Hardik pandya: ‘त्या’ कमतरतेवर मात करण्यासाठी हार्दिक पंड्याची एडिलेडमध्ये स्पेशल प्रॅक्टिस
Hardik pandya: 'त्या' कमतरतेवर मात करण्यासाठी हार्दिक पंड्याने एका खास पद्धतीचा सराव केला, काय होती ती प्रॅक्टिस?
एडिलेड: आज नेट्समध्ये रोहित शर्माच्या दुखापतीची चर्चा होती. त्यावेळी हार्दिक पंड्याने नेट्समध्ये एक खास पद्धतीचा सराव केला. ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यावर हार्दिक वेगवान आणि शॉर्ट पीच चेंडूंवर संघर्ष करताना दिसतोय. मार्क वुड, सॅम करन आणि ख्रिस वोक्स हे एडिलेडच्या विकेटवर आपल्या वेगवान गोलंदाजीने धुमाकूळ घालू शकतात. हार्दिकला ऑस्ट्रेलियात आतापर्यंत शॉर्ट पीच चेंडूंवर संघर्ष करावा लागलाय. त्यामुळे हार्दिकने आज हीच कमतरता दूर करण्यावर विशेष भर दिला.
सुदैवाने गंभीर दुखापत झाली नाही
हार्दिकने थ्रो डाऊन स्पेशलिस्ट दयानंद गारानी आणि रघु यांना शॉर्ट पीच चेंडू टाकायला लावले. त्या चेंडूंवर हार्दिकने सराव केला. दयानंद आणि रघु दोघेही टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफचा भाग आहेत. रघुच्या एका शॉर्ट पीच थ्रो डाऊनवर रोहितला सुदैवाने गंभीर दुखापत झाली नाही. थोडक्यात निभावलं. मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर हे दोन रिझर्व्ह खेळाडूंमध्ये आहेत. त्यांनी सुद्धा शॉर्ट पीच गोलंदाजीच केली.
हार्दिक कुठल्या चेंडूवर आऊट झालाय?
हार्दिकने वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान विरुद्ध सलामीच्या सामन्यात 40 धावा केल्या. त्यानंतर हार्दिकचा धावा बनवण्यासाठी ऑस्ट्रेलियात संघर्ष सुरु आहे. या वर्ल्ड कपमध्ये वेगवान आणि शॉर्ट चेंडूंवर हार्दिक सर्वाधिक वेळ बाद झालाय. हॅरिस रौफ आणि नॉर्खियाची वेगवान गोलंदाजी खेळताना हार्दिक अडचणीत आला होता.
त्याने सोपा झेल दिला
तो चार इनिंग्समध्ये शॉर्ट बॉलच्या जाळ्यात अडकला. दक्षिण आफ्रिकेकडून लुंगी निगीडीने शॉर्ट बॉलच्या जाळ्यात अडकवलं. त्याने थर्ड मॅनला सोपा झेल दिला. बांग्लादेश विरुद्ध हसन महमूदच्या गोलंदाजीवर शॉर्ट बॉल त्याने पॉइंटच्या वरुन मारण्याचा प्रयत्न केला. पण त्याला यश मिळालं नाही. पॉइंटला उभ्या असलेल्या यासिर अलीकडे त्याने सोपा झेल दिला.
अक्षर पटेलच्या जागी युजवेंद्र चहल?
मार्क वुड, ख्रिस वोक्स, बेन स्टोक्स आणि सॅम करन गुरुवारी जास्तीत जास्त शॉर्ट पीच चेंडू टाकू शकतात. सेमीफायनलमध्ये हार्दिक पंड्याची बॅट तळपणं गरजेच आहे. या सामन्यात अक्षर पटेलच्या जागी युजवेंद्र चहलचा टीमध्ये समावेश होऊ शकतो.