Ind Vs Eng : सापांनी भरलेल्या जंगलातून वाट तुडवतो, दोन किमी डोंगरावरुन मॅच पाहतो, टीम इंडियाचा वेडा फॅन!

मैदानापासून दोन किमी असलेल्या डोंगरावर जाऊन त्यांनी भारताचे दोन्ही सामने पाहिले. त्या डोंगरावर जाण्यासाठी त्यांना जंगलातून जावं लागतं. | Sudhir kumar Gautam Watch Ind vs Eng ODI match Seating in Pune hill

Ind Vs Eng : सापांनी भरलेल्या जंगलातून वाट तुडवतो, दोन किमी डोंगरावरुन मॅच पाहतो, टीम इंडियाचा वेडा फॅन!
Sudhir kumar Gautam Watch Ind vs Eng ODI match Seating in Pune hill
Follow us
| Updated on: Mar 27, 2021 | 8:44 AM

पुणे : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातील एकदिवसीय मालिकेदरम्यान प्रेक्षकांना स्टेडियममध्ये एन्ट्री बंद आहे. वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय. परंतु पुण्यात सुरु असलेल्या भारत इंग्लंड वनडे सामन्यादरम्यान काही प्रेक्षक स्टेडियमजवळील टेकडीवरून सामना पाहताना दिसले. याच प्रेक्षकांपैकी एक म्हणजे टीम इंडियाचे जबरा फॅन सुधीर कुमार गौतम…! (Sudhir kumar Gautam Watch Ind vs Eng ODI match Seating in Pune hill)

मिस यू सचिन, एका हातात शंख, दुसऱ्या हातात तिरंगा

गौतम कुमार सचिन तेंडुलकरचे चाहते म्हणून ओळखले जातात. सन 2007 पासून भारताचा प्रत्येक सामना ते पाहतात. मॅचला पोहोचण्याअगोदर ते तिरंग्याचं निशाण आपल्या अंगावर रेखाटतात. तसंच मिस यू सचिन म्हणत त्याच्या जर्सीचा नंबर ते आपल्या पाठीवर लिहितात. त्याच्या एका हातात तिरंगा आणि दुसर्‍या हातात शंख असतो. हाच त्यांचा अवतार पुण्यातही पाहायला मिळतोय.

कोरोनामुळे मैदानात प्रवेश नाही तर काय झालं…

सध्या कोरोना प्रोटोकॉलमुळे सुधीर मैदानात जाऊ शकत नाही. पण त्यांनी अशाही परिस्थितीत हार मानली नाही. मैदानापासून दोन किमी असलेल्या डोंगरावर जाऊन त्यांनी भारताचे दोन्ही सामने पाहिले. त्या डोंगरावर जाण्यासाठी त्यांना जंगलातून जावं लागतं. त्या जंगलाच सापांचा सुळसुळाट आहे. परंतु क्रिकेटचं वेड त्यांना शांत बसू देत नाही. क्रिकेटच्या वेडापायी कोणतीही परिस्थिती आली तरी त्यावर मात करुन सामन्याला हजेरी लावायची, त्यांचा आता हा निर्धार बनलाय.

घोरावडेश्वर डोंगरावर बसून मॅचचा आनंद

पुण्याच्या गहुंजे क्रिकेट स्टेडिअमच्या जवळ घोरावडेश्वर डोंगर आहे. हे ठिकाण ऐतिहासिक गुफांसाठी प्रसिद्ध आहे. या गुहांमध्ये हिंदू आणि बौद्ध धर्माशी संबंधित मुर्त्या आणि चित्रे आहेत. चांगल्या रस्त्याने स्टेडियमपासून हे ठिकाण जवळपास 4 किमी अंतरावर आहे. पण हे अ्ंतर कमी करण्यासाठी सुधीर कुमार जंगलातल्या रस्त्याने जातात. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी क्रिकेट हा माझा श्वास असल्याचं सांगितलं. जसा माणूस श्वासाशिवाय जगू शकत नाही. तसा मी क्रिकेटशिवाय जगू शकत नाही.

शंख वाजवतात, तिरंगा फडकवतात, सूर्यास्ताच्या आधी एक तास टेकडीवरुन निघतात…

घोरडेश्वराच्या टेकडीवर गेल्यानंतर सुधीर कुमार गौतम टीम इंडियासाठी शंख वाजवतात, टीम इंडियाला चिअर करण्यासाठी तिरंगा फडकावतात. जरी सामना इतक्या लांबून दिसत नसला तरी स्टेडियम दिसतं. हेच पाहून सुधीर खूष होतात. ते सूर्यास्ताच्या एक तास आधी तिथून निघून जातात कारण रात्री जंगलातून जाणे सुरक्षित नाही.

हे ही वाचा :

Video : सॅम करनने भडकवलं, हार्दिक करनच्या मागे पळाला, अंपायर्सने थांबवलं, पाहा मैदानात काय काय घडलं…?

Ind Vs Eng : भारतीय बोलर्सची पिसं काढली, गगनचुंबी 10 षटकार, पुण्यात बेन स्टोक्सचा ‘हा’ जबरा रेकॉर्ड!

Ind vs Eng : एका रन्सने शतक हुकलं, आकाशाकडे पाहत दिवंगत पित्याला ‘सॉरी’ म्हटलं, पुण्यात बेन स्टोक्सचा झंझावात!

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.