Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SL Vs AFG Report: सुपर 4 च्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानची जबरदस्त फलंदाजी, पण….

SL Vs AFG Report: आशिया कप स्पर्धेत (Asia cup) श्रीलंकेचा (Srilanka) संघ विजयी मार्गावर परतला आहे. 'करो या मरो' सामन्यात त्यांनी बांगलादेशला हरवलं.

SL Vs AFG Report: सुपर 4 च्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानची जबरदस्त फलंदाजी, पण....
AFG vs SLImage Credit source: AFP
Follow us
| Updated on: Sep 04, 2022 | 7:10 AM

मुंबई: आशिया कप स्पर्धेत (Asia cup) श्रीलंकेचा (Srilanka) संघ विजयी मार्गावर परतला आहे. ‘करो या मरो’ सामन्यात त्यांनी बांगलादेशला हरवलं. सुपर 4 (Super 4) मध्ये पोहोचल्यानंतर श्रीलंकेच्या संघाने सलग दुसरा विजय मिळवला आहे. सुपर 4 राऊंडमध्ये श्रीलंका-अफगाणिस्तान मध्ये पहिला सामना झाला. दासुन शनाकाच्या श्रीलंकन संघाने जबरदस्त खेळ दाखवला. त्यांनी अफगाणिस्तानच्या टीमचा 5 विकेटने पराभव केला. भानुका राजपक्षा आणि कुसल मेंडिस यांनी दमदार फलंदाजी केली. त्यांच्या बळावर श्रीलंकेने अफगाणिस्तानचं 176 धावांच लक्ष्य 20 व्या षटकात पार केलं.

गुरबाजची जबरदस्त इनिंग

शारजाहच्या मैदानात शनिवारी सुपर 4 चा पहिला सामना झाला. अफगाणिस्तानचा संघ सलग दोन विजयांसह आत्मविश्वासाने मैदानात उतरला होता. श्रीलंकेच्या संघाने कसाबसा पुढच्या फेरीत प्रवेश केला होता. मोहम्मद नबीचा अफगाणिस्तान संघ फेव्हरेट म्हणून मैदानात उतरला होता. टीमचा सलामीवीर रहमानुल्लाह गुरबाज 45 चेंडूत 84 धावांची स्फोटक इनिंग खेळला. यात चार चौकार आणि सहा षटकार होते. इब्राहिम जादरानने 38 चेंडूत 40 धावा केल्या. त्या व्यतिरिक्त अफगाणिस्तानचे अन्य फलंदाज अपयशी ठरले. अफगाणिस्तानने निर्धारित 20 ओव्हर्स मध्ये 175/6 धावा केल्या.

श्रीलंकेची दमदार सुरुवात

श्रीलंकेने या लक्ष्याचा पाठलाग करताना जोरदार सुरुवात केली. पाथुम निसंका (35) आणि कुसल मेंडिस ही ओपनिंग जोडी मैदानात उतरली होती. त्यांनी पावरप्लेच्या षटकात 57 धावा फटकावल्या. सातव्या ओव्हर मध्ये श्रीलंकेला पहिला झटका बसला. गोलंदाज नवीन उल हकने मेंडिसला 36 धावांवर आऊट केलं. पुढच्या पाच षटकात मुजीब उर रहमानच्या मदतीने अफगाणिस्तानने धावगतीला लगाम घातला. श्रीलंकेचे आणखी दोन विकेट काढले.

राजपक्षामुळे अफगाणिस्तानचा पराभव

अखेरच्या 35 चेंडूत श्रीलंकेला विजयासाठी 57 धावांची आवश्यकता होती. दानुष्का गणतिलकाने 20 चेंडूत 33 धावा आणि भानुका राजपक्षाने 14 चेंडूत 31 धावा फटकावल्या. त्यांनी अफगाणिस्तानच्या गोलंदाजीवर प्रतिहल्ला चढवला. दोघांनी 15 चेंडूत 32 धावा फटकावल्या. राजपक्षाने जास्त आक्रमक फलंदाजी केली. वानिंदु हसारंगाने 9 चेंडूत 16 धावा फटकावल्या. राजपक्षा सोबत मिळून त्याने संघाला विजयापर्यंत पोहोचवलं. 20 व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर चामिका करुणारत्नेने चौकार मारला. श्रीलंकेने अशा प्रकारे सुपर 4 मध्ये पहिल्या विजयाची नोंद केली. श्रीलंकेने अफगाणिस्तान बरोबर ग्रुप स्टेज मधील पराभवाचा हिशोब चुकता केला.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.