IPL 2022: ‘हा बॉल तर एयर होस्टेसला किस करुन येईल’, सुनील गावस्करांच्या आधी 5 कॉमेंट्रेटर्सची वादग्रस्त वक्तव्य
IPL 2022: त्यावेळी समालोचन कक्षातून सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) हेटमायरच्या पत्नीबद्दल वादग्रस्त बोलून गेले. त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातय. शिमरॉन हेटमारच्या पत्नीने डिलिवर केलं. आता हेटमायर राजस्थान रॉयल्ससाठी डिलिवर करणार का?
मुंबई: क्रिकेट सामन्यादरम्यान फक्त खेळाडूंमुळेच वाद होत नाहीत, तर काही वेळा क़ॉमेंट्री करणारेही असं काहीतरी बोलून जातात की, त्यावरुन वाद निर्माण होतो. IPL 2022 मध्ये काल चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये (CSK vs RR) 68 वा सामना झाला. राजस्थान रॉयल्सचा संघ धावांचा पाठलाग करत होता. शिमरॉन हेटमायर खेळपट्टीवर आला. त्यावेळी समालोचन कक्षातून सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) हेटमायरच्या पत्नीबद्दल वादग्रस्त बोलून गेले. त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातय. शिमरॉन हेटमारच्या पत्नीने डिलिवर केलं. आता हेटमायर राजस्थान रॉयल्ससाठी डिलिवर करणार का?, असं गावस्कर म्हणाले. हेटमायरच्या पत्नीची अलीकडेच प्रसुती झाली आहे. गावस्करांच्या विधानाचा त्याच्याशी संबंध आहे. त्यामुळे त्यांना कॉमेंट्री पॅनलमधून हटवण्याची मागणी होत आहे. ऑन एयर असं काहीतरी बोलून गेलेले गावस्कर पहिले कॉमेंटेटर नाहीत. याआधी 5 कॉमेंटेटर्सच्या वक्तव्यावरुन मोठा गदारोळ झाला होता.
- ऑस्ट्रेलियाचे माजी दिग्गज क्रिकेटपटू डीन जोन्स यांनी 2006 साली कॉमेंट्री करताना हाशिम आमलाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. श्रीलंके विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा हा क्रिकेटपटू क्षेत्ररक्षण करत होता. डीन जोन्स त्यावेळी हाशिम आमलाला दहशतवादी म्हणाले होते. त्यानंतर जोन्स यांच्या कॉमेंट्री करण्यावर बंदी घालण्यात आली होती. जोन्स यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी सुद्धा मागितली होती.
- भारताचा माजी क्रिकेटपटू नवजोत सिंह सिद्धू सुद्धा आपल्या कॉमेंट्रीमुळे वादात सापडला आहे. 2011 वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान कॉमेंट्री करताना सिद्धूने बांगलादेशी संघाबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. सिद्धूने बांगलादेशी संघाची तुलना कॉकरोच बरोबर केली होती. त्यानंतर सिद्धूला क़ॉमेंट्री पॅनलवरुन हटवण्यात आलं. एका कसोटी सामन्यात सेहवागच्या षटकारानंतर सिद्धू म्हणाला होता की, “हा, तर गगनचुंबी षटकार. हा बॉल किती उंच गेलाय. हा बॉल तर एयरहोस्टेला किस करुन येईल”
- संजय मांजरेकर यांना सुद्धा वादग्रस्त कमेंटमुळे कॉमेट्री पॅनलवरुन हटवण्यात आलं होतं. 2019 च्या वर्ल्ड कपमध्ये मांजरेकरने रवींद्र जाडेजावर टीका केली होती. त्यावर जाडेजाने सोशल मीडियावर उत्तर दिलं होतं. “मी तुमच्यापेक्षा दुप्पट सामने खेळलेत आणि अजूनही खेळतोय. ज्यांनी काही मिळवलय, त्यांचा आदर करायला शिका” त्यानंतर बीसीसीआयने संजय मांजरेकर यांना भारत-दक्षिण आफ्रिका वनडे सीरीजआधी कॉमेंट्री पॅनलवरुन हटवलं होतं.
- 2018 मध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी ऑस्ट्रेलियन कॉमेंटेटर कॅरी ओकीफ यांनी मयंक अग्रवालवर वादग्रस्त टिप्पणी केली होती. मयंकने रणजी करंडक स्पर्धेत जे, त्रिशतक झळकावलं, ते रेल्वे कॅंटिन स्टाफ विरोधात होतं. यानंतर कॅरी ओकीफ यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं. त्यासाठी त्यांनी माफी सुद्धा मागितली होती.
- 2015 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर वेस्ट इंडिजचा मोठा पराभव झाला. त्यावेळी विंडीज कॉमेंटेटर फजीर मोहम्मद यांच्यावर बंदी घालण्यात आली. त्यांनी संघाची ट्रेनिंग आणि इच्छाशक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं म्हणून वेस्ट इंडिजने त्यांच्यावर बंदी घातली.