Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SL vs PAK: एकदम कडक, पाठीमागून बाबर आजमची दांडी गुल, वॉर्नच्या ऐतिहासिक चेंडूची आठवण, पहा VIDEO

SL vs PAK: गॉल कसोटीच्या (Galle Test) पहिल्या डावात झुंजार शतक ठोकणाऱ्या बाबर आजमने (Babar Azam) दुसऱ्याडावातही अर्धशतकी खेळी केली. पण यावेळी बाबर आजमला श्रीलंकन स्पिनर प्रभात जयसूर्याने (Prabhat jaysurya) मोठी इनिंग खेळण्यापासून रोखलं.

SL vs PAK: एकदम कडक, पाठीमागून बाबर आजमची दांडी गुल, वॉर्नच्या ऐतिहासिक चेंडूची आठवण, पहा VIDEO
sl vs pakImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Jul 20, 2022 | 11:04 AM

मुंबई: गॉल कसोटीच्या (Galle Test) पहिल्या डावात झुंजार शतक ठोकणाऱ्या बाबर आजमने (Babar Azam) दुसऱ्याडावातही अर्धशतकी खेळी केली. पण यावेळी बाबर आजमला श्रीलंकन स्पिनर प्रभात जयसूर्याने (Prabhat jaysurya) मोठी इनिंग खेळण्यापासून रोखलं. बाबर आजम दुसऱ्याडावातही चांगली फलंदाजी करत होता. त्याला बाद करण्यासाठी स्पेशल गोलंदाजीची आवश्यकता होती. श्रीलंकन स्पिनरने तशाच पद्धतीची गोलंदाजी केली. प्रभात जयसूर्याने बाबर आजमला अशा पद्घतीने आऊट केलं की, पाहणारा प्रत्येक जण दंग झाला. स्वत: बाबरलाही समजलं नाही की, तो कसा आऊट झाला. बाबर पाकिस्तानच्या डावात 79 व्या षटकात आऊट झाला. डावखुरा फिरकी गोलंदाज जयसूर्याचा चेंडू रोखण्याच्या प्रयत्नात बाबर आजम बाद झाला. बाबरने जयसूर्याचा लेग स्टम्पवर पडलेला चेंडू पायाने अडवण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू मागून टर्न होऊन थेट स्टम्पसवर आदळला. जयसूर्याच्या या चेंडूचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

शेन वॉर्नची आठवण

महान दिवंगत लेगि स्पिनर शेन वॉर्नने बासित अलीची अशाच पद्धतीने विकेट घेतली होती. ती आठवण ताजी झाली. गॉल कसोटीत पाकिस्तान समोर विजयासाठी 342 धावांचे लक्ष्य आहे. चौथ्या दिवसाच्या अखेरीस पाकिस्तानच्या 3 बाद 222 धावा झाल्या होत्या. असद शफीकने शानदार शतक झळकावलं. तो 112 धावांवर नाबाद आहे. बाबर आजमने 55 धावा फटकावल्या. इमामने 35 धावा केल्या. अजहर अली अवघ्या 6 धावा बनवून बाद झाला.

पहिल्या डावात बाबर आजमचं झुंजार शतक

पहिल्या डावात पाकिस्तानने आधी 100 रन्स मध्ये 7 आणि 150 धावांच्या आत 9 विकेट गमावले होते. पण तरीही पाकिस्तानने 218 धावा केल्या. याचं कारण आहे पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आजम. दोन महिन्यांच्या आत बाबर आझमने झुंजार खेळी करुन शानदार शतक झळकावलं. पाकिस्तानी कॅप्टनने श्रीलंकेच्या जबरदस्त फिरकी गोलंदाजीने जिद्दीने सामना कला. 11 व्या नंबरवर फलंदाजी करणाऱ्या नसीम शाह सोबत मिळून संघाची धावसंख्या पुढे नेली. बाबरने चांगली फलंदाजी केली. पण नसीम शाहने सुद्धा हार मानली नाही. तिसऱ्या सेशनच्या सुरुवातीला आजमने शानदार शतक झळकावलं. बाबरच्या कसोटी करीयरमधील हे सातव शतक आहे. बाबरच बाद होणारा शेवटचा फलंदाज ठरला.

संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल.
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका.
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला.
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य.
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार.
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल.
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान.
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?.
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख.
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर.