IND VS WI: आजच्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यासाठी गावस्करांनी सुचवले तीन बदल, ‘या’ 25 वर्षीय स्टार खेळाडूला संधी देण्याचा सल्ला

IND VS WI: वेस्ट इंडिज विरुद्ध (INDvsWI) आज शेवटचा तिसरा टी-20 सामना होणार आहे. भारताने टी-20 मालिकेत आधीच 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.

IND VS WI: आजच्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यासाठी गावस्करांनी सुचवले तीन बदल, 'या' 25 वर्षीय स्टार खेळाडूला संधी देण्याचा सल्ला
Follow us
| Updated on: Feb 20, 2022 | 12:22 PM

मुंबई: वेस्ट इंडिज विरुद्ध (INDvsWI) आज शेवटचा तिसरा टी-20 सामना होणार आहे. भारताने टी-20 मालिकेत आधीच 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आजचा सामना भारताच्या दृष्टीने औपचारिकता मात्र आहे. पण वेस्ट इंडिज आजचा सामना जिंकून किमान प्रतिष्ठा राखण्याचा प्रयत्न करेल. वनडे सीरीजप्रमाणे टी-20 मध्येही क्लीन स्वीप करण्याचा भारताचा प्रयत्न असेल. याआधी वनडे मालिकेत भारताने 3-0 असं निर्भेळ यश संपादन केलं होतं. तिसऱ्या टी-20 सामन्यापूर्वी भारतीय टीम मॅनेजमेंटने काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. विराट कोहली, (Virat kohli) ऋषभ पंत आणि शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) या तिघांना विश्रांती दिली आहे. त्यामुळे आजच्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या तिसऱ्या आणि श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 सीरीजमध्ये हे तिघेही खेळताना दिसणार नाहीत. भारताने मालिका आधीच जिंकली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात भारतीय संघात अनेक बदल पहायला मिळू शकतात.

काय आहे सल्ला?

वेस्ट इंडिज विरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात 25 वर्षीय स्टार युवा फलंदाजाला संघात संधी दिली पाहिजे, असे प्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांचे मत आहे. त्याशिवाय संघात आणखी दोन बदल करण्याचाही सल्ला त्यांनी दिला आहे. भारताने दुसऱ्या टी-20 सामन्यात संघात कोणतेही बदल केले नाहीत. पण मालिकेत विजयी आघाडी घेतल्यामुळे आता तिसऱ्या सामन्यात काही बदल होऊ शकतात. गावस्कर यांच्यामते, ऋतुराज गायकवाडला संघात संधी दिली पाहिजे. 2022 मध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपसाठी संघ निवडण्यापूर्वी जास्तीत जास्त खेळाडूंना संघात संधी मिळाली पाहिजे असं गावस्कर यांनी म्हटलं आह. यावर्षी ऑक्टोंबर महिन्यात ऑस्ट्रेलियात वर्ल्डकप स्पर्धा होणार आहे.

आजच्या सामन्यात आवेश खान आणि मोहम्मद सिराज या दोन खेळाडूंनाही संधी द्यावी, असे गावस्कर यांचे मत आहे. ऋतुराज गायकवाड दक्षिण आफ्रिका दौऱ्यापासून संधीच्या प्रतिक्षेत आहे. स्थानिक क्रिकेट स्पर्धा आणि मागच्या आयपीएल सीजनमध्ये सर्वाधिक धावा करुनही ऋतुराजला अजून संधी मिळालेली नाही. मागच्या सामन्यात निकोलस पूरन आणि रोव्हमॅन पॉवेलने दमदार फलंदाजी केली होती. त्यामुळे भारताची धाकधूक वाढली होती.

Sunil Gavaskar backs promising 25 year-old star suggested 3 changes for 3rd T20I vs WI

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.