IPL 2022: संघर्ष करणाऱ्या Rohit Sharma ला ब्रेक हवा, मग टीम इंडियाचा कॅप्टन कोण होणार?
IPL चा सीजन संपल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) ब्रेक मागितला आहे. त्याने BCCI कडे देण्याची विनंती केली आहे.
मुंबई: IPL चा सीजन संपल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) ब्रेक मागितला आहे. त्याने BCCI कडे ब्रेक देण्याची विनंती केली आहे. दक्षिण आफ्रिका, आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यावर जाणारा संघ निवडण्यासाठी बीसीसीआयच्या निवड समितीची आज व्हर्च्युअल बैठक होणार आहे. इनसाइडस्पोर्टने हे वृत्त दिलं आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघ पाच टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. या दौऱ्यासाठी निवड समिती काही सिनियर खेळाडूंना विश्रांती देणार आहे. त्याचवेळी काही सिनियर खेळाडू संघातही ठेवणार आहे. कारण दक्षिण आफ्रिका आपला मजबूत संघ पाठवणार आहे. काही सिनियर खेळाडू टीममध्ये हवेत, अशी निवड समितीची भूमिका आहे. पण रोहित शर्माने ब्रेक मागितला आहे.
“हो, रोहितने ब्रेक मागितलाय आणि आम्ही हे समजू शकतो. तो मुंबई इंडियन्ससाठी सर्व सामने खेळला. संघ जेव्हा चांगली कामगिरी करत नाही, तेव्हा तो अतिरिक्त ताण तुमच्यावर असतो. आम्ही समजू शकतो. इंग्लंड दौऱ्यासाठी तो आम्हाला ताजातवाना हवा आहे” असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितलं. रोहित दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंड सीरीजसाठी ब्रेक घेणार असेल, तर त्याच्याजागी हार्दिक पंड्याकडे कॅप्टनशिपची जबाबदारी सोपवली जाऊ शकते.
IPL सीजनमध्ये किती धावा केल्या?
रोहित शर्मासाठी IPL 2022 चा सीजन खास राहिला नाही. त्याने 19.14 च्या सरासरीने फक्त 268 धावा केल्या. हा आयपीएलचा असा पहिला सीजन आहे, ज्यात रोहित एकही अर्धशतक झळकवू शकला नाही. शनिवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या लढतीतही फलंदाजी करताना त्याचा संघर्ष सुरु होता.
बॉल त्याच्या बॅटला लागत नव्हता
बॉल त्याच्या बॅटला लागत नव्हता. खलील अहमद दुसरी ओव्हर टाकत असताना, एकही बॉल व्यवस्थित त्याला बॅटवर घेता आला नाही. रोहित शर्माला फक्त पहिली धाव घेण्यासाठी 10 चेंडू खर्ची घालावे लागले. अखेर 13 व्या चेंडूवर तो आऊट झाला. एनरिक नॉर्खियाने त्याला 2 रन्सवर बाद केलं.
रोहितच्या फॉर्मवर BCCI चं म्हणणं काय?
निवड समिती किंवा बीसीसीआयल रोहितच्या फॉर्मची चिंता नाहीय. रोहित शर्माला या सीजनमध्ये काही सामन्यांमध्ये चांगली सुरुवात मिळाली. पण त्याला त्याचा फायदा उचलता आला नाही. “माझ्या मते हा चिंता करण्याचा विषय नाही. तो चांगला खेळतोय. काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर इंग्लंड दौऱ्यावर जाण्यासाठी तो पूर्णपणे सज्ज असेल” असं बीसीसीआय अधिकाऱ्याने इनसाइड स्पोर्टला सांगितलं.