राहुल द्रविड-रोहित शर्माच्या जोडीवर सुनील गावस्करांचं मोठं वक्तव्य, म्हणाले, ‘त्या दोघांचं बॉन्डिंग…’

भारतीय क्रिकेट संघाला राहुल द्रविडच्या रुपाने नवा प्रशिक्षक मिळाला आहे. रवी शास्त्री यांच्यानंतर, राहुलने टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली आहे.

राहुल द्रविड-रोहित शर्माच्या जोडीवर सुनील गावस्करांचं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'त्या दोघांचं बॉन्डिंग…'
Sunil Gavaskar
Follow us
| Updated on: Nov 17, 2021 | 5:54 PM

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाला राहुल द्रविडच्या रुपाने नवा प्रशिक्षक मिळाला आहे. रवी शास्त्री यांच्यानंतर, राहुलने टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. राहुलच्या नियुक्तीनंतर न्यूझीलंडविरुद्धची तीन सामन्यांची टी-20 मालिका आजपासून सुरू होत आहे. शास्त्रींच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने खूप यश मिळवले. पण, आयसीसीचे कोणतेही विजेतेपद संघ जिंकू शकला नाही. राहुलच्या आगमनानंतर आता टीम इंडियाकडून बऱ्याच अपेक्षा बाळगल्या जात आहेत. (Sunil Gavaskar Highlights The Similarities Between Rahul Dravid And Rohit Sharma)

भारताचा माजी कर्णधार आणि महान फलंदाज सुनील गावस्कर यांनाही राहुल संघाला नवे आयाम देईल, असे वाटते. राहुल द्रविडने देशासाठी खेळताना ज्या प्रकारे फलंदाजी केली, त्याच पद्धतीने भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून आपली नवीन जबाबदारी पार पाडेल, असा विश्वास माजी दिग्गज खेळाडू गावस्कर यांनी व्यक्त केला. गावसकर यांनी राहुल आणि नवा टी-20 कर्णधार रोहित शर्मा यांच्या जोडीबाबतही आपले मत मांडले आहे.

राहुल द्रविडच्या हाती धुरा!

भारतासाठी खेळलेल्या आतापर्यंतच्या महान क्रिकेटपटूंपैकी एक असलेल्या द्रविडची या महिन्याच्या सुरुवातीला रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपल्यानंतर भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. स्टार स्पोर्ट्सच्या एका कार्यक्रमात गावसकर म्हणाले, “जेव्हा तो खेळायचा तेव्हा आम्हाला वाटायचे की जोपर्यंत राहुल द्रविड क्रीजवर आहे तोपर्यंत भारतीय फलंदाजी सुरक्षित आणि मजबूत आहे. त्यामुळेच मुख्य प्रशिक्षकाची नवी जबाबदारी तो त्याच पद्धतीने पेलू शकेल, असा विश्वास वाटतो.

रोहित आणि राहुल यांच्यात बरेच साम्य

विराट कोहलीच्या जागी T20 कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या रोहित शर्मा आणि द्रविड यांच्यातील साम्य लक्षात घेऊन गावस्कर म्हणाले की, ते सहजतेने एकत्र काम करतील. ते म्हणाले, या दोघांचा स्वभाव बघितला तर ते दोघे सारखेच आहेत. रोहितही राहुल द्रविडसारखा शांत स्वभावाचा आहे. त्यामुळे त्यांच्यातील परस्पर संबंध खूप चांगले असतील, कारण दोघेही एकमेकांना चांगले ओळखतात.

आयसीसी विजेतेपदाचा दुष्काळ संपणार!

विराट कोहलीने T20 विश्वचषकापूर्वीच सांगितले होते की, या ICC टूर्नामेंटनंतर तो टी-20 फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचे कर्णधारपद सोडेल. ICC T20 विश्वचषक 2021 मध्ये भारत चांगली कामगिरी करेल, अशी सर्वांना अपेक्षा होती. पण, तसे झाले नाही. हा संघ विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात असताना या संघाला सुपर-12 च्या पुढे जाता आले नाही. रवी शास्त्री आणि कोहली या दोघांनाही विजेतेपद मिळवता आले नाही. आता द्रविडच्या नेतृत्वामध्ये संघ आयसीसी विजेतेपदाची कमी भरून काढेल, अशी अपेक्षा आहे. 2013 पासून भारताने आयसीसीचे विजेतेपद जिंकलेले नाही. 2013 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. संघ 2019 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पोहोचला, पण विजय मिळवू शकला नाही. 2021 मध्ये आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचूनही संघाला विजेतेपद मिळवता आले नाही आणि त्यानंतर टी-20 विश्वचषकातही संघाची निराशा झाली.

इतर बातम्या

IND vs NZ Head to Head Records in T20Is : टीम इंडिया की न्यूझीलंड, जयपूरमध्ये कोणाचं पारडं जड?

आंतरराष्ट्रीय सामन्यात 27 धावांत संघ ऑलआऊट, 7 खेळाडू शून्यावर बाद, वाचा कुठे घडला ‘हा’ अजब सामना

IND vs NZ: रोहित शर्माच्या कर्णधार असताना विराट संघात काय करणार?, रोहितनेच दिलं उत्तर

(Sunil Gavaskar Highlights The Similarities Between Rahul Dravid And Rohit Sharma)

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.