सिक्सर किंग युवराजला वर्ल्डकपमध्ये घाम फोडला, करिअरवरच संकट, आता घातक गोलंदाजाचा क्रिकेटला रामराम

श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने क्रिकेटमधून निवृत्त जाहीर केली आहे. तो फक्त टी -20 विश्वचषकासाठी वाट पाहत होता पण जेव्हा त्याची टी ट्वेन्टी वर्ल्डकपसाठी श्रीलंका क्रिकेट संघात निवड होऊ शकली नाही तेव्हा त्याने क्रिकेटला रामराम करण्याची घोषणा केली.

सिक्सर किंग युवराजला वर्ल्डकपमध्ये घाम फोडला, करिअरवरच संकट, आता घातक गोलंदाजाचा क्रिकेटला रामराम
yuvraj singh
Follow us
| Updated on: Sep 15, 2021 | 10:12 AM

मुंबई : श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने क्रिकेटमधून निवृत्त जाहीर केली आहे. तो फक्त टी -20 विश्वचषकासाठी वाट पाहत होता पण जेव्हा त्याची टी ट्वेन्टी वर्ल्डकपसाठी श्रीलंका क्रिकेट संघात निवड होऊ शकली नाही तेव्हा त्याने क्रिकेटला रामराम करण्याची घोषणा केली. लसित मलिंगाने यापूर्वीच वनडे आणि कसोटी क्रिकेट सोडले होते. पण त्याने टी -20 विश्वचषक खेळण्याची इच्छा बोलून दाखवली होती. पण तसं होऊ शकलेलं नाहीय.

मलिंगाने टी -20 क्रिकेटच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 107 विकेट्स घेतल्या. तो सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. त्याचसोबतच श्रीलंकेला टी -20 विश्वचषक जिंकवून देणारा गोलंदाज म्हणूनही त्याचं नाव आहे. 2014 मध्ये त्याने बांगलादेशमध्ये झालेल्या या स्पर्धेत श्रीलंकेला विश्वकरंडक जिंकून दिला. स्पर्धेच्या अंतिम फेरीत श्रीलंकेने भारताचा पराभव केला. लसिथ मलिंगाने सामन्यादरम्यान अप्रतिम गोलंदाजी केली. त्याच्या चमकदार खेळामुळे युवराज सिंगची कारकीर्द जवळपास संपली होती. यासोबतच युवीला बऱ्याच टीकेला सामोरे जावे लागले. काय होती त्या सामन्याची कथा…?

2014 विश्व टी -20 ची अंतिम लढत मीरपूरच्या शेरे बांगला स्टेडियमवर खेळली गेली. श्रीलंकेचा कर्णधार लसिथ मलिंगाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने अजिंक्य रहाणेची विकेट स्वस्तात गमावली होती. पण रोहित शर्मा (29) आणि विराट कोहली (77) यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 60 धावांची भागीदारी झाली.

युवराजच्या संथ खेळीमुळे भारताच्या वाट्याला पराभव

रोहित शर्मा 11 व्या षटकात बाद झाला आणि युवराज सिंग मैदानात आला. तेव्हा असं वाटत होतं की, भारत आरामात 150 च्या वर धावा करेल. पण युवीच्या बॅटमधून धावा आल्या नाहीत. तत्पूर्वी श्रीलंकेच्या फिरकीपटू रंगना हेराथ आणि सचित्रा सेनानायकेने युवीला फटकेबाजी करु दिली नाही. मलिंगाच्या बोलिंगवरही युवी अपयशी ठरला. मात्र, दुसऱ्या टोकाला कोहलीच्या बॅटमधून धावा येत होत्या. 16 व्या षटकात भारताचा स्कोअर दोन गडी बाद 111 झाला. त्यानंतर 17 व्या आणि 18 व्या षटकातून फक्त चार धावा आल्या. या षटकांमध्ये युवीने 12 चेंडूंपैकी आठ चेंडू खेळले पण त्याला फक्त चार धावा करता आल्या.

शेवटी, 19 व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर तो नुवान कुलशेखराच्या हाती झेल देऊन बाद झाला. 21 चेंडूत 11 धावा केल्यावर तो बाद झाला. या खेळीमुळे भारताच्या मोठा स्कोअर करण्याच्या आशा धुळीला मिळाल्या. भारतीय संघ शेवटच्या दोन षटकांत केवळ 11 धावा करु शकला आणि भारताने चार विकेट्सवर 130 धावांचा टप्पा गाठला. 58 चेंडूत पाच चौकार आणि चार षटकारांसह 77 धावा केल्यावर कोहली धावबाद झाला. धोनीही शेवटच्या षटकात मोठा फटका मारण्यात अपयशी ठरला आणि 7 चेंडूत 4 धावा करू शकला. लसिथ मलिंगाला एकही विकेट मिळाली नाही पण त्याने चार षटकांत फक्त 27 धावा दिल्या आणि भारताला मोठी धावसंख्या गाठण्यात अपयशी ठरवण्यात महत्वाची भूमिका बजावली.

‘संघकाराने संघाला तारलं’, परेराने साथ दिली, श्रीलंकेने करंडक जिंकला

शेरे बांगला खेळपट्टीवर धावा काढणे सोपे नव्हते पण कुमार संगकाराच्या नाबाद 52 धावांच्या मदतीने श्रीलंकेने 17.5 षटकांत लक्ष्याचा पाठलाग केला. थिसारा परेराने त्याला चांगली साथ दिली आणि 14 चेंडूत नाबाद 23 धावा केल्या. अशा प्रकारे श्रीलंकेने प्रथमच टी -20 विश्वचषक जिंकला. टी ट्वेन्टी करंडक स्पर्धा जिंकणारा श्रीलंका पाचवा देश ठरला. त्याआधी भारत, पाकिस्तान, इंग्लंड आणि वेस्ट इंडिजने हा पराक्रम केला होता.

सामन्यानंतर, जिथे श्रीलंकेच्या खेळाडूंमध्ये उत्साह होता, जोश होता, आनंद होता याउलट भारतीय खेळाडू दु:खात होते. युवराज सिंग लोकांच्या निशाण्यावर होता. त्याच्याबद्दल उलटसुलट बरंच काही लिहिलं गेलं. या सामन्यानंतर युवराज जवळपास दोन वर्षे टी -20 संघाबाहेर होता. तो 2016 मध्ये परतला पण तो पूर्वीसारखा खेळ दाखवू शकला नाही आणि 2017 मध्ये त्याने शेवटचा आंतरराष्ट्रीय टी 20 सामना खेळला.

(Srilanka Bowler lasith malinga almost ended yuvraj singh t 20 Career India vs Sri lanka T20 World Cup 2014)

हे ही वाचा :

मोठी बातमी : टी 20 संघात स्थान न मिळताच लसिथ मलिंगाने सोडलं क्रिकेट, घेतली तडकाफडकी निवृत्ती

महिला क्रिकेटपटूंची ICC Rankings जाहीर, मिथाली पहिल्या स्थानावर कायम, अष्टपैलू दीप्तीचं दुहेरी यश

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.