T20 World Cup 2021 : श्रीलंकन संघाला अपयशाची भीती, दिग्गज खेळाडूने सांगितली अंदर की बात

श्रीलंकेचा माजी दिग्गज क्रिकेटपटू महेला जयवर्धने पात्रता फेरीतील श्रीलंका संघाच्या कामगिरीवर खूश होता. मात्र, त्याने काही त्रुटीही दाखवल्या. जयवर्धने म्हणाला, “पात्रता फेरीत श्रीलंकेसाठी काही गोष्टी चांगल्या झाल्या.

T20 World Cup 2021 : श्रीलंकन संघाला अपयशाची भीती, दिग्गज खेळाडूने सांगितली अंदर की बात
Sri Lankan team
Follow us
| Updated on: Oct 22, 2021 | 7:12 PM

मुंबई : टी-20 विश्वचषक स्पर्धेत सध्या फक्त राऊंड वनचे सामने सुरू झाले आहेत. स्पर्धेचा खरा खेळ अजून सुरू व्हायचा आहे. त्याआधीच श्रीलंकेच्या बॅटिंग गुरुने संघ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही श्रीलंकेचा माजी कर्णधार महेला जयवर्धनेबद्दल बोलत आहोत, ज्याचा फलंदाजी सल्लागार म्हणून श्रीलंका संघासोबतचा प्रवास स्पर्धेतील सराव सामन्यांसोबत संपला आहे. युएईमध्ये श्रीलंकन ​​पत्रकाराला दिलेल्या मुलाखतीत जयवर्धने याने त्याच्या निर्णयाचे कारण वैयक्तिक असल्याचे सांगितले आहे. (Sri Lankan team has Fear of failure says Mahela Jayawardene)

महेला जयवर्धने पात्रता फेरीतील श्रीलंका संघाच्या कामगिरीवर खूश होता. मात्र, त्याने काही त्रुटीही दाखवल्या. जयवर्धने म्हणाला, “पात्रता फेरीत श्रीलंकेसाठी काही गोष्टी चांगल्या झाल्या. पण काही गोष्टी आहेत ज्या निश्चित केल्या जाऊ शकतात. त्यापैकी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे खेळाडूंची भूमिका. प्रत्येक खेळाडूने त्याच्या भूमिकेत स्पष्ट असणे महत्वाचे आहे. संघाच्या प्रशिक्षकाशी बोलल्यानंतर मला जे वाटले त्यानुसार संघामध्ये अपयशाची भीती आहे. तर, आंतरराष्ट्रीय स्तरावर तुम्हाला कोणत्याही भीतीशिवाय टी – 20 क्रिकेट खेळावे लागेल.

बॉलिंग ब्रिगेड सज्ज : जयवर्धने

जयवर्धने म्हणाला की, “आम्हाला प्रत्येक खेळाडूशी स्वतंत्रपणे बोलावे लागेल. आम्हाला संघाच्या फलंदाजीवरही काम करण्याची गरज आहे. संघाच्या गोलंदाजी ब्रिगेडमध्ये कौशल्य आहे. त्यांनी आतापर्यंत त्या कौशल्यांचा चांगला वापर केला आहे. जर आपण भविष्यात देखील असे केले तर आशा आहे की ते विरोधी संघांसाठी अडचणी निर्माण करू शकतात.

माहेलाने निश्चितपणे सांगितले आहे की, तो श्रीलंका संघासाठी तांत्रिक माध्यमांद्वारे नेहमीच उपलब्ध असेल. परंतु, मैदानामधील उपलब्धता आणि तंत्रज्ञानाद्वारे उपस्थिती यात फरक आहे. अशा स्थितीत महेला जयवर्धनेला सोडणे श्रीलंका संघासाठी मोठ्या धक्क्यापेक्षा कमी नाही.

135 दिवसांसापासून मुलीला पाहिलं नाही

जयवर्धने म्हणाला की, “माझ्यासाठी हे कठीण होत आहे. मी गेल्या 135 दिवसांसापासून बायो बबलमध्ये आहे. जून महिन्यापासून हे चक्र सुरु आहे. पण, आता मी बायो बबल किंवा क्वारंटीनमध्ये राहू शकत नाही. मी तांत्रिकदृष्ट्या (ऑनलाईन) संघासाठी उपलब्ध असेन. मला आशा आहे की, संघ व्यवस्थापन मला समजून घेईल, एक वडील म्हणून 135 दिवस आपल्या मुलीपासून दूर राहणे सोपी गोष्ट नाही. मी तिला इतके दिवस पाहिले नाही. त्यामुळे आता मला घरी जायचे आहे.”

इतर बातम्या

T20 World Cup 2021: ओमानला मात देत स्कॉटलंडची ऐतिहासिक कामगिरी, सुपर 12 मध्ये मिळवली एन्ट्री, आता सामना भारताशी

‘T20 World Cup 2021 मध्ये भारताकडून पराभूत होताच सेमीफायनलच्या शर्यतीतूनही पाकिस्तान बाहेर होणार’

IPL 2022 मध्ये कोणते 3 खेळाडू मुंबई इंडियन्स करणार रिटेन?, दोन मॅच विनर्सचं भविष्य धोक्यात

(Sri Lankan team has Fear of failure says Mahela Jayawardene)

'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार.
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी.
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू.
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा.
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप.
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.