मोठी बातमी : टी 20 संघात स्थान न मिळताच लसिथ मलिंगाने सोडलं क्रिकेट, घेतली तडकाफडकी निवृत्ती
जागतिक टी20 क्रिकेटमधील सर्वात मातब्बर वेगवान गोलंदाज असणाऱ्या मलिंगाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेण्याचा निर्णय़ घेतला आहे.
मुंबई: श्रीलंका संघाचाच नाही तर संपूर्ण जगातील टी20 क्रिकेटमधील दिग्गज वेगवान गोलंदाज, यॉर्करकिंग असणाऱ्या लसिथ मलिंगाने (Lasith Malinga) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती (Lasith Malinga Retires) घेतली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मलिंगाला आगामी टी-20 विश्वचषकात खेळण्याची इच्छा होती. पण काही दिवसांपूर्वी श्रीलंका क्रिकेटने त्यांच्या विश्वचषकासाठीच्या संघाची घोषणा केली पण त्यात मलिंगाला जागा न मिळाल्याने त्याने अशाप्रकारे तडकाफडकी निवृत्ती घेतल्याची चर्चा सध्या सुरु आहे.
तब्बल 16 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला मलिंगाने अलविदा म्हटलं आहे. तब्बल 340 सामन्यांत 30 टेस्ट, 226 वनडे आणि 84 टी 20 सामने मलिंगाने खेळले. ज्यामध्ये एकूण 546 विकेट्स मिळवत मलिंगा यॉर्कर किंग म्हणून जगभरात प्रसिद्ध होता. यावेळी त्याने टेस्टमध्ये 101, वनडेमध्ये 338 आणि टी20 मध्ये 107 विकेट्स घेतल्या आहेत. 38 वर्षीय मलिंगा मार्च 2020 मध्ये अखेरचा सामना खेळला होता.
सोशल मीडियावरुन केली घोषणा
नुकतंच लसिथने ट्विट करत निवृत्तीची घोषणा केली. या पोस्टमध्ये त्याने लिहिलं, ‘मी माझे टी-20 चे शूज आता कायमसाछी टांगून ठेवत आहे. क्रिकेटच्या सर्व प्रकारातून मी निवृत्ती घेत आहे. माझ्या आतापर्यंतच्या प्रवासात मला साथ दिलेल्या सर्वांचा मी आभारी आहे. मी येणाऱ्या काळात युवा क्रिकेटपटूंसोबत माझे अनुभव शेअर करण्यासाठी उत्सुक आहे.’
Hanging up my #T20 shoes and #retiring from all forms of cricket! Thankful to all those who supported me in my journey, and looking forward to sharing my experience with young cricketers in the years to come.https://t.co/JgGWhETRwm #LasithMalinga #Ninety9
— Lasith Malinga (@ninety9sl) September 14, 2021
मलिंगाची क्रिकेट कारकिर्द
लसिथ मलिंगाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2004 साली पाऊल ठेवलं. त्याने कसोटी क्रिकेटमधून खेळण्यास सुरुवात केली. जुलै 2004 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात त्याने संघात पदार्पण केलं. यावेळी तो खास कामगिरी करु शकला नाही. त्यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये तो खास छाप न सोडताच 30 कसोटी सामन्यानंतर पुन्हा कसोटी सामना खेळलाच नाही. 2010 मध्ये त्याने शेवटचा कसोटी सामना खेळला होता. पण वनडे आणि टी20 सामन्यात मात्र मलिंगाचा खेळ उत्तम होता. जुलै 2004 मध्ये युएई विरुद्ध पदार्पण करणाऱ्या मलिंगाने आजवर 226 वनडे सामने खेळले. यात त्याने 338 विकेट्स घेतले. जुलै 2019 मध्ये बांग्लादेश विरुद्ध अखेरची वनडे मॅच मलिंगा खेळला होता. वनडेसह टी20 क्रिकेट गाजवणाऱ्या मलिंगाने जून 2006 मध्ये इंग्लंडविरुद्ध पहिली टी-20 मॅच खेळली. त्याने 84 सामन्यात 107 विकेट्स घेतले. ज्यानंतर मार्च 2020 मध्ये वेस्ट इंडीज विरुद्ध तो अखेरची टी20 मॅच खेळला होता. आय़पीएलमध्येही मलिंगाने अद्भुत खेळाने मुंबई इंडियन्स संघाना अनेक विजय मिळवून दिले आहेत.
JUST IN: Lasith Malinga has announced retirement from all forms of cricket. pic.twitter.com/NYrfgpQPqR
— ICC (@ICC) September 14, 2021
इतर बातम्या
अजिंक्य रहाणेला संघातून कधी बाहेर कराव?, दिग्गज क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने दिलं उत्तर, म्हणाला…
विराट कोहलीच्या कर्णधारपदाबाबत सस्पेन्स संपला, BCCI सचिव जय शाह यांचं मोठं वक्तव्य!
(Sri lankan Star Cricketer lasith malinga retired from all forms of cricket)