‘या’ टीममध्ये वर्ल्ड कप जिंकण्याचा ‘दम’, सुनील गावस्करांना विश्वास
भारतीय क्रिकेट बोर्डाच्या सिलेक्शन कमिटीने काल टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम जाहीर केली. यावरुन आता वेगवेगळे अंदाज वर्तवले जातायत.
मुंबई: भारतीय क्रिकेट बोर्डाच्या सिलेक्शन कमिटीने काल टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम जाहीर केली. यावरुन आता वेगवेगळे अंदाज वर्तवले जातायत. निवडण्यात आलेल्या टीमबद्दल भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी आपलं मत मांडलं आहे. भारतीय टीमने आशिया कपमध्ये खराब प्रदर्शन का केलं? त्याच कारणही गावस्करांनी सांगितलं.
वर्ल्ड कप जिंकण्याची क्षमता
टी 20 वर्ल्ड कपसाठी एक चांगली टीम निवडण्यात आली आहे. आशिया कपमध्ये टीम इंडियाला वेक अप कॉल मिळाला आहे. निवडलेल्या टीममध्ये वर्ल्ड कप जिंकण्याची क्षमता आहे. आशिया कपच्यावेळी आपल्याकडे इतके चांगले गोलंदाज नव्हते. आता बुमराह आणि हर्षल पटेलच्या समावेशाने टीम मजबूत झालीय.
आपण सर्वांनी आता सपोर्ट केला पाहिजे
“टीम निवडली जाते, त्यावेळी संपूर्ण देशाने मिळून साथ दिली पाहिजे. ऋषभ पंतबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी कुठल्याही खेळाडूच्या क्षमतेबद्दल शंका घेण्यात अर्थ नसल्याच सांगितलं. ही आपली टीम असून आपण सर्वांनी आता सपोर्ट केला पाहिजे” असं गावस्कर म्हणाले.
टी 20 वर्ल्ड कपसाठी अशी आहे टीम: रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, आर.अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह,