Asia Cup: एकदम झकास, पाकिस्तानला रडवून श्रीलंकेच्या टीमचा जोरदार डान्स, पहा VIDEO
Asia Cup: श्रीलंकेच्या टीमने सुंदर डान्स करुन फायनलमध्ये पोहोचण्याचं सेलिब्रेशन केलं
मुंबई: आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेच्या महिला टीमने (Srilanka Womens Team) आशिया कप 2022 (Asia cup) च्या फायनलमध्ये प्रवेश केलाय. श्रीलंकेने गुरुवारी सेमीफायनल मॅचमध्ये पाकिस्तानवर 1 रन्सने विजय मिळवला. फायनलमध्ये त्यांच्यासमोर टीम इंडियाच (Team India) आव्हान आहे. टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये थायलंडवर विजय मिळवला.
पराभवानंतर पाकिस्तानी टीम भावूक
श्रीलंकेने पाकिस्तानवर मिळवलेल्या रोमांचक विजयाच सेलिब्रेशनही तसच खास केलं. दुसऱ्याबाजूला पाकिस्तान टीमचे खेळाडू पराभवानंतर भावूक झाले होते.
ऐतिहासिक विजयाच तसच सेलिब्रेशन
श्रीलंकेची महिला टीम पहिल्यांदाच आशिया कपच्या फायनलमध्ये पोहोचली आहे. आपल्या या ऐतिहासिक विजयाच त्यांनी तसच जोरदार सेलिब्रेशन केलं. त्यांची खास डान्स मैदानावर सादर केला. या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
हा डान्स कोरियोग्राफ केलाय असं वाटत होतं
एखाद्या बॉलिवूड चित्रपटातल्या गाण्यासारखा हा डान्स वाटला. कोणीतरी हा डान्स कोरियोग्राफ केलाय असं वाटत होतं. विजयाचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. श्रीलंकेत सध्या जी परिस्थिती आहे, ती पाहता खेळाडूंसाठी हा विजय खास आहे. पुरुषांच्या आशिया कप स्पर्धेतही श्रीलंकेने विजेतेपद मिळवले होते.
श्रीलंकन टीम एक रन्सने जिंकली
श्रीलंकेच्या टीमने टॉस जिंकून पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. मदावी की 35 आणि अनुष्का संजीवनीने 26 धावा केल्या. त्या बळावर श्रीलंकन टीमने 122 धावा केल्या. पाकिस्तानी टीमने 20 ओव्हर्समध्ये 121 धावा केल्या.
#ApeKello celebrating in style ?
Sri Lanka qualified for the finals of the Women’s #AsiaCup2022 after winning against Pakistan by 1 run. pic.twitter.com/WXHkGcQJdd
— Sri Lanka Cricket ?? (@OfficialSLC) October 13, 2022
मैदानातच त्यांना रडू कोसळलं
लास्ट ओव्हरमध्ये पाकिस्तानला विजयासाठी 9 धावांची गरज होती. अचिनि कुलासूर्याने त्या धावा न देता टीमचा विजय निश्चित केला. या पराभवानंतर पाकिस्तानी महिला टीम भावूक झाली. आपला पराभव झालाय, यावर त्यांना विश्वास बसत नव्हता. मैदानातच त्यांना रडू कोसळलं.