्या नियंत्रणात

    15 षटकात SRH च्या पाच बाद 77 धावा झाल्या आहेत. एडन मार्कराम (31) आणि रोमारियो शेपहर्ड (24) मैदानात आहेत.

  • 29 Mar 2022 10:28 PM (IST)

    चहलने SRH ला दिला दुसरा झटका

    युजवेंद्र चहलने SRH ला दुसरा झटका दिला आहे. अब्दुल समदला चार धावांवर चहलने रियान परागकरवी झेलबाद केले. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात समद आऊट झाला. हैदराबादची स्थिती पाच बाद 38 झाली आहे.

  • 29 Mar 2022 10:18 PM (IST)

    गोलंदाजीला येताच चहलने राजस्थानसाठी काढला पहिला विकेट

    युजवेंद्र चहलने गोलंदाजीला येताच राजस्थान रॉयल्ससाठी पहिली विकेट घेतली आहे. चहलने अभिषेक शर्माला 9 धावांवर हेटमायर करवी झेलबाद केले. एसआरएचची स्थिती चार बाद 29 झाली आहे.

  • 29 Mar 2022 10:06 PM (IST)

    SRH चा डाव अडचणीत, प्रसिद्ध कृष्णा-ट्रेंट बोल्टने दिले झटके

    राजस्थानने दिलेल्या 211 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायजर्स हैदराबादचा डाव अडचणीत सापडला आहे. पाच षटकात अवघ्या 13 धावात त्यांचे तीन विकेटस गेल्या आहेत. कॅप्टन केन विलियमसन (2), राहुल त्रिपाठी (०) आणि निकोलस पूरन (०) बाद झाले आहेत. प्रसिद्ध कृष्णाने विलियमसन आणि त्रिपाठीला तंबूत पाठवलं. ट्रेंट बोल्टने पूरनची विकेट काढली.

  • 29 Mar 2022 09:22 PM (IST)

    हैदराबादच्या गोलंदाजांना धोपटलं

    राजस्थानच्या टीमने आज तुफान फलंदाजी केली. आधी जोस बटलर (35), यशस्वी जैस्वाल (20), त्यानंतर संजू सॅमसन (55), देवदत्त पडिक्कल (41), हेटमायर (33) ने हैदराबादची गोलंदाजी चोपून काढली. मैदानावर चौकार-षटकारांचा पाऊस पाडला. यंदाच्या आयपीएलमधील 210 ही सर्वोच्च धावसंख्या राजस्थान रॉयल्सने नोंदवली आहे. याआधी आरसीबीने दिलेले 206 धावांचे लक्ष्य पंजाब किंग्सने पार केलं होतं.

  • 29 Mar 2022 09:15 PM (IST)

    राजस्थानचे फलंदाज सुसाट

    देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन आऊट झाल्यानंतरही राजस्थानची हिटिंग थांबलेली नाही. आता शिमरॉन हेटमायरने आपला तडाखा दाखवला आहे. त्याने 11 चेंडूत 29 धावा फटकावल्या आहेत. यात एक चौकार आणि तीन षटकार आहेत.

  • 29 Mar 2022 09:05 PM (IST)

    हेटमायर-रियान परागची जोडी मैदानात

    17 षटकार राजस्थान रॉयल्सच्या चार बाद 170 धावा झाल्या आहेत. शिमरॉन हेटमायर आणि रियान परागची जोडी मैदानात आहे.

  • 29 Mar 2022 09:00 PM (IST)

    अखेर संजू सॅमसन OUT

    राजस्थान रॉयल्सने सनरायजर्स हैदराबादची गोलंदाजी अक्षरक्ष: फोडून काढली. आक्रमक फलंदाजी करणारा कॅप्टन संजू सॅमसन अखेर बाद झाला आहे. त्याने 27 चेंडूत 55 धावा केल्या. यात तीन चौकार आणि पाच षटकार खेचले. भुवनेश्वर कुमारने संजूला अब्दुल समदकरवी झेलबाद केले.

  • 29 Mar 2022 08:30 PM (IST)

    संजू सॅमसनची आक्रमक फलंदाजी, वॉशिंग्टन सुंदरची केली धुलाई

    राजस्थानचा कॅप्टन संजू सॅमसनची आक्रमक फलंदाजी सुरु आहे. राजस्थानच्या 100 धावा पूर्ण झाल्या आहेत. 11 षटकात राजस्थानच्या दोन बाद 101 धावा झाल्या आहेत. संजू सॅमसनने वॉशिंग्टन सुंदरची धुलाई केली आहे. संजू 36 धावांवर खेळतोय. त्याने दोन चौकार आणि तीन षटकार लगावले आहेत.

  • 29 Mar 2022 08:17 PM (IST)

    राजस्थानचा दुसरा विकेट

    उमरान मलिकने जोस बटलरला पॅव्हेलियनमध्ये धाडले आहे. विकेटकीपर पूरनकरवी त्याने बटलरला झेलबाद केले. बटलरने 35 धावा केल्या. राजस्थानच्या दोन बाद 75 धावा झाल्या आहेत.

  • 29 Mar 2022 08:14 PM (IST)

    संजू सॅमसनचा कडक सिक्स

    आठ षटकात राजस्थानच्या एक बाद 75 धावा झाल्या आहेत. जोस बटलर 35 आणि संजू सॅमसन 15 धावांवर खेळतोय. संजूने शेवटच्या चेंडूवर कडक षटकार मारला.

  • 29 Mar 2022 08:05 PM (IST)

    राजस्थानला पहिला धक्का

    यशस्वी जैस्वालच्या रुपाने राजस्थानचा पहिला विकेट गेला आहे. शेपहर्डच्या गोलंदाजीवर यशस्वी 20 धावांवर Out झाला. मिडविकेटला मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात त्याने एडन मार्करामकडे झेल दिला.

  • 29 Mar 2022 08:01 PM (IST)

    राजस्थानने उचलला पावरप्लेचा फायदा, दमदार सुरुवात

    राजस्थानने पावरप्लेचा फायदा उचलला आहे. त्यांनी दमदार सुरुवात केली आहे. राजस्थान रॉयल्सच्या पहिल्या सहा षटकात बिनबाद 58 धावा झाल्या आहेत. जोस बटलर 33 धावावर तर यशस्वी जैस्वाल 20 धावांवर खेळतोय.

  • 29 Mar 2022 07:56 PM (IST)

    राजस्थान रॉयल्सची आक्रमक सुरुवात

    राजस्थान रॉयल्सने आक्रमक सुरुवात केली आहे. त्यांच्या पाच षटकात 52 धावा झाल्या आहेत. वॉशिंग्टन सुंदरच्या एका षटकात 18 धावा वसूल केल्या.

  • 29 Mar 2022 07:51 PM (IST)

    एक षटकात वसूल केल्या 21 धावा

    उमरान मलिकच्या एका षटकात चौकार-षटकार ठोकून राजस्थान रॉयल्सने 21 धावा वसूल केल्या. जोस बटलर 25 धावांवर खेळतोय. त्याने तीन चौकार आणि दोन षटकार लगावले. यशस्वी जैस्वाल 6 धावांवर खेळतोय.

  • 29 Mar 2022 07:48 PM (IST)

    SRH ची प्लेइंग 11

    केन विलियमसन (कॅप्टन), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, निकोलस पूरन, एडन मार्कराम, अब्दुल समद, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, रोमारियो शेफर्ड, टी नटराजन, उमरान मलिक,

  • 29 Mar 2022 07:48 PM (IST)

    RR ची प्लेइंग 11

    संजू सॅमसन (कॅप्टन), जोस बटलर, यशस्वी जैस्वाल, देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, रविचंद्रन अश्विन, नाथन कूल्टर नाइल, ट्रेंट बोल्ट, युजवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा,

  • 29 Mar 2022 07:40 PM (IST)

    दोन षटकांचा खेळ पूर्ण

    सनरायजर्स हैदराबादने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. दोन षटकांचा खेळ पूर्ण झाला असून राजस्थानच्या सहा धावा झाल्या आहेत. जोस बटलर चार आणि यशस्वी जैस्वाल एक रन्सवर खेळतोय.

Published On - Mar 29,2022 7:32 PM

Follow us
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.